Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वीत किती गुण मिळाले कसे चेक करावे?10th exam evaluation 2021

इ 10वीच्या विद्यार्थ्यांना सरल प्रणालीत इ 9वी मध्ये किती गुण मिळाले कसे चेक करावे? 10th exam evaluation 2021

 इयत्ता 10th 2021 च्या परीक्षा covid-19 प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत इयत्ता , दहावी चे मूल्यमापन करण्यासाठी दहावी महाराष्ट्र बोर्ड एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्यामध्ये आपल्याला इयत्ता दहावीच्या  विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा प्रकारे करायचे याचे परिपत्रक अगोदरच  बोर्डाकडून आपल्याला प्राप्त झाले आहे तुम्ही सदरील परिपत्रक वाचले नसतील तर खाली दिलेल्या लिंक वरून ते परिपत्रक वाचू शकता 

10वी मूल्यमापन परिपत्रकानुसार विद्यार्थ्याच्या -

  • इ. ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल 100 गुणांचे - 50 गुणात रूपांतर
  • इ. १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 100 गुणांचे - 30 गुणात रूपांतर
  • इ.१० वी चे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत - 20 गुण

अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला 

50 + 30 + 20 = 100 

गुणांचे मूल्यमापन करायचे आहे


✡️  इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर


🔴 महत्वाचे - 

नववीचे 100 गुणाचे रूपांतर 50 गुणांमध्ये करतेवेळेस सरल प्रणाली मध्ये नोंदवलेले गुण आणि आपण संगणक प्रणाली मध्ये  भरणार असलेले गुण हे दोन्ही सारखेच असले पाहिजे असे परिपत्रकात म्हंटले आहे , आणि त्याची पडताळणी विविध पथकांद्वारे केली जाणार आहे. त्या मुळे गुण काळजीपूर्वक भरावे .

🔴 लक्षात घ्या सरल प्रणालीत फक्त एकूण गुण बघता येतात आपल्याला विषयनिहाय गुण भरायचे आहेत. विषय निहाय गुण आपल्याला मागील वर्षीच्या निकाला वरून भरायचे आहेत, सरल प्रणालीत भरलेले एकूण गुण व आपल्या वार्षिक निकालातील एकूण गुण सारखेच असले पाहिजे . कारण आपण भरलेले गुण हे सरल प्राणलीतील गुणांद्वारे पडताळणी केली जाणार आहे परिपत्रकानुसार !

 सरल प्रणाली मध्ये आपण इ 10 वीच्या विद्यार्थ्यांना नववी मध्ये  किती गुण भरले / किती गुणांनी तो विद्यार्थी पास झाला हे बघू शकतो!.

💗 राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा संदेश


 1) त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन लॉगिन करायचे आहे 


10वी मूल्यमापन 2021


2) त्या नंतर आपल्याला 9th 12th promotion या टॅब वर क्लिक करायचे आहे 


10वी मूल्यमापन 2021


3)  नंतर आपल्याला आपण मागील वर्षी प्रमोशन केलेले इयत्ता निहाय विद्यार्थी संख्या व तुकडी दिसेल , त्या पैकी आपल्याला 10th standard (SSC) समोरील विद्यार्थी संख्या वर क्लिक करायचे आहे

10वी मूल्यमापन 2021

4) त्या नंतर आपल्या समोर विद्यार्थी यादी व त्यांना आपण इ 9 वी मध्ये किती गुण दिले होते ते बघू शकतो !


10वी मूल्यमापन 2021

अशाप्रकारे आपण इ 10वी च्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी मध्ये किती गुण दिले ते बघू शकतो .
माहिती आवडल्यास खाली दिलेल्या व्हाट्सअप्प बटन वर क्लिक करून नक्की शेअर करा धन्यवाद.

हे पण वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !