हनुमान जयंती मराठीत माहिती 2023| Hanuman Jayanti marathi mahiti 2023|हनुमान जयंती पूजा विधी मराठी |Hanuman Jaynti puja vidhi marathi | Hanuman Jaynti kadhi aahe
नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वशक्तिमान महापराक्रमी आणि एक निष्ठावंत , प्रभू श्रीरामाचे निष्ठावंत,आदर्श भक्त म्हणजेच हनुमान जयंती विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत.
चैत्र पौर्णिमेला सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी सकाळपासून हनुमानाचे कीर्तन भजन केले जाते आणि नंतर प्रसाद वाटला जातो
हनुमान जयंती कधी आहे 2023?
या वर्षी चैत्र पौर्णिमा तिथी सकाळी 05 एप्रिल 2023 रोजी सकाळी 12:46:12 पासुन सुरू होणार आहे,
पौर्णिमा तिथी समाप्ती 06 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09:03:15 ला संपणार आहे.
हनुमान जयंती ची पौराणिक कथा
दशरथाला राजाला एकही पुत्र नव्हता त्या साठी राजाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि यातून अग्नी देव प्रसन्न होऊन होऊन दशरथ राजाच्या राण्यांसाठी खिरीचा प्रसाद दिला.
तसेच अंजनी सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी वायू देवतेची आराधना करत होती ,शेवटी वायूदेव प्रसन्न होऊन तिच्या पोटी जन्म घेइन असे आश्वासन दिले ,आणि अंजनी मातेने पुत्रप्राप्तीसाठी मांडीवर हाताची ओंजळ घेत शिवमंत्राचा जम करू लागली ,आकाशामधून एक पक्षाने अंजनी मातेच्या ओंजळीत सुद्धा तोच खिरीचा प्रसाद सांडला ,अशाप्रकारे अंजली मातेला सुध्दा पुत्र रत्न प्राप्त झाले .तो दिवस होता चैत्र पौर्णिमा आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते.
हनुमान नाव कसे पडले ?
हनुमानाचा जन्म झाला तेव्हा त्याने उगवता सूर्य पहिला आणि सूर्याला फळ समजून खाण्यासाठी सूर्याच्या दिशेने जाऊ लागला ,हे बघून इंद्रदेवला वाटले सूर्याला गिळायला राऊ आला म्हणून हनुमंताच्या दिशेने वज्र फेकले व ते जाऊन हनुमानाच्या हनुवटीवर लागले व हनुवटी फुटली तेव्हा पासून त्याला हनुमान असे नाव पडले असे मान्यता आहे.
लहानपणा पासून हनुमान महापराक्रमी होते त्यांनी मोठमोठ्या राक्षसांचा नायनाट केला , रावणाला सुद्धा सळो की पळो करून सोडले व सोन्याची लंका जाळली ,लक्ष्मणासाठी द्रोणाचार्य पर्वत एक हातावर उचलून आणले.
🆕 श्री हनुमान चालीसा मराठी lyrics
हनुमानाला का लावतात शेंदूर ?
हनुमानाला शेंदूर लावण्याचा वेगवेगळ्या कथा प्रचलित आहे त्यापैकीच एक अशी ही सीता मातेला एक दिवस कपाळावर शेंदूर लावताना हनुमानाने बघितली आणि कुतुहलाने विचारले की माते आपण कपाळावर शेंदूर का लावतात ? तर सीता म्हणाली माझे पती माझे परमेश्वर प्रभू श्रीरामाचे आयुष्य वाढावे म्हणून मी कपाळावर शेंदूर लावते. हनुमान सुद्धा प्रभू श्री रामाचा खूप मोठा भक्त होता आणि आपल्या प्रभू श्रीरामाच्या आयुष्य वाढवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती आणि जेव्हा शेंदूर लावल्याने आपल्या प्रभू श्रीरामाचे आयुष्य जर वाटत असेल तर मी माझा पूर्ण शरीरालाच का शेंदूर लावू नये? म्हणून हनुमानाने आपल्या पूर्ण शरीरालाच शेंदूर लागला. हनुमानाला शेंदूर लावलेले बघून प्रभू श्रीराम त्याच्यावर खूप प्रसन्न झाले आणि प्रभू श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त म्हणजेच हनुमान अशी उपमा दिली.
(ads1)
हनुमान जयंती पूजा विधी कशी करावी?
हनुमानाला संकट मोचन हनुमान असेसुद्धा म्हटले जाते म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करण्यासाठी सर्व वाईट दृष्टी दूर करण्यासाठी हनुमानाचा जप आणि त्याची रीतसर पूजा केली तर सर्व संकटे आणि दुःख दूर होतात असा लोकांचा विश्वास आहे
हनुमान जयंती साठी पूजेचे साहित्य
हनुमानाच्या पूजा विधी साठी नारळ, शेंदूर,तेल, उडीद,रुई चे पाने ,फुलांचा हार,केवडा किंवा चमेली -अंबर याची अगरबत्ती व नेवेद्य म्हणून सुंठवडा इत्यादीचा वापर केला जातो .
हनुमान जयंती पूजा कशी करावी?
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळची सर्व कामे आटपून प्रभु श्रीरामाचे व हनुमानाचे नामस्मरण करावे . शक्य असेल तर हनुमानाच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे पूजन करावे पूजा करते वेळेस मारुतीला अनामिकेने शेंदूर लावावा व हनुमानाला केवडा चमेली किंवा अंबर यांच्या अगरबत्ती ने ओवाळावे तसेच रुईचे पाने व फुलांचा हार अर्पण करावा . नंतर हनुमानाची आरती करून नारळ फोडावे अर्धा नारळ आपल्यासाठी आणि अर्धे देवाला अर्पण करावे व शेवटी पाच किंवा पाचच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्या. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला प्रसाद म्हणून सुंठवडा करावा तो प्रसाद सर्वांना वाटावे .
हनुमानाच्या उपासनेने शनी ग्रह पिडा सुद्धा दूर होते त्यासाठी आपल्याला एका वाटीत तेल घ्यावे व त्यामध्ये 14 काळी उडी टाकून त्याला आपला चेहरा भाग बहावा पहावा बघावा आणि मग नंतर ते तेल हनुमानाला व्हावे अर्पण करावे.
पुत्रप्राप्ती साठी का केली जाते हनुमानाची पूजा अर्चना ?
पुत्रप्राप्तीसाठी हनुमानाची भक्ती भावाने पूजा अर्चना करावी ,ज्यांना पुत्र नाही त्यांनी भिंतीवर शेंदुराने हनुमानाची प्रतिकृती काढून पूजा करावी व षोडशोपचारे पूजा करावी नंतर चढते उतरते कणकेचे दिवे त्यापुढे काढावे , व दर शनीवारी हनुमानाला रुईच्या पानाचा हार व फुलांचा हार अर्पण करावा .नक्कीच फळ प्राप्ती होते .