Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

भाऊबीज मराठी माहिती 2021 कथा, पूजा विधी , मुहूर्त | Bhaubeej wishes for brother & Sister in marathi

भाऊबीज मराठी माहिती 2021 कथा, पूजा विधी ,व मुहूर्त | Bhaubeej wishes for brother & Sister in marathi | bhaubeej quotes in marathi for brother & Sister


नमस्कार मित्रांनो आज आपण दिवाळीच्या 5 व्या व आवल्या लाडक्या बहिणीचा लाडका सण ज्या सणांची बहीण आतुरतेने वाट पाहात असते तो सण म्हणजे भाऊबीज या सणा बद्दल मराठीत माहिती सांगणार व दाखवणार आहे तसेच भाऊबीज साठी बहिणीसाठी व भावासाठी भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश व इतिहास कथा सांगणार आहे.


भाऊबीज माहिती व शुभेच्छा संदेश (toc)

भाऊबीज कधी साजरी करतात 2021?

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे.  हा सण भाई टिका, यम द्वितीया इत्यादी नावाने देखील ओळखला जातो.  कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला हा सण साजरा केला जातो.  


भाऊबीज महत्व 2021 

या दिवशी बहिणी आपल्या भावांना कपाळाला टिळक लावतात आणि त्यांना दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देतात. 'बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहों. ही त्यामागची भूमिका आहे. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो


 भाऊबीज चा पूजेचा मुहूर्त |भाऊबीज ला भावाला कधी ओवाळावे ? |भाऊबीज भावाला ओवालायची शुभ वेळ कोणती ?

 भाऊबीज दुपारची वेळ - दुपारी 01:10 ते दुपारी 03:21 पर्यंत

 कालावधी - 02 तास 11 मिनिटे

 दुसरी तारीख सुरू - 05 नोव्हेंबर 2021 रात्री 11:14 वाजता.

 दुसरी तारीख संपेल - 06 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 07:44 वाजता.


सणाचे नाव भाऊबीज 2021
भाऊबीज मुहूर्त दुपार  दुपारी 01:10 ते दुपारी 03:21 पर्यंत
भाऊबीज मुहूर्त रात्री रात्री 11:14 वाजता.
भाऊबीज संपेल 06 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 07:44 वाजता.


🎇 भाऊबीज कथा इतिहास / आख्यायिका

 मान्यतेनुसार, या दिवशी मृत्यूचे देवता यमराज आपली बहिण यमुना हिला अनेक वेळा बोलावून त्यांच्या घरी गेले.  यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि टिळक करून त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली.  प्रसन्न होऊन यमराजाने आपली बहीण यमुना हिला वर मागायला सांगितले.  यमुना म्हणाली तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळक लावेल ती तुला घाबरणार नाही.  यमराजाने यमुनेला वरदान दिले.  या दिवसापासून भाई दूज उत्सवाला सुरुवात झाली असे म्हणतात.


भाऊबीज कशी साजरी करतात | भाऊबीज का साजरी करतात| भाऊबीज ओवाळणी ताटात काय असावे व कसे असावे ?



भावाची पाषाणापासून म्हणजेच मृत्यू पासून सुटका व्हावी आणि भावाला दीर्घायुषी व्हावा यामागे हा खरा उद्देश असतो .भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो किंवा बहिणीला आपल्या घरी घेऊन येतो व  त्या दिवशी बहिनिणे भावासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, करंजी, गुलाबजामून, चकली, चिवडा असे पदार्थ करून खाऊ घालते.

 भाऊबीज च्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर सकाळी बहीण भावाला उटने लावून आंघोळ घालते व संध्याकाळी एका पाटावर बसवून दिवा, हळद-कुंकू, अक्षीद हे सर्व ताटात घेऊन ताट सजवतो व  आधी चंद्राला व नंतर आपल्या भावाला ओवाळते व दहीभाताचा गोड नैवद्द चंद्राला दाखवते.आपल्या भावाला गोड पदार्थांचे जेवण खाऊ घालते. अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने महाराष्ट्रात साजरा करतात.


बहिणीला भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी 2021

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात... ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


ताईला / भावाला भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी 2021

फराळाचा गोडवा, दिव्यांचे तेज सुखाच्या अतिषबाजींनी बरसू दे तुझे आयुष्य आनंदाच्या पावलाने दरवर्षी अशीच दिवाली येवो भाऊबीजेच्या दिवशी औक्षण-ओवाळणीने आपले नाते वृद्धिंगत होवो भाऊबीजेच्या शुभेच्छा !


ताईला भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

लढणार्या बहिणीला साथ मिळो भावाची मायेच्या औक्षणाने उजळावी नात्याची प्रीती दिवाळीच्या सणात भाऊबीजेचा गोडवा असाच वृद्धिंगत राहो स्नेह आपला भाऊबीजेच्या शुभेच्छा ताईला !


bhaubeej wishes in marathi |भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

पहिला दिवा आज लागला दारी सुखाची किरणे येई घरी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा


happy bhaubeej in marathi 2021

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण... भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा


bhaubeej quotes in marathi for brother

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाढतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!


bhaubeej wishes in marathi for sister

आईप्रमाणे काळजी घेतेस बाबांप्रमाणे धाक दाखवतेस सतत माझी पाठराखण करतेस ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा


bhaubeej quotes in marathi

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे... भाऊबीजेच्या शुभेच्छा!


भाऊबीज च्या बहिणीला हार्दिक शुभेच्छा।

बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा.. हीच खरी भाऊबीज ...!! भाऊबीज च्या शुभेच्छा


happy bhaubeej wishes in marathi | भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

आजच्या दिवसासाठी खास हि कविता अस हे भाऊ बहिणीच नात क्षणात हसणार, क्षणात रडणार क्षणात मारणार, क्षणात मार खाणार क्षणात भांडणार, पण किती गहर प्रेम असत हे दोघाच अस असत हे बहिण भावाच अतूट नाते


bhaubij images banner download marathi

  1. भाऊबीज , कुठलाही नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणींच हे नातं खूप खूप गोड आहे ,भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा


bhaubeej chya shubhechha in marathi

बहिणीची असते भावावर अतूट माया मिळो त्याला अशीच प्रेमाची छाया,भावाची असते बहिणीला साथ मदतीला देतो नेहमीच हाथ. भाऊबीज व्या हार्दिक शुभेच्छा


☸️ हे पण वाचा - 

🆕 दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

🆕 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

🆕 दिवाळी महालक्ष्मी पूजा कशी करावी व मांडावी वाचा

🆕 दिवाळी साठी 100 + रांगोळी डिजाईन फोटो

🆕 वसुबारस मराठी माहिती व पूजा विधी शुभेच्छा संदेश

 🆕 वसुबारस रांगोळी फोटो

🆕 नरक चतुर्दशी मराठी माहिती पूजा विधी व शुभेच्छा संदेश

🆕 धनत्रयोदशी रांगोळी फोटो व माहिती

🆕 वसुबारस मराठी माहिती व शुभेच्छा संदेश



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !