Type Here to Get Search Results !

वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण निबंध | vachan prerna din marathi nibandh bhashan 2022

वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण निबंध | डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी माहिती निबंध| vachan prerna din marathi nibandh bhashan 2022.


नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो आज 15 ऑक्टोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  यांच्या जयंती निमित्त दरवर्षी आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो . 15 ऑगस्ट ला  वाचन प्रेरणा दिनाचे भाषण निबंध वृत्तांत लेखन आपल्याला या दिवशी करावे लागत असते,  त्यासाठीच आम्ही आपणासाठी वाचन प्रेरणा दिनाचे भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळ्या घेऊन आलो आहोत याचा नक्कीच तुम्हाला वाचन प्रेरणा दिनाच्या भाषणासाठी सूत्रसंचालन कविता चारोळ्या साठी नक्कीच फायदा होईल. चला तर वाचन प्रेरणा दिनाचे भाषण निबंधाला सुरुवात करूया.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी माहिती  

साऱ्या भारत देशातील विद्यार्थी युवकांसाठी आदर्शचा दीपस्तंभ  करावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होय. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 15 ऑक्टोबर हा जन्मदिन आपल्या देशात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात जातो.

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोंबर १९३१ मध्ये भार तातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम होय. कलामांचे वडील जैनुला बदिन हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. ते रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. त्यांचे वडील व नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते. त्यांच्यातील अध्यात्मिक लक्ष्मणशास्त्री चर्चा कलाम ऐकत असत.


वाचन प्रेरणा दिन निबंध भाषण  | vachan prerna din marathi nibandh bhashan 2022


ग्रंथ आमुचे साथी..ग्रंथ आमुच्या हाती.. 
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या... अंधाराच्या राती । 
या ग्रंथांच्या तेजामधुनी ,जन्मा येते क्रांती,
ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती 
निराश जीवा धीर धरूनी पढे घेऊनी जाती. 
ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती.
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या... अंधाराच्या राती..

 माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते आजोबांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन, मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात. तास न तास टी. व्ही. समोर बसणारी माणसं , स्वतःसाठी दररोज चार ओळी वाचायलाही तयार नाहीत. परिणामी संस्कृती लोप व्हायला सुरुवात झाली आणि मग पुन्हा सांगण्याची वेळ आली, “वाचाल तर वाचाल!”

मित्रहो वाचन हा फक्त विरंगुळा नाही तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे. कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जनाचा प्रमुख हेतू वाचनामागे असतो.

आपण खरं तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे . वाचन लहानपणी ज्ञान देण्याचं काम करतं . तारुण्यात शील रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम करतं आणि वार्धक्याच्या काळात दुखः हरण करून आनंद देण्याचं काम करत.

बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत म्हणजेच संपूर्ण जीवनात मानवाला साथ देण्याचे आणि संकटातून वाचवण्याचे काम वाचन करते.

ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर म्हणतात , वाचनाने माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांमध्ये अधिकच सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी लढण्याचे सामर्थ्य वाचनानेच दिले. वाचानासाठी आपल्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. कथा, कादंबरी, ललित गद्य ,महाकाव्य ,इ वाङ्मयचा डोंगरच आपणासमोर उभा आहे. कमी आहे ती फक्त वाचणाऱ्यांचीच आणि म्हणूनच वाचन संस्कृती मरते आहे. असे म्हणण्याची वेळ आली आहे. अगदी विद्यार्थीदेखील पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके वाचण्यास तयार नाहीत.


परीक्षेच्या अगोदर केवळ गाईड्सवरच काम होत आहे.
अभ्यासाला वेळ नाही, शॉर्टकटचा काळ आहे । 
पुस्तके बाजारात मिळत नाहीत, गाईड्सचा सुकाळ आहे. 
प्रार्थना पसायदान पाठ नाही. आणि सिनेमाची गाणी मात्र सारी तोंडपाठ आहेत ।


एक प्रख्यात तत्वज्ञ अनंत देसाई वृद्धापकाळात पुस्तक उचलत नाही म्हणून पुस्तकाची पाने फाडून ती हातात धरून वाचत असत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वयाच्या ९० व्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपत नसत. अशा प्रकारे वाचनाच्या तपश्चर्येमुळे ही माणसं विद्वान आणि अजरामर झाली.

आज जे साक्षर आहेत, ज्यांना चांगले वाचता येते असे लोक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या मनात निरक्षर असल्याची उणीव भासत आहे . म्हणूनच वाचन संस्कृती जपायची असेल तर, .वाचकांचा वर्ग वाढला पाहिजे. तसेच संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे. याचा उपयोग वाचकांनी केला पाहिजे.

आज प्रत्येक घरात देवघर आहे तसेच ग्रंथघर ही असायलाच पाहिजे .प्रत्येक गावात मोबाईल टॉवर नसला तरी चालेल पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय आणि प्रत्येक हातात मोबाईल ऐवजी एक पुस्तक असलेच पाहिजे. कारण मोबाईल आणि टॉवरमुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येईल  पण संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालय, त्यातील पुस्तके आणि त्यामार्फत होणाऱ्या संस्कारामार्फतच शक्य होईल.

शेवटी एवढेच म्हणेन,

A room without books is a body without soul.


हे पण वाचा - 


🎯 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिनाचे सूत्रसंचालन

➡️ वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन pdf

🎯 वाचन प्रेरणा दिन फलक लेखन

➡️ वाचन प्रेरणा दिन फलक लेखन pdf


डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी काही प्रश्न


Q. डॉ ए पी जे अब्दुल कलाम कोण होते ?

Ans. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती, प्रसिध्द वैज्ञानिक तसेच महान लेखक होते.

Q. वाचन प्रेरणा दिन कधी असतो ?

Ans. वाचन प्रेरणा दिन दरवर्षी 15 ऑक्टोबर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला जातो.

Q. वाचन प्रेरणा दिन का साजरा केला जातो ?

Ans. वाचन प्रेरणा दिन दरवर्षी 15 ऑक्टोबर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !