Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

एकदम सोप्पा श्री कृष्णाचा पाळणा मराठी lyrics pdf | krishna cha palna marathi | pahilya divashi palana in marathi

एकदम सोप्पा श्री कृष्णाचा पाळणा मराठी lyrics |shri krishna cha palna marathi 2022 | pahilya divashi palana in marathi lyrics |shri krishna janmashtami palna | gokulashtami palna marathi pdf mp3 


हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी. गोकुळाष्टमी (श्री कृष्ण जयंती 2022) हा सण 18 ऑगस्टला साजरा करण्यात येत आहे. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या श्री कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता त्यामुळेच या दिवशी श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी असेही म्हटले जाते . विविध भागात या सणाला विविध असे नाव हवे आहेत नावे आहेत कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी अष्टमी रोहिनी श्रीकृष्णजयंती असेदेखील या सणाला नावे आहेत .

जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर धर्माचा नाश होत असेल, पाप अत्याचार वाढत असेल तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे. श्रीकृष्णाचा आठवा अवतार या दिवशी झाला म्हणूनच याला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी असे म्हटले जाते. कृष्ण जन्माष्टमी च्या आदल्या दिवशी रात्रभर श्रीकृष्णाचे कीर्तन पूजन भजन केले जाते ठीक बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन श्रीकृष्ण जयंती ची श्रीकृष्णाची आरती म्हटली जाते व त्याची पूजा केली जाते व नंतर श्रीकृष्ण साठी खीर व सुंठवडा याचा प्रसाद केला जातो.


श्री कृष्णाचा पाळणा मराठी lyrics [shri krishna cha palna marathi ]


पहिल्या दिवशी जन्मले बाळ 

कळस सोन्याचा देते डहाळ

 कृष्ण जन्मला कंसाचा काळ 

जो बाळा जो जो रे जो |१|


दुसऱ्या दिवशी दुसरा रंग 

रूप सावळे गोरस रंग

जसा झळकतो आरस्याचा भिंग 

जो बाळा जो जो रे जो |२|


तिसऱ्या दिवशी आनंद मोठा 

सिता सावित्री बायांनो उठा 

खारीक खोबरं साखर वाटा 

जो बाळा जो जो रे जो |३|


चवथ्या दिवशी बोलली बाई 

अनुसयेने वाजवली टाळी 

कृष्ण जन्मला यमुना स्थळी 

जो बाळा जो जो रे जो |४|



shri krishna janmashtami palna 2022


पाचव्या दिवशी सटवाई चा वेढा 

लिंबू नारळ देवीला फोडा 

तान्ह्या बाळाची दृष्ट गं काढा 

जो बाळा जो जो रे जो|५|


सहाव्या दिवशी कलीचा मारा 

राधाकृष्णाला घालती वारा 

चला यशोदा आपुल्या घरा 

जो बाळा जो जो रे जो|६|


सातव्या दिवशी सटवीचा महाल

तेथे सोनेरी मंडप लाल 

यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं 

जो बाळा जो जो रे जो|७|


pahilya divashi palana in marathi lyrics 


आठव्या दिवशी अटकी चा थाट 

भुलल्या गवळणी तिनशे साठ 

श्री कृष्णाची पाहतात वाट 

जो बाळा जो जो रे जो|८|


नवव्या दिवशी नववीचा खंड 

तान्या बाळा ने घेतला छंद 

'वासुदेवाचा सोडवावा बंध 

जो बाळा जो जो रे जो |९|


दहाव्या दिवशी दहावीची रात 

"तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून 

टाकती माणिक मोती 

जो बाळा जो जो रे जो |१०|

कृष्णाचा पाळणा pdf डाउनलोड करा (download)


shri krishna janmashtami palna 


अकराव्या दिवशी नारद बोले

 देवा तुम्ही हो किती झोपले 

मथुरा नगरीत देवकीचे हाल 

जो बाळा जो जो रे जो |११|


बाराव्या दिवशी बाराचं नारी 

पाळणा बांधीला यशोदा घरी 

त्याला लाभली रेशमी दोरी 

जो बाळा जो जो रे जो |१२|


तेराव्या दिवशी बोलली बाळी

 श्री कृष्ण जन्मला यमुना तळी

 गवळणी संगे लावीतो खळी 

जो बाळा जो जो रे जो |१३|


gokulashtami palna marathi pdf mp3 


 चौदाव्या दिवशी तोफा गर्जती 

शंकर पार्वती नंदी वर येती 

बाळाच्या डोळ्यात काजळ घालती 

जो बाळा जो जो रे जो |१४|


पंधराव्या दिवशी नौबत वाजे 

श्रीकृष्णावरती घातला साज 

यशोदा मातेला आनंद आज 

जो बाळा जो रे जो |१५|


सोळाव्या दिवशी सोहळा केला

 गुरु महाराज विद्या बोलला 

श्रीकृष्णाचा पाळणा गायीला 

जो बाळा जो जो रे जो |१६|

|| समाप्त ||

हे पण वाचा 


🆕 श्री कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी

श्री कृष्णाचा पाळणा मराठीत ऐका दाखवा बघा




सणाचे नाव श्री कृष्ण जन्माष्टमी
श्री कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? 18 ऑगस्ट 2022
श्री कृष्णाची पूजा कधी करावी ? 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 12 वाजता .
गोकुळाष्टमी पूजा वेळ मुहूर्त 18 ऑगस्ट 21 रोजी 00.04 पासून ते 00.49

एकदम सोप्पा श्री कृष्णाचा पाळणा मराठी lyrics |shri krishna cha palna marathi 2022 | pahilya divashi palana in marathi lyrics |shri krishna janmashtami palna | gokulashtami palna marathi pdf mp3 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !