महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी | महात्मा फुले जयंती निमित्त मराठी भाषण निबंध |Mahatma phule Marathi bhashan mahiti nibandh 2021
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी मराठीत माहिती भाषण निबंध तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य शैक्षणिक कार्या विषयी मराठीत माहिती बघणार आहोत .
महात्मा फुले भाषण
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू-भगिनींना आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या...
अठरा विश्व दारिद्र उराशी असणाऱ्या
अशा हरिजन गिरीजन अडलेल्या नडलेल्या
आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या
दिन दलिताचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला
असे क्रांतिवीर महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंती चे नाव जनक महात्मा ज्योतिबा फुले !
स्वतःच्या घरा दाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यथित करणारे वंचितांचे उद्धारकर्ते...
स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन करमठ विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवले असे स्त्री शिक्षणाचे जनक ...
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 27 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला गोरे हे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले.
महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा...
सामाजिक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा...
सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले...
महात्मा ज्योतिबा फुले चारोळी
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले
ज्योतिबा हे शूद्र अतिशूद्र गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अज्ञान आहे असे म्हणत.
जैसे बोलने बोलावे ,तैसे चालणे चालावे
मग महंत लीला , स्वभावाचे अंगी बाने.
या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले.
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन त्यांनी दिले . रात्र शाळेची सुरुवात करून दारूचे दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशा असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाजसुधारणेचा झेंडा सर्वदूर फडकवला .
आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम करतो.
हे ही वाचा
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
आणि जाताजाता एवढेच म्हणेन
आधुनिक भारताचे शिल्पकार...
दीनदुबळ्यांचा बनले आधार...
यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले...
तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले...
अश्या प्रकारे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी मराठीत माहिती भाषण निबंध तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य शैक्षणिक कार्या विषयी मराठीत माहिती बघितली आहे माहिती आवडल्यास नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
🔰 हे ही वाचा 👉
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती
⏭️ ईस्टर संडे का साजरा केला जातो ?
⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण
⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण
⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण
अतिशय छान
उत्तर द्याहटवा