Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण निबंध कविता सूत्रसंचालन

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण निबंध कविता सूत्रसंचालन

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण

 आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष,आदरणीय व्यासपीठ,वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या देशभक्त बंधू आणि भगिणींनो...

मी तुम्हांला एका मुलाची गोष्ट सांगणार आहे , तुम्हांला ती नक्की आवडेल

विनायक नावाचा साहसी मुलगा होता. तो सर्वांना फार आवडायचा. त्याला बरेच मित्र होते. ते सगळे एका खोलीत जमत. विनायक त्यांना गोष्टी सांगायचा. गोष्टीत रंग भरायचा.

एक दिवस तो झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होता. राणी घोड्यावर बसली होती. तिच्या पाठीशी मूल होते. ती शूरपणे लढत होती. इंग्रजांना सांगत होती, "मी प्राण देईन, पण माझी झाशी देणार नाही." 

🌟 8 मार्च जागतिक महिला दिन मराठी अप्रतिम भाषण मुलांची / विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी !

 ➡️https://www.marathibhashan.com/2021/02/mahila-din-speech-in-marathi-language.html 

----------------------------–-------------------

गोष्ट रंगात आली. इतक्यात कुठून तरी आवाज आला. 'फुस्स्... फुस्स्'. सारे इकडे तिकडे पाहू लागले. पुन्हा तोच आवाज आला.

'कसला आवाज येतो आहे, साप तर नसेल?' सर्वांनी निरखून पाहिले. कोपऱ्यात खरोखरच नाग होता. मुले घाबरली. विनायक मात्र घाबरला नाही. जवळच एक सांडशी पडलेली होती, त्याने ती उचलली. तो नागाजवळ जाऊ लागला. मुले ओरडली, "अरे! तो नाग आहे. चावेल तुला. फीर मागं!"

विनायकने नागाचे तोंड सांडशीने घट्ट धरले व नागाला वर उचलले. नाग त्याच्या हाताला वेटोळे घालू लागला. मुले घाबरून म्हणाली, "अरे, सोड. सोड त्याला. तो चावेल."

विनायकने त्या नागाची पकड अधिकच घट्ट केली व म्हणाला, "अरे, नागाला भ्यालात, मग इंग्रजांशी कसे लढणार?" विनायकने घट्ट धरल्यामुळे, तो नाग अर्धमेला झाला. विनायकने लगेच त्याला दूर फेकून दिले.

या वेळी या मुलाचे वय बारा वर्षांचे होते. हा मुलगा म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!

झाले बहु. होतील बहु. परंतु या सम हा...

विदेशी कपड्यांची निर्भयणे प्रकट होळी करणारे देशभक्त !  भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आंतराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारी चळवळ करणारे प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक,सरकारने ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबंध घातला असे लेखक ,पन्नास वर्षे सीमापारीची आणि काळ्यापाण्याची शिक्षा झालेले राजबंदी !

हिंदु तरुणांनो,

प्रेयसीच्या केसांतून फिरणारी तुमची बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली, तर आणि तरच हा हिंदुस्थान जगू शकेल...

असे प्रखरपणे सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.

     स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी २८ मे १८८३ रोजी झाला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी वागणूक पाहून त्यांनी अतिशय दुःख होत असे. चाफेकर बंधूंना ब्रिटिशांनी फासावर चढवले पाहून त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी "मारता-मारता मरतो  झुंजेन" अशी शपथ वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी देवीपुढे घेतली होती. पुण्यामध्ये शिकत असताना त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले असताना तेथे त्यांनी क्रांतीकारांची मोठी संघटना तयार केली. म्हणून बॅरिस्टर होऊन त्यांनी देशद्रोही ठरवून इंग्रज सरकारने बॅरिस्टर पदवी नाकारली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बोटीवरून मार्सेलिस च्या समुद्रात मोठ्या धैर्याने उडी घेतली होती. परंतु ते पकडले जाऊन त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले. पण अशा नरक यातना भोगत असतानाही त्यांनी काळेपाणी सारख्या सुंदर पुस्तकाचे लेखन केले. " ने मजसी ने परत मातृभूमीला"  हे त्यांचे गीत युगानुयुगे लोकांच्या मनात झंकारित राहील.

अमाप छळ आणि कष्टामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते स्वर्गवासी झाले. देशासाठी प्राण पणास लावून ते अजरामर झाली.

शेवटी जाता जाता सावरकरांच्या कवितेतील दोन ओळी बोलून दाखवतो 

काळ स्वयं मला घाबरतो, 

मी काळाला घाबरत नाही.

काळ्या पाण्याचे कालकूट पिऊन् , 

फाशीचा कराल स्तंभ गदागदा हलवून

मी पुन्हा परत आलो आहे. 

तरीही मी जिवंत आहे.

मृत्यू हरला आहे मी नाही...


धन्यवाद 

जय हिंद जय महाराष्ट्र

भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की शेअर करा 👇



 मराठी भाषण वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे 

आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे असेल तर 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !