Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

Teacher day speech in marathi 2022| शिक्षक दिन भाषण मराठी | shikshak divas bhashan marathi | shikshak din sutrasanchalan marathi

शिक्षक दिन भाषण मराठी | Teacher day speech in marathi 2022 pdf| shikshak divas bhashan marathi | shikshak din sutrasanchalan marathi pdf


नमस्कार विद्यार्थी शिक्षक बंधुंनो आज आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन 2022 , शिक्षक दिनाचे छोटे छोटे मराठी भाषण कसे लिहावे व द्यावे  याचे सविस्तर माहिती बघणार आहोत याचा उपयोग आपण शिक्षक दिन भाषण मराठी ( Teacher day speech in marathi pdf ) कसे द्यावे यासाठी तुम्हाला नक्कीच होईल. छोटी छोटी भाषणे विद्यार्थी शिक्षकांना नक्कीच उपयोगी पडतील चला तर शिक्षक दिनाचे मराठी मध्ये भाषण लिहिलेले आपण बघूया ,  यामध्ये शिक्षक दिनाच्या चारोळ्या ( Teacher charoli in marathi ) शिक्षक दिनाच्या शायरी कविता ( Teacher kavita in marathi ) सुद्धा आहेत त्यामुळे शिक्षक दिनाचे भाषण किंवा जर आपण शिक्षक दिन सूत्रसंचालन मराठी ( shikshak din sutrasanchalan marathi ) करत असाल तर याचा नक्कीच फायदा होईल


🎯 Teacher day speech in marathi 2022| शिक्षक दिन भाषण मराठी -1 | shikshak divas bhashan marathi pdf

शिक्षक दिन भाषण मराठी


🎯 शिक्षक दिनाचे सोप्पे व छोटे भाषण मराठी Teacher day speech Short 10 line and easy pdf


'आकाशात भरारी घेताना, 

पक्ष्याला पंख असावे लागतात 

मनमोहक वातावरणासाठी, 

फुलाला सुगंध असावा लागतो. 

विदयार्थ्याला शिक्षण घेताना, 

चांगला शिक्षक असावा लागतो.'


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आई- वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरू असतात. शालेय जीवनात आपणास अनेक गुरु भेटतात. गुरु आपणास चांगल्या जीवनाची वाट दाखवतात.

असे म्हणतात की,

एक पुस्तक, एक पेन,एक विद्यार्थी,आणि एक शिक्षक, हे संपूर्ण जग बदलू शकतात.....

आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे. गुरूंचा आदर राखणे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात गुरुचे महत्व हे ईश्वरासमान आहे.

"गुरूर ब्रम्हा गुरूरविष्णुः गुरुरदेवो महेश्वर: गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 


मित्रांनो अशा आहे की तुम्हाला शिक्षक दिनाचे भाषण सूत्रसंचालन कविता चारोळ्या तुम्हांला नक्कीच आवडल्या असतील , शिक्षक दिनाचे भाषण मराठीमध्ये तुम्हाला आवडले असल्यास नक्की इतर ग्रुप वर शेअर करा.


🌸 शिक्षक दिन मराठी भाषण क्र -2 ( Teacher day speech in marathi - 2 )  pdf


🎯 शिक्षक दिनाचे मराठी भाषण | Shikshak dinache bhashan marathi


" शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा, पवित्र्याचा, 

एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला !

शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा 

शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढवणारा, 

शिक्षक, जगण्यातून जिवन घडवणारा,

शिक्षक तत्वातुन मुल्य फुलवणारा."


विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम.

सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो.आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. हा दिवस आपल्या भारत देशात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे डॉ. राधाकृष्णन हे थोर तत्वत, महान लेखक तसेच आदर्श शिक्षक होते त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी महान कार्य केले आहे. आपल्या देशात ५ सप्टेंबर १९६२ पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. अस म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक, हे संपूर्ण जग बदलू शकतात....

भारतात प्राचीन काळापासून, गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. गुरू म्हणजे शिक्षक, शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात तो प्रत्येक संकटाशी कसा सामना करेल. संकट काळात धाडस दाखवून योग्य मार्ग कसा शोधावा याचे ज्ञान शिक्षकच देत असतो.ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळयाला योग्य आकार देऊन मुर्ती घडवतो. त्याच प्रकारे शिक्षकही चांगल्या-वाईट गोष्टीचे ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतात. शिक्षक दिन हा राष्ट्राच्या तसेच समा 'जाच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. शिक्षकांमुळेच देशाचे भावी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते. शिक्षक हा जितका कर्तव्यदक्ष, कुशल, हुशार व प्रगल्भ असेल, तितका देशाचा विकास झपाट्याने होत असतो.

विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत नि: स्वार्थीपणे शिक्षक पोहचवतात ते विदयार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा सर्वांगीन विकास करतात. शिक्षक हा ज्ञानाचा तसेच पावित्र्याचा विशाल समुद्र, असतो. शिक्षक विद्यार्थ्यांरिया व्याक्ते. मत्वाला सुरेख आकार देऊन संस्कार: क्षम भावी नागरिक घडवण्याचे महान कार्य करतात.

शिक्षक दिन हा आपल्याला संस्कारमय नागरिक बनवलेल्या महान शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस आहे. या दिनी आपण गुरुंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्या साठी प्रयत्न करूया

धन्यवाद .


मित्रांनो अशा आहे की तुम्हाला शिक्षक दिनाचे भाषण सूत्रसंचालन कविता चारोळ्या तुम्हांला नक्कीच आवडल्या असतील , शिक्षक दिनाचे भाषण मराठीमध्ये तुम्हाला आवडले असल्यास नक्की इतर ग्रुप वर शेअर करा.


शिक्षक दिन शायरी - 

चारोळी साठी येथे क्लिक करा

🔯 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन. pdf

🔜.  Download 

⚜ शिक्षक दिन हिंदी सूत्रसंचालन. pdf


✳ शिक्षक दिन इंग्रजी सूत्रसंचालन. pdf


❇ शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळी. pdf


☸ शिक्षक दिन हिंदी भाषण.pdf




⚛ शिक्षक दिन इंग्रजी भाषण. pdf






🔯 शिक्षक दिन कविता. pdf

🔯 शिक्षक दिन नारे घोषणा.pdf

☸ शिक्षक दिन भाषण अप्रतिम विडिओ


🆕. शिक्षक दिन फलक लेखन 

  फलक लेखन pdf डाउनलोड करा


आमची शिक्षक दिवसाची मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन Teacher day information speech bhashan essay nibandh marathi 2022 pdf कसे वाटली तुम्हांला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा !


दिनाचे नावशिक्षक दिन 2022
शिक्षक दिन कधी साजरा करतात?दर वर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक दिवस का साजरा केला जातो ?डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते.

🔶 हे पण वाचा >



FAQ - 

Q. पहिला शिक्षण दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला ?

Ans - 1962 ला पहिला शिक्षण दिन  साजरा करण्यात आला.

Q. देशाचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

Ans - मौलाना अब्दुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते

Q.कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

Ans - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !