Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिवाजी महाराज भाषण मराठी | shivaji maharaj speech in marathi | shivaji maharaj bhashan marathi 2023

शिवाजी महाराज भाषण मराठी | shivaji maharaj speech in marathi | shivaji maharaj bhashan marathi | shivaji maharaj information in marathi Pdf | शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती 2023


नमस्कार आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी माहिती इतिहास pdf वाचणार आहोत या माहितीचा  आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषण कडक लिखित लिहिलेले निबंध शायरी  सूत्रसंचालन तसेच छत्रपती शिवाजी महाराज शायरी करण्यासाठी वापर करू शकता असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला या भाषणाचा उपयोग शाळेमध्ये छोटे-छोटे भाषण लेखन  देण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.



🚩 छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन| shivaji maharaj bhashan marathi 2023

शिवजयंती भाषण मराठी चारोळी शायरी


सह्याद्रीच्या छाताडातून,

नाद भवानी गाजे

काळजात राहती अमुच्या,

रक्तात वाहती राजे !!

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो

तुफानं मातीचा राजा !

निधड्या छातीचा

दनगड कणांचा

मराठी मनांचा

भारत भूमीचा एकच राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा

मुजरा 🙏


सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित तरुण व तडपदार शिवभक्तांना.सर्वांना माझा नमस्कार....

आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज |

१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत दुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला.

तर दादोजी कोंडदेव यांनी युध्दकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युध्द कलांचे प्रशिक्षण घेतले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जावून जीवाला जीव देणाच्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.


🚩 शिवाजी महाराज इतिहास व वंशावळ


शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेव, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धूळीत पाडले.आणि राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले गुलामगिरी नष्ट केली रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला.

६ जून १६७४ रीजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याण कारी व न्यायप्रिय राजा मिळाला. अश्या ह्या महापराक्रमी राजाचे ३ एप्रिल १६८० मध्ये शिवरायांचे निधन झाले.

शेवटी जाता जाता एवढेच बोलेल 

राजे तुम्ही होतात म्हणून दिसले 

मंदिरांना कळस आन दारात तुळस 

राजे तुम्ही होतात म्हणून दिसले 

मंदिरांना कळस आन दारात तुळस 

राजे तुम्ही होतात म्हणून 

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश चारोळी शायरी स्टेट्स मराठी मध्ये राहिले सुहासिनींचे कपाळ

आन हिंदवी स्वराज्याची सकाळ

जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय !


आशा आहे की तुम्हाला शिवजयंती चे भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळ्या कविता शायरी व छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी माहिती नक्कीच आवडले असेल आवडल्यास नक्की कळवा 




🚩 छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन | शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन | शिवाजी महाराजांचे भाषण दाखवा 2021 2022


छत्रपती शिवाजी महाराज माहिती दाखवा नक्की बघा ⤵️







🚩 शिवजयंती सुत्रसंचालन pdf download

🚩  फलक लेखन 

🚩 शायरी चारोळी कविता 

🚩 भाषण आभार प्रदर्शन मराठी हिंदी इंग्रजी |


💥 FAQ - शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न उत्तरे मराठी 

१) अफजलखानाचा वध कोणत्या गडावर झाला होता?

Ans : अफजलखानाचा वध प्रतापगडावर झाला होता

२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

Ans : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता

३) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे व कधी झाला होता?

Ans : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता.


✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !