Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

हरतालिका मराठी माहिती | हरतालिका तिज पूजा कशी करावी 2022 | Hartalika vart kase karave |hartalika katha 2022

हरतालिका पूजा कशी करावी मराठी माहिती २०२२ | हरतालिका तिज मराठी |Hartalika vart kase karave| hartalika katha 2022



2022 हरतालिका कधी आहे ? 

 भाद्रपदातील वद्य तृतीयेला भारताच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. महाराष्ट्रात हरतालिका  30 ऑगस्ट 2022 ला आहे . हरतालिका पूजा म्हरजे पार्वतीची पूजा आहे. तीन दिवस चालणारे हे व्रत महिलांसाठीचे व्रत असून ते अतिशय खडतर मानले जाते.

पार्वती ला हरतालिका नाव कशे पडले ?

हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.

हरतालिका कथा मराठी

ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने,  उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.

ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या हरतालिका पूजा विधी मुहूर्त सामग्री प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू  होता.


🆕  हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा संदेश पती साठी


🆕  हरतालिका आरती मराठी lyrics pdf


🆕 हरतालिका पूजा कशी करावी मराठी माहिती व हरतालिका साहित्य व सामग्री


🆕 तुळशी विवाह आरती व मंगलाष्टके pdf lyrics


हरतालिका व्रत कसे करावे 

भारताच्या अनेक राज्यात केले जाणारे हे व्रत मुख्यत्वे हिंदू समाजात केले जाते. हे व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. या दिवशी पार्वती आणि तिची सखी याच्या मातीच्या मूर्ती घरी आणून सुशोभित केलेल्या चौरंगावर त्यांची स्थापना केली जाते. नंतर महिला व मुली एकत्र येऊन त्यांची पूजा करतात. यावेळी वाळूचे शिवलिंग तयार केले जाते. पंचामृती पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो.फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते.

हरतालिका पूजा विधी मराठी 

या दिवशी संपूर्ण दिवस उपास करण्याची प्रथा आहे. कांही महिला पाणीही न पिता हा उपवास करतात. कुमारिका चांगला नवरा मिळावा व विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे व संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना मनोभावे करतात. रात्री विविध खेळ खेळून रात्र जागविली जाते. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखविला जातो व या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतर उपास सोडला जातो. पक्वानांचे भोजन केले जाते याला पारणे असे म्हणतात.

हे व्रत महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा थोडी वेगळी असली तरी शिवपार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते.


सणाचे नाव हरतालिका 2021 मराठी
2022 हरतालिका कधी आहे  30 ऑगस्ट 2022
2022 हरतालिका पूजा मुहूर्त मराठी हरतालिका पूजा मुहूर्त सकाळी 6 ते 8.30 पर्यंत व सायंकाळी 6 ते 8 .33 पर्यंत आहे
हरतालिका व्रत कुमारिकेने करावे का ? हरतालिका व्रत कुमारिका सुद्धा मनासारखा पती मिळण्यासाठी करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !