Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गुरुपौर्णिमा भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी शुभेच्छा संदेश | guru purnima speech bhashan in marathi

गुरुपौर्णिमा निबंध भाषण सूत्रसंचालन चारोळी शुभेच्छा संदेश | Guru purnima 2022 marathi mahiti Bhashan 


नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा बद्दल मी तुम्हाला थोडक्यात मराठी माहिती सांगणार आहे या माहितीच्या आधारे आपण गुरुपौर्णिमा च्या दिवशी विशेष भाषण तसेच गुरुपौर्णिमा निबंध तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी लागणारे सूत्रसंचालन किंवा गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश किंवा चारोळी त्यासाठी या लेखाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला तर गुरु पौर्णिमे विषयी मराठी माहित भाषण बघूया.
गुरुपौर्णिमा मराठी भाषण निबंध
गुरुपौर्णिमा मराठी भाषण निबंध


गुरुपौर्णिमा निबंध भाषण सूत्रसंचालन चारोळी शुभेच्छा संदेश | Guru purnima 2022 marathi mahiti Bhashan | guru purnima speech in marathi


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो.
गुरु म्हणजे निष्ठा - कर्तव्य 
गुरु म्हणजे  श्रद्धा - भक्ती 
गुरु म्हणजे विश्वास - वात्सल्य
गुरु म्हणजे एक आदर्श व
प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतीक!

गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमा , पौर्णिमा म्हणजे प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशा प्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या गुरूंना वंदन पूजन करण्याचा हा दिवस . गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आपण पाहतो व  गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस , याच दिवशी गुरू व्यास यांचा तिथीनुसार जन्म झाला होता म्हणून याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आपल्याला ज्ञान देतो सन्मार्ग दाखविला तो गुरु , द्रोणाचार्य एकलव्य  अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आकार देणाऱ्या आहेत अश्या गुरूंना माझे वंदन असो.

ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तु' असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कुंभार मातीच्या गोळ्याला जसा आकार देऊन त्यापासून सुंदर असे मडके घडवतो तसेच  गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात.

📲 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे तसेच गगनाप्रमाणे विशाल आहे. आपण त्यांच्यापुढे नम्र होऊन ते ज्ञानकण वेचले पाहिजेत.

कारण गुरुविण कोण दाखविल वाट .....

आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणास पाहायला मिळतात.मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते .आई ही आपला पहिला गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आणि कण  आपला गुरू असतो आणि त्यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळत असतात.

गुरूच्या उपकाराने जेव्हा आपले मन भरून जाते तेव्हा आपल्या मुखातून आपोआपच शब्द बाहेर पडतात ते म्हणजे 

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु 
गुरुर्देवो महेश्वरा
 गुरु साक्षात परब्रम्ह 
तस्मै श्री गुरवे नमः 

जसे पाणी, झाडे,वेली, पाने, फुले, पशु, पक्षी, समुद्र, नदी त्याचबरोबर पुस्तके, आपले नातलग, मित्र-मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरू आहेत जे आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. गुरूला वयाचे, जातीचे बंधन नसते.

आता काळ बदलला आहे. शिक्षणपद्धती बदलली आहे. गुरु आणि शिष्य नाते मात्र बदलले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होवून गेल्या, त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमिट प्रभाव होता. आपल्या गुरूंचाही आपल्यावर खूप प्रभाव असतो.

गुरूप्रमाणे शिष्य घडत असतो त्यामुळे आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे , त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूंचा तसेच शाळेचा, आई वडिलांचा, देशाचा, नावलौकिक वाढवायला हवा.

गुरु अज्ञानाचा अंधकारातून बंद झालेल्या मनुष्याचे डोळे ज्ञानरूपी किल्लीने उघडत असतो. जन्म देणाऱ्या आई वडील , शिक्षणाची गोडी लावणारे शालेय शिक्षण ,ज्यांनी मला जीवनात सामर्थ्य बणायला सार्थक दिले त्या गुरूंना मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

शेवटी ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे...

सद्गुरु सारिखा असता पाठीराखा
 इतरांचा लेखा कोण करी
 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो 
आता उतरलो गुरुकृपेने

धन्यवाद 

मित्रांनो गुरु पूर्णिमा विषयी भाषण अशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडले असेल गुरु पौर्णिमेचे हे भाषण आपण आपल्या मित्रांना व सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करून गुरुपौर्णिमेची बद्दल माहिती व्हाट्सअप ग्रुप फेसबुक वर शेअर करा विनंती

🎯 गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन pdf


🎯 गुरुपौर्णिमा भाषण निबंध व्हिडीओFAQ 

Q.गुरुपौर्णिमा कधी आहे 2022 ?
Ans- 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमा आहे.
Q. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?
Ans - आपल्या गुरूच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
Q. गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाते ? 
Ans- आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते 

🔘 हे पण वाचा  -

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdfटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !