23 मार्च शहिद दिवस मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध | shahid diwas speech in marathi 2022|
नमस्कार वाचकांनो आज मी तुम्हांला शहीद दीना बद्दल मराठी माहिती ( shahid diwas information in marathi | shahid diwas speech in marathi ) सांगणार आहे त्याचा उपयोग तुम्हीं शहीद दिन भाषण निबंध कविता व्हाट्सअप्प या साठी करू शकता !
शहीद दिन (shahid din 2022) प्रस्तावना :
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील गुरुजन वर्ग व जमलेल्या भारतमातेच्या शूरवीर बाल मित्रांनो.
मेरा रंगदे बसंती चोला,
मेरा रंगदे मेरा रंगदे बसंती चोला,
माय रंग दे बसंती चोला...!
ह्या गाण्याचे नुसते दोन बोल जरी ऐकले तरी अंगावर शहारे उभे राहतात,
तसेच महान क्रांतिकारक भगतसिंग यांचे नाव जरी घेतले तरी अंगात एका प्रकारची स्फूर्ती ,ऊर्जा निर्माण होते !
जेव्हा जेव्हा भारतमातेच्या स्वातंत्र्या साठी क्रांतिकारकांचे नाव घेतले जाते त्यात सर्वात आगोदर नाव येते ते महान स्वातंत्र्य वीर भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव!
शहीद दिवस का साजरा केला जातो ?
आज 23 मार्च भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांना लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती, त्यांच्या बलिदानासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो!
त्यांच्या बलिदानाची आढवन व्हावी म्हणून कवी म्हणतात ...
सोडले सर्व घरदार
सोडले सुखी संसार
ज्योतिसम जीवन जगले
ते अमर हुतात्मे झाले.
क्रांतिकारक भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची मराठी माहिती भाषण -
भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब राज्यातील लायलपूर गावी झाला. भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होणाऱ्या कुटुंबापैकी त्यांचे एक कुटुंब होते.
लहानपणीच त्यांनी ठरवले होते की आपण भारत मातेसाठी काही तरी करायचे, त्यामुळेच त्यांनी देशसेवेसाठी आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतली. लहान पणापासूनच इंग्रजांना कसे भारतातून कसे हाकलून लावायचे याचा विचार करत असत .जेव्हा भगतसिंग हे 6 ते 7 वर्षी चे होते ते एकदा शेतात गेले व शेतकऱ्याला विचारले की तुम्हीं काय करताय ? त्यावर शेतकरी बोलला , मी गहू पेरतोय ,मोठे होऊन त्याचे कणसे होतील आपल्याला खायला भरपूर गहू होतील, त्यावर लगेच भगतसिंग यांनी त्या शेतकऱ्यांला विचारले ,जर का मी बंदुकीच्या गोळ्या पेरल्या तर गोळ्यांची ही झाडे उगवतील का ? त्याला बंदुकीही येतील का ? शेतकऱ्यांने भगतसिंग यांना विचारले तुला गोळ्या बंदुकी कशाला हव्यात ? त्यावर क्षणाचाही विलंब न करता हिंदुस्तानचे राज्य बनवणाऱ्या इंग्रजांना मारण्यासाठी असे उत्तर भगतसिंग यांनी दिले.
सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी 1028 रोजी इंग्लिश वरून भारतात आले होते, त्यांना सर्व भारतीयांनी काळे झेंडे दाखवून सायमंड गो बँक देत घोषणा देत मोर्चा काढला, या मोर्चाचे नेतृत्व लाला लजपतराय करत होते, जमावाला पांगवण्यासाठी इंग्रजांनी अमानुष लाठीचार केला, त्यात लाला लजपतराय प्रचंड घायाळ झाले व त्यातच त्यांचा अंत झाला.हे बघून भगतसिंग व साथीदार राजगुरू व सुखदेव लजपतराय यांच्या मृत्यू ला कारणीभूत असलेले अधिकारी स्कॉट याचा प्रचंड राग आला व त्यांना मारण्यासाठी योजना आखली, चार दिवस स्कॉट यांच्यावर नजर ठेवण्यात आली शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातुन एक गोरगोमटा अधिकारी बाहेर येतांना दिसला ,राजगुरू यांना तो अधिकारी स्कॉट वाटला व त्याच्यादिशेने गोळी बार केला, लगेच भगतसिंग यांनी सुद्धा त्याच्यावर 8 गोळ्या झाडल्या व तिथून निघून गेले, परंतु दुसऱ्या दिवशी समजले की तो स्कॉट नसून साँडर्स होता, हे समजल्यावर तिघांनाही स्कॉट वाचला याचे दुःख झाले. परंतु इकडे इंग्रजांनी या तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली , त्यांना पकडून देणाऱ्यांना मोठे पारितोषिक देण्याचे आमिष दाखविण्यात आले, परंतु हे तिघेही इंग्रजांना सापडले नाही शेवटी त्यांच्याच मधील एका फितुरीने त्यांची खबर इंग्रजांना दिली आणि अशाप्रकारे हे तिघेही इंग्रजांच्या तावडीत सापडले. आणि शेवटी तिघांनाही 23 मार्च 1931 रोजी सकाळी 7.33 ला लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली.
शेवटी एवढेच म्हणेन ...
shahid diwas quotes wishes in marathi -
आओ झुक कर सलाम करे उनको,
जिनके हिस्से में ये मुकाम आता है,
खुशनसीब होता है वो खून,
जो देश के काम आता है,
देश के शहीदों को शत् शत् नमन !
जय हिंद जय महाराष्ट्र !
🔰 हे ही वाचा 👉
⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण
⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण
⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण
⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण
अश्या प्रकारे आज आपण