Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

श्री राम नवमी ची मराठी माहिती निबंध |Ram navami marathi mahiti 2022| रामनवमी कधी आहे 2022

राम नवमी ची मराठी माहिती निबंध |Ram navami marathi mahiti 2022| रामनवमी कधी आहे 2022

श्री राम नवमी मराठी माहिती निबंध 2021.jpg

नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू धर्मातील सण राम नवमी 2022 ला कधी आहे राम नवमी का साजरी केली जाते राम नवमी पूजा विधी व कथा श्री राम नवमी मराठी माहिती बघणार आहोतो.

 चैत्र शुद्ध नवमीला हिंदू धर्मातील एका आदर्श पुरुष,एक वचणी ,एकनिष्ठ, एकपत्नी ,सत्यवान व मातृ - पितृ भक्त आणि ज्यांना मर्यादापुरुषोत्तम असे सुध्दा संबोधले जाते  ते म्हणजे प्रभू श्रीराम यांचा आज जन्म दिवस !

श्री राम नवमी का साजरी केली जाते 

दर वर्षी चैत्र शुद्ध नवमी ला प्रभू श्रीराम यांचा जन्म ठीक दुपारी 12 वाजता झाला होता म्हणून हा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

जेंव्हा जेंव्हा द्रष्ट व वाईट प्रवृत्ती च्या लोकांनी पृथ्वीवासीयांना त्रास द्यायला   सुरुवात केली तेंव्हा तेंव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी भूतलावर अवतार धारण केला ,आणि प्रभू श्रीराम हे सुध्दा श्री विष्णूंचाच सातवा अवतार आहे.

राम नवमी कधी आहे 2022

या वर्षी राम नवमी 10 एप्रिल 2022 रोजी आहे .

राम नवमीची कथा 

अयोध्या चा राजा दशरथला कौसल्या सुमित्रा आणि कैकई अश्या तीन राणी होत्या परंतु एकाही राणीला पुत्र संतान नव्हते त्या मुळे राजा खूप दुःखी होता , त्यामुळे पुत्रप्राप्ती साठी राजगुरूंच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ केला , यज्ञदेवता म्हणजे अग्निदेवता प्रसन्न झाले आणि राजाच्या हातात प्रसाद म्हणून नारळ दिले ते तीनही राण्यांना प्रसाद म्हणून खायला सांगितले .प्रसाद  भक्षण केल्यावर तिन्ही राण्या ना पुत्र प्राप्ती झाली . त्यापैकी श्रीराम हे कौसल्या राणीचे पुत्र !असे ही म्हणतात की लंकेचा राजा रावणाने शंकराची आराधना करून वर  मिळवला व त्यामुळे रावण सर्वांना त्रास देऊ लागला आणि त्याचा घात करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी जन्म घेतला.



🔘 हे पण वाचा > 

🔰 हनुमान जयंती मराठी महिती व पूजा विधी 2021

➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3


राम नवमीची पूजा कशी करावी 

सकाळी लवकर उठूनआपले दैनंदिन कामे लवकर आटपून गोमूत्र व सडा टाकून घर स्वछ व पवित्र करावे .देवघरराला पताका व तोरण बांधून घ्यावा . व श्रीराम जयराम जयजय राम हा नाम जप करावा .भर दुपारी 12 वाजता कुंची घातलेला नारळ किंवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेऊन ,प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला हळद कुंकू लावून पूजा करावी व चंपा चमेली केवडा जय जुई ची फुले अर्पण करावी त्या नंतर आरती करून  रामजन्माचा पाळणा म्हणावा.व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटावा, तसेच मठ मंदिरात दिवसभर भजन किर्तीन ,प्रवचन तसेच राम गीत,गीत रामायण, रामकथेचे  आयोजन करावे .हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात व योग्य ते फळ मिळते.

राम नवमीच्या दिवशी काय करावे 

  • सकाळी लवकर उठून श्रीराम जय राम जय जय राम याचा दिवसभर जप करावा
  • या दिवशी शक्यतो उपवास पकडावा व दिवस भर मंदिरात भजन कीर्तन करावे
  • दुपारी श्रीरामाची पूजा करून आरती करावी व 12 वाजता श्रीरामाचा पाळणा म्हणावा .
  • या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान धर्म करावे त्या मुळे आपल्याला कधीच  कमतरता भासत नाही

प्रभू श्रीराम एक आदर्श पुरुष तर होतेच , तसेच ते एकवचनी व एकपत्नी व आदर्श पुत्र सुद्धा होते त्यामुळेच त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला व सीतेचे हरण केलेल्या रावणाचा वध केला म्हूनुच त्यांना मर्यादापुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते .

मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी राम नवमी वर कोरोनाचे संकट आले आहे त्या मुळे याही वर्षी आपण हा सण बाहेर मंदिरात न जाता घरीच साजरा करावा व आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.

मित्रहो राम नवमी मराठी माहिती तुम्हांला कशी वाटली याचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

🔘 हे पण वाचा > 

🆕 श्री हनुमान चालीसा मराठी lyrics

🔰 हनुमान जयंती मराठी महिती व पूजा विधी 2021

➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3

➡️. राम नवमी मराठी निबंध व माहिती

⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध

 ➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !