Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी जयंती भाषण | महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi | mahatma gandhi easy in marathi pdf

महात्मा गांधी जयंती भाषण २०२२| महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi 2022| mahatma gandhi easy in marathi pdf 


नमस्कार विद्यार्थी शिक्षक बंधू आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची भूमिका पार पाडणारी महान व्यक्तिमत्व महात्मा गांधी यांच्या विषयी थोडक्यात माहिती मराठीत बघणार असून सदर माहितीचा उपयोग आपण महात्मा गांधी भाषण ( mahatma gandhi bhashan marathi ) महात्मा गांधी निबंध ( mahatma gandhi marathi nibandh pdf ) सूत्रसंचालन कविता चारोळ्या यासाठी करू शकते महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती च्या आधारे आपण दहा ओळीचे भाषण छोट्या मुलांसाठी देऊ शकता चला तर महात्मा गांधी जयंती भाषण निबंध सूत्रसंचालन सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022.


🎯 महात्मा गांधी जयंती भाषण ( mahatma gandhi bhashan marathi ) महात्मा गांधी निबंध ( mahatma gandhi marathi nibandh ) pdf

mahatma gandhi jayanti speech in marathi 2022


🎯 महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण


 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजनवर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो.... 

स्वदेशीचा केला स्वीकार 

स्वतंत्रतेचा मिळवून दिला अधिकार 

ब्रिटीशांना केला प्रतिकार 

गांधीजी आहेत सत्य, अहिंसेचा आविष्कार.


महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हण जे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र ! महात्मा गांधी हे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आहे.

दरवर्षी २ ऑक्टोंबर हा दिवस आपण गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद, गांधी हे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई हे होते.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ "महान आत्मा " असा आहे. त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावामुळे गांधीजी - वर त्याचा प्रभाव पडला.  इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणानंतर त्यांनी 'इनर टेंपल' या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे महात्मा गांधींनी लंडनविदयापीठातून आपले वकिली शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजां विरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोड़ो आंदोलन इ. महत्त्वपूर्ण आंदोलने केली. चले जावू, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले .अखेर अनेक प्रयत्नांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र्य झाला. पण स्वतंत्र भारतात फार काळ राहण्याचे भाग्य महात्मा गांधीजींना लाभले नाही. 30 जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींचा दुर्देवी अंत झाला. आज जरी गांधीजी या जगात नसले तरी त्यांचे विचार कायम आपल्या सोबत आहेत.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.


अशा आहे की महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडले असल्यास नक्की शेअर करा.


🎯 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी pdf
🎯 महात्मा गांधी जयंती सूत्रसंचालन मराठी pdf


FAQ-

Q. महात्मा गांधीचे यांचे पूर्ण नाव काय आहे?

Ans-महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

Q. महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?

Ans-रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आहे.

Q. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

Ans- महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतळीबाई हे होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !