Type Here to Get Search Results !

12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी भाषण माहिती निबंध सूत्रसंचालन | Yashwantrao chavan bhashan marathi

12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी भाषण माहिती निबंध सूत्रसंचालन.

Yashvatrao chavhan bhashan marathi

12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी भाषण माहिती निबंध सूत्रसंचालन.


व्यासांचे व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले अध्यक्ष गुरुजनवर्ग व जमलेल्या माझ्या बाल मित्र मैत्रिणीनो...

आज मी तुम्हांला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ,एक थोर विचारवंत ,सामाजिक कार्यकर्ते ,लोकनेते यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्हीं शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती

ठाई ठाई पाणावलेली सह्याद्रीची पाती ,

देव रत्न हिरा जन्माला विठाई पोटी,

चीन चा हा कर्दनकाळ ,महाराष्ट्राचा शिल्पकार ,

चला करू यशवंतांचा जयजयकार  जयजयकार !

अरे कोण आहेत यशवंत आणि कशाचा जयजयकार हे दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत देशाच्या राजकारणातील महान नेतृत्व -  लेखक  , महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव बळवंतराव चव्हाण ....!

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१४ रोजी सांगली जिल्ल्यातील देवराष्ट्रे या गावी एका आमान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण देवराष्टे, कराड, कोल्हापूर या ठिकाणी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर  मात करून त्यांनी आपले बी.ए.एलएल. बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


☸️ यशवंतराव चव्हाण संपूर्ण माहिती मराठी


1940 साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ब्रिटिश सरकारिविरोधी  कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला . पहिला राजकीय कारावास त्यांनी १९३२ साली घडला . त्या कारावशाच्या कालावधीत त्यांनी कार्ल मार्क्स  व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाच्या अक्ष्यास केला आणि त्यांच्यावर रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला . तथापि त्यांची गांधी  नेहरूंनी राजकारणात अनुसरलेल्या मार्गावर निष्ठा होती .

इ.स. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनातही यशवंतरावांनी भाग घेऊन भूमिगत राहुन कार्य केले. त्यामुळे ते पकडले गेल व तुरूंगावासाची शिक्षां झाली . पुढे इ.स. १९४६ मध्ये मुंबई प्रांताच्या विधी मंडळाची निवडणूक होऊन त्यात ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले व सांसदीय सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांना पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. महाराष्ट्रातील कृषी, औदयोगिक क्षेत्राच्या विकासाचा पाया घालण्याची महत्त्वपूर्ण कामागरी त्यांनी केली. ते एक उत्कृष्ट प्रशासक होते.

 त्यांना राजकारणा प्रणाणेच समाजकरण, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रातही विशेष रस होता . त्यांनी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाची निर्मिती केली होती. इ.स. १९०५ मध्ये कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताच्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.

यशंवतराव चव्हाण यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १९८४ हृदय विकाराच्या झटक्याने झाले !

शेवटी जाताजाता एवढेच म्हणेन 

घासल्या शीवाय धार नाही 

 तलवारीच्या पातीला  

अहो घासल्या शीवाय धार नाही 

 तलवारीच्या पातीला आणि

 यशवंतरावांच्या विचारांशिवाय पर्याय नाही 

या महाराष्ट्राच्या मातीला ...


जय हिंद जय महाराष्ट्र...

यशवंतराव चव्हाण जयंती 2021 मराठी भाषण कसे वाटले ?

भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !