Type Here to Get Search Results !

वटपौर्णिमा मराठी निबंध भाषण २०२२ | vat purnima marathi nibandh bhashan |वटपौर्णिमा माहिती मराठी | vat purnima information in marathi 2022

वटपौर्णिमा मराठी निबंध भाषण २०२२ | vat purnima marathi nibandh bhashan |वटपौर्णिमा माहिती मराठी | vat purnima information in marathi 2022


नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय महिलांचा महत्त्वाचा सण वटपौर्णिमा या सणाबद्दल थोडक्यात माहिती मराठीमध्ये बघणार आहोत , याचा उपयोग वटपौर्णिमा भाषण , निबंध ( vat purnima marathi nibandh bhashan ) देण्यासाठी तसेच वटपौर्णिमेची माहिती मराठीमध्ये ( vat purnima information in marathi 2022 ) सांगण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे . चला तर वटपौर्णिमा या विषयी मराठी मध्ये माहिती तसेच भाषण निबंध थोडक्यात 10 ओळीमध्ये बघूया.


वटपौर्णिमा मराठी निबंध भाषण २०२२ | vat purnima marathi nibandh bhashan |वटपौर्णिमा माहिती मराठी | vat purnima information in marat

वटपौर्णिमा माहिती निबंध भाषण
वटपौर्णिमा मराठी माहिती व निबंध भाषणवटपौर्णिमा माहितीनिबंध भाषण

वटवृक्ष लावूनी दारोदारी

साजरी करावी वटपौर्णिमा

हीच वृक्ष उतरवतील आयुष्यात 

आपल्या जीवन बिमा !

आपल्या भारत देशात विविध सण व उत्सव एकोप्याने उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात. यापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा होय. हा सण विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वड या वृक्षाला भारतीय संस्कृतीत आस्थेचे स्थान आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते .या दिवशी स्त्रिया वटसावित्री व्रत करतात.वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पारंपारिक मराठ्रमोळी वेशभूषा करतात. नववारी साडी, दागिने, गजरा, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वापरून छान सजतात.आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दिर्घआयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. वडाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा या व्रतामागील उद्देश आहे.

सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका प्रचलित आहे.


🎯 वटपौर्णिमा पूजा कशी करावी पूजा विधी साहित्य मराठी ?

त्यानंतर पूजेचे ताट हातात घेऊन वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात. मंदिराच्या आवारात किंवा गावाच्या मध्यभागी मोकळ्या जागेत असलेले वडाचे झाड वटपूजेसाठी निवडलेले असते. सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे हळद-कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबाही तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. फळांचे वाटे बनवतात. ते सुपामध्ये सजवतात आणि रंगीत रुमालाने ते झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात. वटपौर्णिमा सण वृक्षांचे जतन, संगोपन करण्याचा सामाजिक संदेश देखील देतो.

या दिवसाला धार्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्वही आहे. मुळातच सर्व भारतीय सणांमागे वैज्ञानिक, सामाजिक महत्त्व लपलेले आहे. ऋतुचक्रांचे संदर्भ लक्षात घेऊनच सण व उत्सव साजरे करण्याची पद्धत ठरवली गेली आहे. मात्र हे सर्व समजून न घेता फक्त परंपरा म्हणून जर सण उत्सव साजरे केले तर त्याला फक्त कर्मकांडाचे स्वरूप येते. 


🌳 वटपौर्णिमा पूजा विधी मराठी साहित्य 


🌳 वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये .

🌳 वटपौर्णिमा पूजा विधी मराठी साहित्य pdf


 याशिवाय यादिवसाचे पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. वड ही बहुपयोगी वनस्पती आहे. तसेच विशाल अशा या वटवृक्षाच्या छायेत अनेक छोटे छोटे जीव, पक्षी यांची एक छोटीशी दुनियाच वावरत असते. वडामुळे उन, पावसापासून आपले संरक्षण होते.वाटसरू व गुरे वडाच्या झाडाखाली विसावा घेतात . वडाच्या झाडावर कावळे बगळे 1 घार , गिधाडे यांच्यासह चिमण्या, पारवे, पोपट इत्यादी पक्षीही राहतात. म्हणून या दिवशी वडाची पूजा करण्याबरोबरच वडाच्या झाडांची लागवड सुद्धा केली पाहिजे.

वटपौर्णिमा निबंध मराठी व्हिडिओ🎯 हे पण वाचा ➡️ 


🆕 वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

🆕 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2022-23मराठी भाषण सूत्रसंचालन घोषणा

🆕 आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन


FAQ - 

Q.वटपौर्णिमा कधी आहे 2022 ?

Ans - या वर्षी 2022 मध्ये वटपौर्णिमा 14 जून 2022 रोजी आहे .

Q.वटपौर्णिमा का साजरी करतात ?

Ans- वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. वडाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा या व्रतामागील उद्देश आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !