Type Here to Get Search Results !

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सूत्रसंचालन भाषण निबंध कविता चारोळी pdf 2022| Mahatma jyotiba phule speech in marathi| Mahatma jyotiba phule? bhashan 2022

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सूत्रसंचालन भाषण निबंध कविता चारोळी pdf 2022| Mahatma jyotiba phule speech in marathi| Mahatma jyotiba phule bhashan 2022


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक बंधूंनो आज 28 नोव्हेंबर 2022 सत्यशोधक समाजाचे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची आज पुण्यतिथी. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही महात्मा फुले यांची मराठी मध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे या माहितीच्या आधारे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे भाषण ( Mahatma jyotiba phule speech in marathi) महात्मा ज्योतिबा फुले निबंध सूत्रसंचालन कविता चारोळ्या फलक लेखन यासाठी तुम्हाला या लेखाचा फायदा होणार आहे चला तर महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त भाषण सूत्रसंचालन कविता चारोळ्या याला सुरुवात करूया. तुम्हां सर्वांना महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

महात्मा फुले सूत्रसंचालन भाषण चारोळी


महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सूत्रसंचालन भाषण निबंध कविता चारोळी pdf |Mahatma jyotiba phule bhashan 2022"दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी

पाणी केले खुले ज्यांनी पाणी केले खुले 

धन्य ते बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले.


छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या "महान कार्याला जनमानसात आणणारे "शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबाफुले . "ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपले गुरू मानत ते दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले सर्वस्व पणाला लावून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आदय शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले अशा या महान समाजसुधारकाला माझे शतदा नमन.

आपल्या पत्नीस प्रथम शिक्षित करून शिक्षणाचा पाया रचणारे फुले....महाराजांचा शौर्यरूपी जीवनावर तब्बल १००० ओळींचा पोवाडा सादर करणारे पहिले शिवशाहीर क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांच्या कार्याला माझा सलाम....


🆕 महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश


महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ  भाजी विक्रीचा व्यवसाय केलेल्या ज्योतिबांनी आपले माध्य. शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे घेतले. 

आपल्या ब्राम्हण मित्राच्या लग्नात 'खालच्या जातीचा' म्हणून झालेल्या अपमानाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम . झाला. थॉमस पेन यांच्या 'राईट्स ऑफ मॅन' या पुस्तकाचा त्यांच्या मनावर खुप प्रभाव या पुस्तकातील एक विचार त्यांना खुप आवडला. तो म्हणजे “ The world is my to country, to good is my religion." म्हणजेच "जग हेच माझं राष्ट्र आहे आणि सत्कर्म हाच माझा धर्म" याच विचारावर महात्मा फुले यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून टाकलं. महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य व जातीभेद पाहून त्याका ही सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यां महिलांना साक्षर करण्यासाठी सन १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी सावित्रीबाईंना शिकविले व त्यांच्यावर मुलींना शिकविण्याची जबाबदारी सोपवली. सावित्रीबाईंना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते.

शेवटी जाता जाता एवढेच बोलेल...

होता स्वातंत्र्यापुर्वीचा काळ

महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार

त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे दार खुले

तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले...


अशा या थोर समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९० साली निधन झाले.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र !


आशा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त दर्शन निबंध तुम्हाला नक्कीच आवडले असेल आवडले असल्यास नक्की शेअर करा


🎯  महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सूत्रसंचालन pdf

➡️ Download PDF🎯  महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सूत्रसंचालन pdf

➡️ Download PDF🎯  महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी फलक लेखन pdf

➡️ Download PDF➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

➡️ महात्मा ज्योतिबा फुले चारोळी शुभेच्छा संदेश


FAQ -
Q. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय आहे ?
Ans - महात्मा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले होते
Q. महात्मा फुले यांचा जन्म कधी व कुठे झाला ?
Ans- महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 27 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला
Q. महात्मा ज्योतिराव फुले यांचा लोकप्रिय ग्रंथ कोणता ?
Ans- महात्मा ज्योतिराव फुले यांचा लोकप्रिय ग्रंथ "शेतकऱ्याचे आसूड" आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !