Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गुड फ्रायडे म्हणजे काय ? गुड फ्रायडे हा का साजरा केला जातो ? गुड फ्रायडे ची मराठी माहिती good friday chi marathi mahiti 2021

गुड फ्रायडे म्हणजे काय ? गुड फ्रायडे हा का साजरा केला जातो ? गुड फ्रायडे ची मराठी माहिती good friday chi marathi mahiti 2021

गुड फ्रायडे मराठी माहिती


नमस्कार मित्रांनो आज आपण ख्रिश्चन समाजातील सण गुड फ्रायडे ( good friday ) म्हणजे काय ? गुड फ्रायडे हा का साजरा केला जातो ? याबद्दल मराठी माहिती बघणार आहोत!

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ईस्टरच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी हा दिवस पाळला जातो. या दिवसाला ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे अशा नावांनी ही संबोधले जाते. यावर्षी हा सण 2 एप्रिल रोजी आहे व चार एप्रिल रोजी ईस्टर संडे आहे.

पण या दिवसाबाबत अनेकांनी अनेकांचे समज गैरसमजही बघायला मिळतात. अनेकांना माहितीच नाही की हा एक दुःखाचा दिवस आहे. त्यामुळे काही लोक सोशल मीडियातून या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात.

गुड फ्रायडे हा का साजरा केला जातो ?

ख्रिश्चन धर्मातील समजुतीप्रमाने याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर घटलण्यात आले होते. याचीच आठवण म्हणून ख्रिश्चन  धर्मात गुड फ्रायडे ( Good Friday 2021 ) हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतामध्ये गूड फ्रायडे निमित बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना सुट्टी असते. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो.

🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ ईस्टर संडे का साजरा केला जातो मराठी माहिती वाचा ?


घा दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. ख्रिस्ती भाविक बांधव काळे कपडे घालून चर्च मध्ये येशुने केलेल्या बलिदानाबद्दल प्रार्थना ,कृतज्ञता व्यक्त करतात.जगभरात अश्या प्रार्थना आयोजित केल्या जातात,आपण केलेल्या गुन्ह्यांची माफी येशु कडे मागितली जाते ,या दिवशी कोणत्याही प्रकारचा घंटानाद चर्च मध्ये केला जात नाही.तसेच रोमन समाजातील ख्रिस्ती लोक या दिवशी कडक उपवास करतात.

का चढवलं गेलं येशू ख्रिस्तांना क्रॉसवर?

ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त है परमेश्वराचे पुत्र होते. लोकांना येशू ख्रिस्त अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करण्यासाठी मदत करत होते.

परंतु त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशु ख्रिस्ताचा विरोध केला. आणि त्या काळच्या सेमन गव्हर्नर Pontius pilate (पिलातूस) कडे येशू ख्रिस्तांची तक्रार केली. येशु ख्रिस्तांची शिकवण रोमन सत्ताधारकांसाठी धोक्याची ठरत होती.

यहुदी म्हणजेच ज्यू लोकांनी क्रांती करू नये आणि आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी गव्हर्नरने येशु ख्रिस्ताना क्रॉसवर लटकवून जीवे मारण्याचा आदेश दिला.

रोमन सैनिकांनी येशू ख्रिस्तांच्या डोक्यावर काट्याचे मुकूट ठेवून चाबकाचे फटके देत त्यांची धिंड काढली. येशूचे अनुयायी आक्रोश करत होते, क्षमा याचना करत होते तर कर्मठ लोक मात्र येशुचीअवहेलना करत होते.

आपल्या शेवटच्या क्षणीही येशु ख्रितांनी परमेश्वरा, हे लोक काय करत आहेत हे त्यांना  माहीत नाहीत, या सगळ्यांना त्याच्या पापांसाठी क्षमा कर, माफ कर असे स्वर्गातल्या परमेश्वराला विनवत आपले प्राण त्यागले असे ख्रिश्चन बांधव मानतात.

यामुळे येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस हा गुड-फ्रायडे म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडे नंतरचा येणारा रविवार- म्हणजे ईस्डरसण्डे हा येशुचा परत प्रकटण्याचा दिवस असतो त्यामुळे ईस्टर संडेचा हा दिवस ख्रिस्ती बांधवमोठ्या आनंदात साजरा करतात.


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?

⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण


भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇


अश्या प्रकारे आज आपण ख्रिश्चन समाजातील सण गुड फ्रायडे ( good friday chi mahiti  ) म्हणजे काय ? गुड फ्रायडे हा का साजरा केला जातो ? याबद्दल मराठी माहिती बघितली आहे   माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा !

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !