एप्रिल फुल दिवस का साजरा केला जातो | एप्रिल फुल चा इतिहास मराठी माहिती | April fool day ka sajra kela jato | marathi bhashan mahiti.
April fool day ka sajra kela jato
1 एप्रिल म्हणजे मित्रांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो . कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्यांना मूर्ख बनवत असतो! लहान असो की मोठा सर्वच जण एकमेकांना विविध युक्त्या लढवून या दिवशी एप्रिलफुल बनवतात ! लहानपणी आपला मित्र आपल्याला एक डब्बा देत आणि तो आपल्याला उघडायला लावायचा आणि त्यात काहीच नाही निघायचे ,आणि आपण त्याला चिडवत बसत होतो एप्रिल फुल डब्बा गुल ! या दिवशी कोणाशीही चेष्टा मस्करी केली तरी एप्रिलफुल म्हणून ती माफ केली जाते.
पूर्ण जगभरात हा दिवस एप्रिल फुल दिवस म्हणून साजरा केला जातो पण ही लोकांना फुल बनवण्याची परंपरा ,पद्धत आली तरी कोठून ? कोणत्या देशाने ही परंपरा पाडली ? याचा खरा इतिहास अजून तरी कोणीही नाही सांगितला पण याच्या आख्यायिका बऱ्याच आहेत त्या पैकीच एका आख्यायिका ची माहिती सांगणार आहे .
एप्रिल फुल चा इतिहास मराठी माहिती
असे म्हणतात की खऱ्या एप्रिलफुल दिवसाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली .तेरावे पॉप ग्रेगरी यांनी 1582 रोजी युरोप च्या सर्व देशाला ज्युलियन कॅलेंडर ऐवजी ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सांगितले ! त्या आगोदर ज्युलियन कॅलेंडर मध्ये 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे केले जात असत, परंतु नवीन ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 1एप्रिल ऐवजी 1 जानेवारी ला नवीन वर्षे साजरे करण्यास पॉप ग्रेगरी यांनी सांगितले. परंतु वर्षानु वर्षा पासून चालत आलेली परंपरा मोडण्यास युरोपियन लोक तयार नव्हते त्या मुळे त्याचा बऱ्याच लोकांनी विरोध केला , आंदोलने केली.
एप्रिल फुल दिवस का साजरा केला जातो
त्यामुळे बरेच युरोपियन लोक 1 एप्रिलाच नवीन वर्ष साजरे करत ,आणि जे 1 एप्रिल ला नवीन वर्ष साजरे करत त्या सर्वांना मूर्ख समजले जायचे. हळूहळू फ्रांस ची एप्रिलफुल ची गोष्ट पूर्ण जगात सर्वत्र पसरली आणि तेव्हा पासून 1 एप्रिल आला दिवस एप्रिलफुल दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झाली .
अशाप्रकारे आपण एप्रिल फूल चा इतिहास एप्रिल फूल का साजरा केला जातो याची मराठी माहिती बघितली आहे
कशी वाटली एप्रिल-फूल दिवसाची माहिती माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा
🔰 हे ही वाचा 👉
⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण
⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण
⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण
⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण
⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण
⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण