Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

तुळशी विवाह मंगलाष्टके मराठी २०२२ | Tulsi vivah Mangalashtak in Marathi pdf lyrics mp3 2022

 तुळशी विवाह मंगलाष्टके मराठी २०२२ | Tulsi vivah Mangalashtak in Marathi pdf lyrics mp3 2022


नमस्कार आज आपण दिवाळीनंतरचा सन म्हणजे तुळशी विवाह,  दिवाळीनंतर द्वादशीपासून आपण तुळशी विवाह करत असतो. यावर्षी तुळशी विवाह दिनांक 05 नोव्हेंबर 2022 पासून तुळशी विवाह ला सुरुवात होणार असून 08 नोव्हेंबर 2022 तारखेपर्यंत करता येणार आहे . तुळशी विवाह साठी आपल्याला तुळशीचे मंगलाष्टके ( Tulsi vivah Mangalashtak in Marathi pdf lyrics mp3 )व तुळशीची आरती Tulsi vivah chi aarti marathi lyrics pdf) आवश्यक असते तसेच तुळ1शी विवाह म्हटलं की तुळशीला लागणारे साहित्य पूजा विधी मुहूर्त बघून तुळशीचे विवाह आपण लावत असतो. चला तर आपण तुळशी विवाह साठी लागणारी मंगलाष्टके व आरती कोणती असते व लिहिलेली वाचता येणारे मंगलाष्टके व आरती बघणार आहोत.


तुळसी विवाह मंगलाष्टक मराठी PDF lyrics | tulsi vivah mangalashtak marathi | tulsi mangalashtak marathi PDF lyrics mp3


🌱 तुळशी विवाह मंगलाष्टके मराठी पीडीएफ डाउनलोड करा


तुळसी विवाह मंगलाष्टक मराठी PDF lyrics


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं ॥
 बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं थेऊरं ॥ 
लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ।। 
ग्रामो रांजणसंस्थितं गणपतीकुर्यात् सदा मंगलम् ।। १ ।।

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ।। 
कावेरी शरयु, महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका ||
क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातातया गंडकी ।
 पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम् || २ ||

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
 
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
 
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
 
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
 
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
 
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।


FAQ

Q.तुळशी विवाह कधी व केंव्हा आहे ?

Ans: तुळशी विवाह दिनांक पाच नोव्हेंबर 2022 पासून सुरु होऊन आठ नोव्हेंबर 2022 पर्यंत लावता येणार आहे

Q.तुळसी विवाह मुहूर्त 2022 ?

Ans:  तुलशी विवाहाची शुभ मुहूर्त आज 05 नोव्हेंबर संध्याकाळी 05:35 ते 07 वाजेपर्यंत करावी .

Q.तुळशी विवाह आरती कोणती आहे pdf ?

ANS : "जय देवी जय देवी जय माये तुळशी" ही तुळशी विवाह साठी तुलशीची आरती आहे.


🔰 हे पण वाचा

🆕 तुळशी ची आरती मराठी lyrics

🆕 तुळसी विवाह मंगलाष्टके व आरती pdf

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyricsटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !