Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महा स्टुडंट अँप डाउनलोड कसे करावे | Maha student app download

महा स्टुडंट अँप डाउनलोड कसे करावे|Maha student app download | महा स्टुडंट अँप वर रजिस्ट्रेशन कसे करावे व शिक्षक व विद्यार्थी हजेरी कशी घ्यावी


राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्याथ्र्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्याथ्र्यांची व शिक्षकाची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent ॲप द्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. यानुसार विभागामार्फत MahaStudent हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नादविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ॲप मुळे शिक्षकांना विद्याध्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲप चे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्याथ्र्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

3. तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.


महा स्टुडंट अँप डाउनलोड कसे करावे|Maha student app download 

  1. Step 1- playstore वर जाऊन Mahastudent हे अँप सर्च करा
  2. Step-2- Install बटन वर क्लिक करून इन्स्टॉल करा
  3. Step 3 - mahastudent अँप ओपन करून रजिस्ट्रेशन करा.


Download MahaStudent App



महा स्टुडंट अँप वर रजिस्ट्रेशन कसे करावे ?

महा स्टुडन्ट ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून रजिस्टेशन करावे . शाळेचे नाव यु-डायस नंबर , मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचे नाव शिक्षकांची नाव तुकडी व वर्ग संख्या व वर्ग शिक्षकाचे नाव ही सर्व माहिती महा स्टुडन्ट ॲप मध्ये रजिस्ट्रेशन करते वेळेस लागणारा आहे 

महा स्टुडंट अँप वर विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी कशी घ्यावी ?

महा स्टुडन्ट ॲप वर विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी घेण्यासाठी मास्टर इट ॲप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षकांची वर्ग शिक्षकांनी आपली वर्गाची हजेरी त्या ॲप मध्ये नोंदवायची आहे त्याबाबत सविस्तर माहिती लवकरच ब्लॉगवर देण्यात येईल


☸️ हे पण वाचा ➡️

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !