Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

20 मार्च जागतिक चिमणी दिवस मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन |Jagtik chimni divas marathi bhashan nibandh sutrasanchalan

20 मार्च जागतिक चिमणी दिवस मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन |Jagtik chimni divas marathi bhashan nibandh sutrasanchalan

jagtik chimni divas marathi


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हांला जागतिक चिमणी दिवस कधी आहे ? चिमणी दिन का साजरा केला जातो ? चिमणी विषयी मराठी माहिती त्या विषयी भाषण व माहिती सांगणार आहे ! 

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,आदरणीय गुरुजन वर्ग , आणि नेहमी चिमणी सारखी चिवचिव करणाऱ्या माझ्या बाल मित्रांनो ! 

सुकला पालापाचोळा आला कडक उन्हाळा 

ठेवूनी चारा-पाणी अंगणात पक्षांप्रती दाखवा जिव्हाळा!


  मित्रांनो शाळेच्या कौलामध्ये भिडलेला गवताचा मजबूत असा  खोपा तुम्हांला आठवतो का ? अंगणामध्ये वाळवत घातलेल्या धान्यावर सगळ्यांच्या नजरा चुकून दाणे चोरणारी चिमणी (chimani) शेवटची तुम्ही कधी बघितली ?  जन्माला आल्यानंतर मानलेली सर्वात पहिली बहीण... चिऊताई! आपल्या शाळेच्या पुस्तकातली लाडकी चिऊताई हरवली कुठे ? याचा विचार आपल्या डोक्यात येतच नाही ?

गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भूर उडून गेली ती ती आज पर्यंत आलीच नाही ....!

जंगल तोडून उभ्या राहिलेल्या काँक्रीटच्या इमारती ती बिचारी चिमणी कुठे राहणार ? हल्ली तिला घर उरलेच कुठे ? हळूहळू आता ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे आणि ती संपली तर तुम्हां आम्हांस  सुद्धा संपण्यास वेळ लागणार नाही अस समजा!

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आहे आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांची अनुपलब्धता अन्नाची अनुपलब्धता आणि शहरातले वाढते प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे मोबाईल चे टावर त्यांची किरणे यामुळे त्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस परिणाम होत चाललेला आहे .

आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज 20 मार्च म्हणजेच चिमणी दिवस  . 

नोव्हेंबर 2009 पासून चिमणी चिमणी वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली. चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी 2010 रोजी पहिल्यांदा दिल्ली येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.

चिमणी (हाउस स्पॅरो) आणि रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या पूर्ण जगभरात आढळतात.चिमणी हा पक्षी हिमालयाच्या 2000 मीतर उंचीपर्यंत, तसेच हा पक्षी भारतातही सगळीकडे आढळतो.तुम्हांला माहीतच असेल की आज काल च्या चिमण्या आपण टाकून दिलेले अन्नधान्य , आजूबाजूच्या परिसरातील कीटक तसेच  शेतातील झाडावरील  कीटक, असे सर्व प्रकारचे खाद्य चिऊताई खात असते त्या मुळे ती आपल्याला व शेतकऱ्यांना सुद्धा मदत करत असते.

 नदीपात्रात  पडत असलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे चिमण्यांना अन्न शोधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे जंगली नष्ट करून इमारती उभारल्या मुळे नैसर्गिक वातावरण बिघडत चालले आहे , शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतातील कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे, पशुपक्षी संवर्धनाची समस्या निर्माण झाली आहे! आणि त्यासाठी आपण चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी पर्यावरण पुरक पर्यंत केले पाहिजे !

 पशु पक्षांनी तर त्यांच्या निवाऱ्याची जागा आपल्याला दिली आहे, परंतु आता त्यांच्या निवाऱ्याच काय ? त्यांच्यासाठी आता आपल्याला काहीतरी करण्याची वेळ आली आहे!

आठवूनी चिउ-काऊचा घास 

घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा वास

आपण काही तरी करण्याची हीच वेळ आहे आपण सर्वांनी मिळून हे पक्षी नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत व निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी हातभार लावला पाहिजे . सकाळी सकाळी आपले दार उघडल्यावर चिवचिव करणारी चिऊताई आता शहरी व ग्रामीण भागातून सुद्धा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे चिमणी संवर्धनाची जबाबदारी आपल्याला घेऊया, त्यांची संख्या पुन्हा वाढण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न करूया.

चिमणी वाचवण्यासाठी काय करावे :

  • पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन करायला हवे ! 
  • त्यासाठी आपण चिमणी व इतरही पक्षी वाचवण्यासाठी जनजागृती करायला पाहिजे ! 
  • त्यांच्या अन्नसाखळी यांची पर्यायी ओळख करून जनजागृती आणि संवर्धन करणे .
  • चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे 
  • शक्य असल्यास घराभोवती जास्तीत जास्त झाडे लावा व चिमणी वाचवा 
  • चिमणीला घरटे बांधण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध करून देणे
  • आपल्या घराभोवती किंवा बाल्कनी मध्ये चिमण्यांसाठी पाणी ठेवणे ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जणांनी करायला हव्यात!

 माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी वाढते आधुनिकीकरण या सर्व गोष्टींमुळे चिमणीच नव्हे तर इतरही पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत , चला तर मग आपण एक संकल्प करूया आणि चिमणीला वाचू या.

शेवटी एवढेच म्हणेन 

चिऊताईचा चिवचिवाट पुन्हा ऐकावासा वाटतो ना?

चला पर्यावरण रक्षणाचा

लढा अधिक भक्कम करू या...

पक्षी वाचूया - निसर्गाचे सौंदर्य वाढवूया !

जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद.


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !