मराठी राजभाषा दिन मराठी भाषण निबंध घोषणा कविता सूत्रसंचालन मराठी राजभाषा दिन विषयी निबंध | marathi rajbhasha din bhashan nibandh in marathi 2022
![]() |
मराठी राज भाषा दिन भाषण |
नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हांला मराठी राजभाषा दिवस वर मराठी भाषण कसे करायचे ते सांगणार आहे ......
मराठी राज भाषा दिन भाषण मराठी
घासल्या शिवाय धार नाही
तलवारीच्या पातीला...
मराठी शिवाय अर्थ नाही
महाराष्ट्राच्या मातीला...
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदणीय गुरुजनवर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवाणीने प्रेरित झालेल्या,कुसुगाराज आणि विविध साहित्यिकांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या मराठी मावळ्यांनो....
आपण "मराठी राजभाषा दिन' साजरा करत आहोत. यानिमिताने का होईना मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान,गौरव करण्याची साशी मिळते आहे.
आज आपण "मराठी राजभाषा दिन' साजरा करत आहोत. यानिमिताने का होईना मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान,गौरव करण्याची संधी मिळते आहे.
माझ्या मराठी मानेगा,लावा ललाटास टिळा....
हिच्यासंगे जगतील,मायदेशातील शिळा...
असे मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक वि.वा.शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्र यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो.
मराठी बोलणारा मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे . कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने तर कोणी नोकरीच्या निमित्ताने.
उच्चशिक्षित होऊन,इंग्रजी-हिंदीसारख्या इतर भाषा अवगत करून,ग्लोबल होऊन मराठी माणूस आज आपल्या आईला,मातृभाषेला विसरत चालला आहे.
मान्य आहे आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरला आहात. पण या स्पर्धेत मराठी भाषेला कोणीही विसरु नये कारण जन्म झाल्यानंतर मुखातून पहिला शब्द आला तो मराठी होता, इतरांशी संवाद सुरु करताना पहिला शब्द हा मराठीच होता है विसरून चालणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती रक्षणाचे कार्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घडविले ते मराठीनेच, दादासाहेब फाळके ते दादा कोंडके यांना घडविले ते मराठीनेच, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ आदि संत घडले ते या मराठीच्याच कुशीत, वासुदेव बळवंत फडके सारखा आद्यक्रांतिकारक घडला तो मराठी मातीतच,
सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर ही रत्ने घडली ते मराठी भूमीतच.
पु ल देशपांडे ते कुसुमाग्रज यांच्यासारखे साहित्यिक तृप्त केले ते मराठीनेच , घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याला बळ दिले ते मराठीनेच.
असे कितीतरी असामान्य कार्य करणारे असामान्य लोक या मराठी भाषानेच घडवले आहेत .
तरीही आज खंत या गोष्टीची वाटते की ज्यांना या मराठी भाषेने मोठे केले अशा उच्चशिक्षित,शहरी संस्कृतीतील मंडळींना मराठी भाषेची लाज वाटायला लागलीय,मराठी भाषेला टाळू लागलेत.
का तर म्हणे मराठी भाषेला समाजात किंमत नाही, मराठी बोलणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण.
ज्या मराठीने,ज्या मातृभाषेने घडविले तिला पायदळी तुडविणे,तिचा अपमान करणे म्हणजे किती मोठा कृतघ्नपणा? आणि हा कृतघ्नपणा अनेक मराठी माणसांकडून घडताना दिसू लागला आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय खरा, पण मराठी टिकावी मराठी भाषेची किंमत वाढावी यासाठी आपण कोणते प्रयत्न करत आहोत , करणार आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे.
मराठी भाषा वाचविणे हे काम सरकारचे किंवा कोणा राजकीय गटाचे नाही तर हे काम आहे प्रत्येक मराठी माणसाचे. चला तर मराठी भाषेचे संवर्धन करू मराठी शाळा.मराठी भाषा टिकवू धन्यबाद
शेवटी जाताजाता एवढेच म्हणेन ...
ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी
शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी
संतांनी वाढवली तो वाण मराठी
आमची मायबोली आमचा अभिमान मराठी
माझ्या मराठी मातेचा अभिमान बाळगणाऱ्या माय मराठीच्या सर्व लेकरांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद || जय महाराष्ट्र||
🚩 मराठी भाषा दिन मराठी माहिती
FAQ