Type Here to Get Search Results !

नागपंचमी पूजा कशी करावी मराठी २०२२ | नाग पंचमी पूजा विधी मुहूर्त वेळ पूजेचे साहित्य | nag panchami puja kashi karavi puja vidhi marathi sahitya muhurt

 नागपंचमी पूजा कशी करावी मराठी ( nag panchami pooja kashi karavi) | नाग पंचमी पूजा विधी मुहूर्त वेळ मराठी ( nag panchami puja vidhi marathi) | नागपंचमी साठी लागणारे पूजेचे साहित्य ( nag panchami pujeche sahitya )


नमस्कार श्रावण महिना सुरू झालेली आहे आणि या महिन्यांमध्ये सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी . नागपंचमी सणाची पूजा कशी करावी ( nag panchami pooja kashi karavi)  या वर्षी २०२२ नाग पंचमी कधी आहे ( nag panchami 2022 kadhi ahe)  तसेच नागपंचमी पूजा विधी मुहूर्त वेळ काय आहे ( nag panchami puja vidhi marathi )  नागपंचमीसाठी लागणारे पूजेचे साहित्य कोणते आहे हे आज आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तुम्हां सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


नागपंचमी पूजा कशी करावी मराठी💠 या वर्षी २०२२ नाग पंचमी कधी आहे ( nag panchami 2022 kadhi ahe)

या वर्षी 02 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी हा सण आपण साजरा करणार आहोत या सणाला माहेरवासिनीचा सण सुद्धा म्हटले जाते लग्नानंतर मुलीला माहेरी बोलावलं जातं आणि तिचे सर्व लाड पुरवले जातात लग्न पूर्वी सुद्धा मुलीला ड्रेस घेतले जातात झाडाला झोका बांधला जातो व तिचे सर्व लाड पुरवले जातात याच दिवशी आपण नागदेवतेची सुद्धा पूजा केली जाते , लग्नापूर्वी आपण नवीन ड्रेस घालून वारुळाची पूजा केली जाते आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये वारुळाची भक्ती भावाने पूजा केली जाते कारण अशी मान्यता आहे की वारुळामध्ये नागदेवताचा वास असतो  पण जर आपल्याला बाहेर जाऊनही पूजा करणे शक्य नसेल तर आपण ही पूजा घरी सुद्धा करू शकतो

भारतीय हिंदू संस्कृती मध्ये छोट्या बारीक अशा जीवजंतूंना वनस्पतींना विशेष महत्त्व दिले जाते  या सर्वांची निर्मिती सृष्टीने केलेली यांच्यामुळेच निसर्गामध्ये संतुलन बनवून राहतं तर या सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण अशा प्रकारचे सण साजरे करत असतो  तरी या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं आणि ही पूजा घरी कशी मांडावी ते आता आपण या लेखा मध्ये पाहूया💠 नागपंचमी साठी पूजेचे साहित्य 2022 ( nag panchami pujeche sahitya )

 एक पूजेच्या ताटामध्ये हळदी कुंकुम ,अक्षदा, बेलपत्री (बेल)  याशिवाय तुम्ही दुर्वा आघाडा घेऊ शकता आणि पूजेसाठी काही फुल वस्त्र माळा उदबत्ती दिवा आणि नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या फुटाणे दूध आणि पिवळी धागे आहेत ,  हे धागे बनवण्यासाठी पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा तो पाच पदरी किंवा सात पदरी करायचा आणि त्याला हळद ओली करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे तर हे दोरे वारुळावरती पूजा करताना ठेवायचं आम्ही आणि नंतर मग ते घरी येऊन प्रत्येक घरातील व्यक्तीच्या हातावरती बांधायचे असतात आणि पूजेसाठी नागदेवतेची प्रतिमाही लागणार आहे तर त्यासाठी आपण पाटीवरती नागदेवतेचे चित्र काढायचे आहे त्यात नाग नागिन आणि त्यांची पिल्ले अशा पाच नाग देवतांच्या चित्रे काढायचे आहे , तुम्ही कागदावरती काढला तरीही चालेल किंवा मग बरेच जण देवघराच्या शेजारी अशी भिंत असेल तर त्यावर सुद्धा गंधाने काढू शकता आणि नंतर मग त्यांची पूजा करतात आणि काही ठिकाणी तर माती पासून नाग बनवला जातो आणि नंतर त्याची पूजा केली जाते 


💠 नागपंचमी पूजेची मुहूर्त वेळ तिथी 2022 ( nag panchami 2022 kadhi ahe muhurt vel )

नागपंचमी तिथी  2 ऑगस्ट 2022 सकाळी 05.13 वावाजल्यापासून ते 3 ऑगस्ट 2022 सकाळी 05.41 पर्यंत आपण पूजा करू शकतो.


💠 नागपंचमी पूजा कशी करावी पूजा विधी मराठी मध्ये !( nag panchami pooja kashi karavi marathi)  

नागपंचमी च्या दिवशी सकाळी लवकर उठून  गाईच्या शेणापासून नाग बनवावा व उपवासाचा संकल्प नाग देवातांना आमंत्रण द्यायचे आहे .  गाईचे शेण नसेल तर पूजेसाठी पाटी ठेवायची आहे आणि तिची पूजा करणार आहे या पूजेसाठी मंदिरा जवळची जागा स्वच्छ करावी तेथे चौरंग किंवा पाट ठेवावा आणि त्या पाटा वरती पूजेचे लाल वस्त्र टाकावे आणि त्यावरती मग नागदेवतेची प्रतिमा ठेवावी आणि पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी आणि पूजा करण्यासाठी बेल पत्रे फुले नागदेवतावर ते शिंपडून जलाभिषेक घालायचा आहे आणि नंतर मग नागदेवताला बेलपान फुल अर्पण करायचे आता शिवाच्या गळ्यात बसलेल्या नागदेवतेला तांब्याच्या भांड्यातून पाणी आणि पितळेच्या भांड्यातून दूध अर्पण करा.  शक्य असल्यास चांदीच्या नाग आणि नागाची जोडी मंदिरात ठेवा आणि त्यांची पूजा करा.  यामुळे नागदेवता आणि शिवजी दोघेही प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यानंतर अगरबत्ती दिवा लावावा त्यानंतर मग ज्वारीच्या लाह्या फुटाणे आणि नागाला प्रिय असलेल्या दुधाचा नैवेद्य ठेवावा या नैवेद्य व्यतिरिक्त आपल्या घरी जो नैवेद्य असेल म्हणजेच पूरणाचे धोंडे किंवा मग कानोले असतील अशा प्रकारचा जो निवेद्य असेल तोही ठेवावा आणि त्यानंतर मग आरती करून घ्यावी व दिवसभर 'ओम् वकुल नागाय विद्महे विषदन्ताय धीमहि, तन्नो सर्प: प्रचोदयात्' या मंत्राचा जप करावा या दिवशी उपवास व जप केल्याने सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.आणि आरती करून झाल्यावरती मग आपण नैवेद्य ठेवलेला आहे तो देवापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावरती पाणी घालायचं फिरवायचे आहे असे केल्याने जो नैवेद्य आहे तो देवापर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं , संध्याकाळी नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करूनच उपवास सोडावा आणि फळे घ्यावीत.

 तर आज आपण सदर लेखामध्ये  नागपंचमीची पूजा कशी करतात ते मी सांगितले असून तरी तुम्हाला माझी ही नागपंचमीची पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तेही मला कमेंट मध्ये सांगू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला फोल्लोव केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जी घंटी आहे प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल अजून एका अशा छानशा लेखा  धन्यवाद🎯 हे पण वाचा - 

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष 


💠 FAQ - 

२०२२ नाग पंचमी कधी आहे ?

या वर्षी 02 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी हा सण आपण साजरा करणार आहोत

नागपंचमी पूजा कशी करावी पूजा विधी मराठी ?

नागपंचमी पूजा विधी मराठी भाषण वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे !

नागपंचमी पूजेची मुहूर्त वेळ तिथी काय आहे ?

नागपंचमी तिथी  2 ऑगस्ट 2022 सकाळी 05.13 वावाजल्यापासून ते 3 ऑगस्ट 2022 सकाळी 05.41 पर्यंत आपण पूजा करू शकतो


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !