Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी माहिती घोषवाक्य शुभेच्छा भाषण | Jagtik paryavaran divas marathi nibandh bhashan wishes

जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी माहिती भाषण |world environment day 2021 theme in india | जागतिक पर्यावरण संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?jagtik paryavaran divas marathi nibandh  जागतिक पर्यावरण दिन घोषवाक्य घोषवाक्ये| Environmental Slogans 


जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी माहिती भाषण |

Table of contents (toc)

5 जूनला जागतिक पर्यावरण दिन world environment day 2021 जगभर साजरा केला जातो त्याला एनवोर्मेन्ट डे , इको डे किंवा शॉर्टफॉर्ममध्ये डब्ल्यू ई डी असेही म्हणतात .पर्यावरण दिवस हा खऱ्या अर्थाने पीपल दे असतो मानवाने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काहीतरी कृती करण्याचा हा दिवस आहे .

पर्यावरण म्हणजे काय ?

एनवोर्मेन्ट साठी मराठी मध्ये पर्यावरण हा शब्द वापरला जातो एनवर्मेंट हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे एनवर्मेंट म्हणजे सराउंडिंग म्हणजेच भवताल सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आतर प्रक्रियेपासून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

पर्यावरण दिन का साजरा केला जातो इतिहास काय आहे ? 

स्वीडन ने त्यांची राजधानी स्टॉकहोम येथे दिनांक 5 जून ते दिनांक 16 जून 1972 या कालावधीमध्ये मानवी पर्यावरण या विषयावर परिषद आयोजित केली या परिषदेत एकूण 114 ते सहभागी झाले होते या परिषदेत मानव व पर्यावरण यांच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातून पर्यावरण कृती आराखडा तयार करण्यात आला त्यात 109 शिफारसी करण्यात आल्या होत्या त्यानुसार 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रॅम याची स्थापना करण्यात आली व त्यावर नैसर्गिक पर्यावरणाच्या संरक्षणाच्या जागतिक प्रयत्नांचे समन्वयक करण्याची जबाबदारी देण्यात आली, तसेच जागतिक पातळीवर एक दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले .


🆕 असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?


जागतिक पर्यावरण संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?

 जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 5 जून 1974 ला प्रथम जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 5 जून ला साजरा केला जातो , तसेच दरवर्षी  वेगवेगळ्या देशांना हा दिवस साजरा करण्यासाठी यजमानपद दिले जाते तसेच प्रत्येक वर्षी एक नवी थीम या दिवसासाठी ठरवली जाते.

पहिल्या पर्यावरण दिनाची थीम काय होती ?

 5 जून 1974 ला प्रथम साजरा केलेल्या पर्यावरण दिनाचे यजमानपद अमेरिकेला देण्यात आले होते व त्या वर्षीची थीम होती 'केवळ एक पृथ्वी'. 

भारताला पर्यावरण दिनाचे यजमान पद कधी मिळाले?

भारताला प्रथम इसवी सन 2011 मध्ये व नंतर इसवी सन 2018 अशा दोन वेळा हा दिवस साजरा करण्यासाठी च्या यजमानपदाचा मान मिळाला. इसवी सन 2011 ची थीम होती ' वन निसर्ग आपल्या सेवेची'  व इ सन 2018 थीम होती ' प्लास्टिक प्रदूषणावर मात'.

या वर्षी 2021 च्या पर्यावरण दिनाची थीम कोणती आहे ?

world environment day 2021 theme in india? 
विश्व पर्यावरण दिवस 2021 थीम ? vishwa paryavaran diwas ki theme ? 

2021 च्या जागतिक पर्यावरण दिवसाचे यजमानपद प्रथमच पाकिस्तान या राष्ट्राला मिळाले आहे. "Ecosystem Restoration " परिसंस्थांचे पुर्नसंचयन " निसर्ग व प्राकृतिक घटकांशी सुलभ करण्यावरता ळमेळ प्रस्थापित या वर्षी जोर दिला जाईल. 

 या वर्षी या दिनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्याला पर्यावरणाचे, या निसर्गाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात आले आहे.


🆕  अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण


🆕  अहिल्याबाई होळकर व्हाट्सअप्प शुभेच्छा संदेश चारोळी


पर्यावरण दिन का साजरा केला जातो ?

माणसाने निसर्गाला स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखे वापरून घेतले. वृक्ष काटणी, जंगल छाटणी, खनिज शोधासाठी खाणी खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर, हवा, नद्या, समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. या पृथ्वींवरील कितीतरी प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती माणसांमुळे नष्ट झाल्यात.

टास्मानियन वाघ, आफ्रिकन गैंडा, डोडो बदक ह्या सारखे प्राणी आपण फक्त आत्ता चित्रात बघू शकतो.हि जैवविविधता आपण जपली पाहिजे. या पर्यावरण संवर्धनासाठी, आपण नागरिकांनी जागरूक होण्यासाठी या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हा पर्यावरण दिन साजरा केला जातो.

पृथ्वीवर वेळी-अवेळी पाऊस, भूकंप, पेटलेले वणवे, अचानक येणारी वादळे याकडे आपण सजगपणे पाहिले पाहिजे. मानवी जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपलेच संवर्धन आहे.

जागतिक पर्यावरण दिन घोषवाक्य घोषवाक्ये| Environmental Slogans 

दारी वृक्षाचा पाहारा, देऊ पक्षाला आसरा , दारी वृक्षाचा पाहारा, देऊ पक्षाला आसरा ! *जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हांला हवी असेल उभी रहायला सावली… तर झाडे लाव पावलोपावली..*जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

 Happy world environment day 2021

 झाडे लावूया भारंभार, शिवार होईल आपले हिरवेगार ! *जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

World Environment day wishes 2021

व्रक्ष लावा तुमच्या दारोदारी ... आरोग्य येईल आपल्या घरोघरी *जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

पर्यावरण संरक्षण कसे करावे ? 

आपण लहान मुलेसधा या महत्त्वाच्या कामौत खारीचा वाटा उचलू शकतो. घरातला कचरा औंला व सुका वेगळा करू शकतो.

घरात व गच्चीत विविध झाडे लावू शकतो. प्लास्टिकचा कमी वापर करून असेलेले प्लास्टिक विघटनासाठी वेगळे करू शकतो. आजूबाजूच्या पक्ष्यांची काळजी घेऊ शकतो.

आणि म्हणू शकतो....

पर्यावरणाची धर तू कास होईल मानवाचा विकास | पर्यावरणाची काळजी कर आता मीच खरा रक्षणकर्ता.... ।।

-धन्यवाद.

🆕 अखेर 12वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा रद्द !


🆕 इ 10 वीच्या श्रेणी विषयाच्या परीक्षा घ्याव्या लागणार ! बोर्डामार्फत आल्या सूचना


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !