Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

होळी सणाची माहिती भाषण निबंध मराठी 2022 | Holi nibandh speech in marathi 2022

होळी सणाची माहिती भाषण निबंध मराठी 2022|Holi nibandh speech in marathi 2022


Holi marathi mahiti bhashan


नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू धर्मातील होळी सणाची मराठी माहिती | होळीची पूजा कशी करतात व मुहूर्त याची थोडक्यात माहिती बघणार आहोत .


होळी सणाची माहिती 2022

 दिवाळी नंतरचा हिंदूंचा दुसरा सर्वात मोठा सण होळी हा आहे, हा उत्सव होळीपूजन आणि होलिका दहन अश्या दोन दिवसी साजरा केला जातो,  यंदा होलिका दहन 28 मार्च ला आहे, तर धुलीवंदन  29 मार्च रोजी खेळली जाणार आहे. 

होलिका दहन शुभ मुहूर्त 

होलिका दहन शुभ मुहूर्त - 28 मार्च 2021 सकाळी 03.27 पासून ते 29 मार्च 2021 दुपारी 12.17 पर्यंत.

तसेच 

होलिका दहन मुहूर्त 28 मार्च संध्याकाळी 6.37 ते 8.56पर्यंतच आहे. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन - 29 मार्च 2021  सोमवारी रोजी आहे.


💥 होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


होळी सणाची पौराणिक कथा 

बाल श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठवले होते , ती लहान मुलांना विषारी दूध पाजीत,परंतु तसे करतांना तिचा प्राण शोषून कृष्णाने दुष्ट पूतना राक्षसीला ठार मारले. याच पूतना राक्षसीला होळी सणाच्या वेळी जाळण्यात येते.

होळी साठी कोणकोणत्या सामग्री आवश्यक आहेत ?

चपाती ,रांगोळी, फुल, तांदूळ, मूग,नारळ, हळकुंड ,बत्ताशे,आणि कच्चे सूत, गूळ, व नवीन पिकांच्या ओंब्या इ...

होलिका दहन योग्य  पूजा विधी 

होलिका पूजन करते वेळेस पूर्वेकडे तोंड करून होलिकाजवळ बसून पूजेच्या थाळीत पाणी, चपाती ,रांगोळी, फुल, तांदूळ, मूग,नारळ, हळकुंड ,बत्ताशे,आणि कच्चे सूत, गूळ, व नवीन पिकांच्या ओंब्या इ...तसेच  शेण, गुलालामध्ये रंगाने बनवलेल्या चार वेगवेगळे  हार तयार करा.  पहिली माला पतरांच्या नावाने , दुसरी हनुमान, तिसरी आई शीतला आणि चौथी माळ कुटुंबाच्या नावाने होळी मध्ये अर्पण करा. यानंतर सर्व सामग्री अर्पण करून होलिकेला हात जोडून होळीला 3 ,5 ,7 परिक्रमा घाला. त्यानंतर कच्चे सूती नारळाला गुंडाळून होळीला अर्पण करावे यानंतर, पाणी अर्पण करा आणि पीकांच्या ओंबी टाका . होळीची जी राख उरते तिला भस्म म्हणतात ती शरीराला लावण्याची सुध्दा प्रथा आहे, 

आयुर्वेदानुसार होळी सणाचे महत्त्व 

थंडीच्या दिवसांत शरिरातील सर्व  कफ दोष होळीच्या या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे सर्व  विकार दूर होतात.

 होळी मध्ये वापरण्यात आलेल्या विवीध पालापाचोळा च्या औषधी धुरामुळे कफ कमी होण्यास मदत होते.  हसणे गाणे मुळे मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.

 होळीचा सण वाईटावर विजय मिळविण्याचे एक प्रतीक मानला जातो. होळी सणाला लोक सर्व परस्पर मतभेद विसरून एकत्र होतात.

असे मानतात की या दिवशी रंग, गुलाल लावल्यास भेदभाव आणि मतभेद दूर होतात. लाल हा रंग प्रेम व सुसंवादाचे प्रतीक आहे, म्हणून रंगपंचमी साजरी केल्याने परस्पर प्रेम आणि आपुलकी वाढवते .

🔰 हे ही वाचा 👉 

 ➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण


भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !