अक्षय तृतीया मराठी माहिती 2021 | Akshaya Tritiya 2021 in Marathi Maharashtra | akshaya tritiya puja vidhi marathi
नमस्कार मित्रांनो आजपण हिंदुधर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हणजे अक्षय तृतीया या सणाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत
अक्षय तृतीया सणाचे महत्व -
अक्षय तृतीया हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो .या सणाच्या नावातच याचे महत्त्व लपलेली आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा म्हणून या दिवशी जप तप, पूजा-अर्चना ,दानधर्म तसे तसेच होम हवन केल्यास ते कधीही ही अक्षय पावत नाही ,त्याची भरभराटी होते .
याच दिवशी भगवान विष्णूने रेणुका देवीच्या पोटी परशुराम रुपात जन्म घेतला होता म्हणून यालाच परशुराम तिथी असेही म्हटले जाते, या दिवशी पूर्ण भारत विशेषता दक्षिण भारतात परशुराम जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते तसेच या दिवशी श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांची पूजा-अर्चना केली जाते.
🔴 मोहिनी एकादशी निमित्त विठ्ठलाचे Live दर्शन घ्या !
🔘 बौद्ध पौर्णिमा मराठी माहिती व व्हाट्सएप शुभेच्छा !
हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी बरेचसे लोक गृहप्रवेश वाहन खरेदी सोने चांदी यांची खरेदी केली जाते यामुळे असे केल्यास त्यांची भरभराटी होत असते.
अक्षय तृतीया कथा पूजा विधी मराठी-
अक्षय तृतीया चा मुहूर्त कधी आहे 2021 - ( Akshaya Tritiya 2021 in Marathi Maharashtra )
या वर्षी अक्षय तृतीया 14 मे 2021 रोजी सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी सुरू होत आहे व त्याची समाप्ती 15 मे 2019 रोजी संध्याकाळी 07:59 ला संपणार आहे
अक्षय तृतीयाचे वृत्त कसे करावे -
अक्षय तृतीया ला सकाळी लवकर उठून शक्य असल्यास गंगा स्नान करावे .विष्णूचा नाम जप करावा ,याच दिवशी नरनारायण, परशुराम , हायग्रिव याचा जन्म झाला होता म्हणून त्यांच्यासाठी विविध नैवेद्य करावे जसे नरनारायण यांसाठी भाजलेले जवस किंवा गव्हाच्या पिठाचा नैवेद्य करावा परशुरामा साठी कोळी वाळके त्याचा नैवेद्य करावा आणि हायग्रीवा साठी भिजलेल्या हरभऱ्याची डाळीचा नैवेद्य अर्पण करावा .
या दिवशी विविध पदार्थांचे दान करावे जसे की जवस गहू हरभरा सातू दही भात उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ धान्य हानी उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूंचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या दिवशी पितृ श्राद्ध करून ब्राह्मणांना भोजन घालावे त्यामुळे याचे अनंत फळ मिळते तसेच या दिवशी पितृ पितृत्व पूर्ण करण्यास न जमल्यास कमीत कमी तील तर्पण तरी करावे तील।अर्पण म्हणजे आणि तेल याचे अर्पण करावे
तृतीया ला कोण कोणत्या गोष्टी दान कराव्या ?
या दिवशी दान केल्याने ती नेहमी अक्षय राहते म्हणजेच त्यामुळे या दानाला खूप महत्व आहे त्यामुळे पुण्यसंचय वाढतो, अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यामध्ये येत असल्यामुळे या दिवशी गोरगरिबांना मातीचे माठ रांजण दान करावे तसेच या दिवशी गोरगरिबांना आंबे दान करावे तसेच मिठाई गोड पदार्थ गरिबांना दान करावे पया दिवशी गोरगरिबांना वस्त्रे कापड दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी वृक्षरोपण करावे व लावलेल्या झाडाची निगा राखावी आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवड होणे यात मुहूर्तावर केल्याने त्यांची वृत्ती होते तसेच सर्वात महत्त्वाचे या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या देव-देवतांचे नामस वरून किंवा मंत्र पठण करावे असे केल्याने पुण्य अखंड टिकून राहते
अक्षय तृतीया दिवशी कुठले मंत्र पठण करावे
|| ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ||
|| सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
||ओम रारा परशुराम आय सर्व सिद्धी प्रदाय नमः||
अक्षय तृतीया चा पौराणिक कथा -
अक्षय तृतीया ची भविष्यपुराणात एका व्यापार्याची कथा सांगितलेली आहे ती अशी की - एका व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप तोटा झाला त्यामुळे तो दारिद्री झाला मग त्याने स्वतःच्या दारिद्री कालखंडामध्ये बुधवार व रोहिणी नक्षत्राचा योग साधून अक्षयतृतीयेला विविध वस्तूंचे धनधान्याची कपड्यांची दान केले आणि याचमुळे त्याला व्यापारामध्ये खूप नफा होतो त्याला धनप्राप्ती होते आणि नंतर तो कुशावती नगरीचा पराक्रमी राजा म्हणून पुढे येतो.
अक्षय तृतीया मराठी माहिती दिली 2021 | Akshaya Tritiya 2021 in Marathi Maharashtra | akshaya tritiya puja vidhi marathi
मित्रांनो अक्षय तृतीया या सणाची मराठी माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व्हाट्सअप द्वारे नक्की शेअर करा