Type Here to Get Search Results !

अहिल्याबाई होळकर मराठी माहिती भाषण निबंध | Ahilyabai holkar information in marathi 2022

अहिल्याबाई होळकर मराठी माहिती भाषण निबंध २०२२| Ahilyabai holkar information in marathi | Ahilyabai holkar bhashan marathi|ahilyabai holkar jayanti 2022 Date 

अहिल्याबाई होळकर मराठी भाषण माहिती

Ahilyabai holkar bhashan marathi 2022

आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग, सुजाण देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो,

आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती.

याबद्दल मी आज तुम्हांला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती..

होळकरांची सुन होती बहुगुणी !

शिक्षणाची ओढे होती लहानपणी !!

गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी!

अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !!

मराठ्याच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले पण  त्यामधील अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकां च्या तोंडावर आहे. अहिल्याबाईना 'पुण्यश्लोक' असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.


🆕  असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?

🆕  5 जून जागतिक पर्यावरण दिन भाषण निबंध

🆕  अहिल्याबाई होळकर व्हाट्सअप्प शुभेच्छा संदेश चारोळी


 अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे है त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसताना ही त्यांच्या वडीलांनी त्यांना लिहण्या-वाचण्यास शिकवले होते. अहिल्याबाई होळकर यांचा विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांची शी झाला. मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर इ.स. १७५४ मधे. कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही. मल्हारराव होळकर यांचा १२ वर्षानंतर म्हणजेच २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे एका मोहिमेतर असतांना त्यांना मृत्यूने गाठले.

सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या मावळा प्रांताचा कारभार अहिल्याबाई होळकर बघू लागल्या त्यांच्या पश्चात अहिल्याबाईनी आलमपुरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. अति दक्षतेने अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार चालविला शत्रू देखील त्यांच्याबद्दल आदर बाळगत असत. मंदिरांची पुनर्बाधणी, जीर्णोधार, देवतांची प्रतिष्ठापणा तसेच घाट- रस्ते, धर्मशाळा बां धणे, अन्नछत्रे चालविंगे या लोकोपयोगी कामामुळे संपूर्ण भारतभर अहिल्याबाईंचे नाव अजरामर झाले आहे.

अहिल्याबाई होळकर बालपणाची गोष्ट - 

एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेल्या होत्या तेथे नदीच्या वाळूत खेळतांना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्य दलातील एकाचा घोडा उधळला उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊल पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तीने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून शिवलिंगाचे रक्षण केले.

तेवड्यात पाठीमागून आलेल्या श्रीमतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेतली. अहिल्याबाईनी देखील मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला. व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पसरविली.

अहिल्याबाई होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभीमानी, दक्ष व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रथनेची मने जिंकली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले.

शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन

पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्हीं समाजसेवा ! 

भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा !! 

जात-धर्म विसरुन दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा! 

'अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा !!


मित्रांनो आज आपण अहिल्याबाई होळकर मराठी माहिती भाषण निबंध | Ahilyabai holkar information in marathi | Ahilyabai holkar bhashan marathi|ahilyabai holkar jayanti 2022 Date यांच्याविषयी माहिती बघितली माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !