आज 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन मराठी माहिती भाषण निबंध 2021 | jagtik kshay rog din marathi mahiti
क्षयरोग दिन का साजरा केला जातो ?
क्षयरोगाचे विनाशकारी परिणाम आणि आरोग्यामध्ये घेणारे उपाय यांच्या मध्ये जनजागृती वाढवण्यासाठी आणि क्षयरोग महामारी नष्ट करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
क्षयरोग कश्यामुळे होतो ?
क्षयरोग (TB) हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस जंतूमुळे होतो व तो अत्यंत संसर्गजन्य व घातक असा रोग आहे. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून साजरा केला जातो.
हे जिवाणू (बॅक्टेरिया) सूक्ष्मदर्शकाने / CBNAAT / TrueNAAT द्वारा दिसू शकतात. क्षयरोग जास्त करून फुप्फुसांना होतो. फुप्फुसांखेरीज शरीराच्या इतर कोणत्याही अवयवांना क्षयरोग होऊ शकतो फक्त केस व नखे सोडून.
क्षयरोग लक्षणे (TB Symptoms )
- दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकलाव
- जनात लक्षणीय घट होणेखो
- कल्यावाटे कधी कधी रक्तही पडू शकतेह
- लकासा परंतु संध्याकाळी वाढणारा तापछा
- तीमध्ये दुखणे
- भूक मंदावणेअ
- शक्तपणा जाणवणे
क्षयरोग निदान | टीबी चे प्रकार
- टीबी चे निदान बेडका नमुन्याची तपासणी करुन करतात. जोरदार खोकला काढल्यानंतर छातीमधून बाहेर येणारा बेडका नमुना म्हणून घ्यावा.
- क्षयरोगाचे बिनचूक निदान व्हावे म्हणून असे दोन नमुने देणे जरुरीचे असते
- क्षयरोगाचे निदान करण्याचा एक उत्तम व खात्रीचा मार्ग म्हणजे सूक्ष्मदर्शकाने किंवा CBNAAT किंवा TrueNAAT द्वारा बेडका नमुना तपासणे
- अशी ही बेडका तपासणी सर्व सरकारी व महानगरपालिका दवाखाने तसेच निवडक खाजगी दवाखान्यात मोफत केली जाते
क्षयरोगावर औषधोपचार व टीबी घरगुती उपाय मराठी
क्षयरोग हा सकस आहार आणि नियमित औषधांचे सेवन केल्याने व आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. आरोग्य कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली औषधं दिली जातात.टीबीवर मोफत व अखंडीत उपचार केला जातो.रोग्याच्या उपचाराचा पूर्ण तपशील ठेवला जातो.
कोणत्याही परिस्थितीत औषधोपचार अर्धवट सोडून देऊ नका. तसं केल्यास औषधांना दाद न देणारा टीबी (MDR-TB) होऊ शकतो व त्यावर उपचार करणं अवघड होतं.
क्षयरोगाचे उच्चाटन व्हावे व समाजातील गैरसमज दूर व्हावे या साठी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.
म्हणून त्यासाठी जनमोहीम उभारुन क्षयरोगावर विजय मिळविण्याचा संकल्प करुया.
क्षयरोग - हे करा / हे करु नका
- हे करु नका
- आपल्याला दोन आठवड्यापासून खोकला येत असेल तर दुर्लक्ष करू नका.
- बेडक्याची तपासणी आवश्य करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे थांबवू नका.
- टीबीच्या रोग्याला कुटुंबापासून वेगळे ठेवू नका.
- कुठेही थुंकू नका.
- हे करा
- दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी पर्यंत खोकला असला तर जवळच्या शासकीय रुग्णालयात बेडक्याची तपासणी करा..
- टीबीचे निदान झाल्यास औषधे निश्चित मुदतीपर्यंत नियमितपणे घ्या.
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आवश्य धरावा.टीबीचे जंतू खोकल्यातून आणि शिंकण्याद्वारे पसरतात.