Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश | champa shashti 2022 wishes quotes marathi 2022

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश | champa shashti 2022 wishes quotes marathi 2022


आज चंपाषष्ठी म्हणजेच षडरात्रौत्सवाची सांगता. खंडेरायाची षडरात्र संपन्न होत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी खंडोबाचे घट बसवले जातात व त्यांची मनोभावे पूजा केली जाते. येळकोट येळकोट.... आजच्या दिवशी भगवान शंकरांनी मल्हारी मार्तंड अवतार घेऊन मणी व मल्ल या दैत्यांचा पराभव केला असे म्हंटले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही 'चंपाषष्ठी' म्हणून ओळखली जाते. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडेरायांचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. खंडोबाच्या भाविकांसाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा नवरात्री सण साजरा केला जातो. जय मल्हार . या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीखंडेरायाची पूजा केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत पाळले जाते. शेतकरी खंडोबाला भगवान शंकराचे रूप मानतात..चंपाषष्ठीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!    आज ग्रामीण संस्कृतीतील 'चंपाषष्ठी' हा महत्वाचा उत्सव, श्री खंडोबा, मल्हारी-मार्तंडरायाला भंडारा, खोबऱ्याची उधळण करत, नैवेद्याची तळी उचलून हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो.

खंडोबाची तळी कशी भरावी ?

 उभं राहून तळी भरत नाहीत. घोंगडीवर बसून भंडार्-खोबर्‍याची अन तांबं पितळांने मढवलेल्या देवाच्या समोर भरली जाते. कधी कधी 'वांगेसट' म्हणजे बाजरीची भाकरी , वांग्याची भाजी , वरण - भात आणि मेथीची भाजीचा नैवेद्य असतो. डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावाच लागतो. अन जागरण गोंधळाची पाचपावली असेल तर नवरदेव , जागरण गोंधळ कड्या-साखळी अन त्याच्या खांद्यावर घोंगडी लागतेच. सदानंदाच्या नावानं चांगभरल, येळकोट येळकोट जय मल्हार, राज्या सर्ज्याच्या नावानं चांगभलं. !

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा


चंपाषष्ठी खंडोबा नवरात्र २०२२ मुहूर्त डेट कधी आहे ?


२९ नोव्हेंबर, २०२२ | मंगळवार  मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शुभ दिवस चंपाषष्ठी मार्तंडभैरवोत्थापन स्कंदषष्ठी सूर्योदय :०६.५६ सूर्यास्त :१७.५८


खंडोबा तळी भंडार गाणे आरती कोणती आहे ?


आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी
निळा घोडा पावमें तोडा
मस्तकी तुरा बेंबी हिरा
अंगावर शाल सदाही लाल
म्हाळसा सुंदरी आरती करी
देव ओवाळी नाना परी
खोबर्‍याचा कुटका भंडाराचा भडका
सदानंदाचा येळकोट
हरहर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदो उदो
भैरोबाचं चांग भले

सदानंदाचा येळकोट
खंडेराव महराज की जय
येळकोट येळकोट जय मल्हार


चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा २०२२


चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी  ,मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ,जय मल्हार 🚩🚩🚩 सर्वांना चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा.....🙏 

champa shashti 2022 wishes quotes marathi 2022


 #आज_चंपाषष्ठी जाहली गर्दी दरबारात,लोटला महापुर भक्तांचा,उधळतो भंडारा चहूदिशानी, होतो नामघोष मल्हारीचा !!!चंपाषष्ठी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 


🎯 खंडोबा जेजुरीचे live दर्शन घ्या !
🎯 खंडोबा तळी भरणा आरती गाणे


champa shashti wishes marathi 2022


सुवर्णाची नगरी जेजुरी,शोभली  खंडोबारायाची भारी, मणीमल्य असुरांची भरता घडी,उद्धारीतो #मार्तंड_मल्हारी !!चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा


चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा


champa shashti quotes marathi 2022 photo images


☘️ देवा केली तुझी आरती पंच प्राणाच्या ज्योती | जिवे भावे ओवाळती माझ्या खंडोबाची मूर्ती || मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडेरायांनी याच दिवशी लोकांना संकटमुक्त केले. श्री खंडेराया चरणी वंदन आणि चंपाषष्ठीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 


champa shashti 2022 wishes quotes marathi 2022 photos 


 म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥ देवा ओवाळी ॥ नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार॥ चंपाषष्ठी मंगलमय शुभेच्छा‼️

चंपाषष्ठीच्या शुभेच्छा संदेश मराठी ! फोटो

ॐ मार्तंड भैरवाय नम: !चंपाषष्ठी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..चंपाषष्ठी निमित्त उधळला जाणारा भंडारा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो व श्री मार्तंड भैरवाची कृपा सर्वांवर अविरत राहो हीच सदिच्छा.चंपाषष्ठी खंडोबारायाच्या उत्सवाच्या शुभेच्छा! 

khandoba navratri wishes marathi

श्री खंडेराव महाराज की जय॥ गड जेजुरी जेजुरी, तिथे नांदतो मल्हारी ॥ || स्वयं महादेव देव, मार्तंड भैरव अवतारी ॥#चंपाषष्ठी खंडोबारायाच्या उत्सवाच्या शुभेच्छा! 


खंडोबा नवरात्र शुभेच्छा संदेश


सदानंदाचा येळकोट चंपाषष्ठीच्या शुभेच्छा..❤️ वांग्याचं भरीत अन् बाजरीची भाकरी...😋 #यळकोट_यळकोट #जय_मल्हार  #चंपाषष्ठी #खंडेराय #खंडोबा 🔥


चंपाषष्ठी शुभेच्छा फोटो मेसेज व्हाट्सअप स्टेटस

येळकोट येळकोट जय मल्हार.. भरीत भाकरी शिवाय चंपाषष्ठी अधुरी आहे, या प्रसाद खायला. चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

champa shashti whatsapp status massage

आगडदुम नगारा,सोन्याची जेजुरी , निळा घोडा,पाव में तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा ,अंगावर शाल सदाही लाल ,म्हाळसा सुंदरी आरती करी ,खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भंडका  ,हर हर महादेव ,चिंतामणी मोरया ,आनंदीचा उदय उदय ,भैरीचा चांग भले .चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🔴 हे पण वाचा


FAQ-

Q. खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी 2022 कधी आहे

Ans- खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी आहे

Q.खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी का साजरी केली जाते ?

Ans - भगवान शंकरांनी मल्हारी मार्तंड अवतार घेऊन मणी व मल्ल या दैत्यांचा पराभव केला असे म्हंटले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही 'चंपाषष्ठी' म्हणून ओळखली जाते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !