Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

भोगी म्हणजे काय | भोगी मराठी माहिती २०२३ | Bhogi information in marathi 2023

भोगी म्हणजे काय | भोगी मराठी माहिती २०२३ |  Bhogi information in marathi 2023


नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रातमकर संक्रांतीच्या अगोदर पहिला सण येतो तो म्हणजे "भोगी" महाराष्ट्रामध्ये भोगी या सणाला विशेष असे महत्त्व आहे कारण हा सण मुख्यतः महिलांचा असून यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो.

आज आपण या लेखांमध्ये भोगी म्हणजे काय? भोगी हा सण का साजरा केला जातो ? तसेच भोगीची भाजी रेसिपी मराठी साहित्य व भोगी हा सण कसा साजरा केला जातो याबद्दल थोडक्यात मराठी मध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा .


भोगी माहिती व शुभेच्छा 2023



भोगी सण माहिती (toc)


भोगी सण कधी आहे 2023 ? | when is bhogi date in 2023

2023 मध्ये भोगी हा सण 14 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार असून मुख्यतः सण सकाळी साजरा केला जातो. भोगी या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करून खाल्ली जाते व इतरांनाही दिली जाते मराठवाड्यात भोगी या सणाला भोगीची भाजी प्रसिद्ध असून या भोगीच्या भाजीला खेंगते असेही म्हटले जाते



💥 भोगी म्हणजे काय ? what is bhogi festival in maharashtra in marathi

भोगी म्हणजे आनंद घेणारा व उपभोगणारा या दिवशी आपण सर्वांनी आनंदी राहून व इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करावा असा या भोगी सणाचा अर्थ आहे , तसेच भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते 


💥 भोगी देणे म्हणजे काय ?

या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सवासनींना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते



भोगी सण कसा साजरा केला जातो ? | How to celebrate Bhogi Festival in maharashtra ?

भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी या सणाच्या दिवशी भोगी हा सण आनंदात साजरा करतात.


💥 भोगीची रेसिपी मराठी दाखवा | bhogichi bhaji kashi banvavi



भोगी का साजरी करतात ?| why bhogi is celebrated History of Bhogi

या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे त्यामुळे त्यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते , असेच पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात .  काही राज्यांमध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूंचे आहुती दिली जाते

 जानेवारी महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या व सर्व पीक बहरलेले असते त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा विसावा मिळतो त्यामुळेच शेतकरी भोगीची भाजी आणि बाजाराची भाकरी खाऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळे पुन्हा वर्षभरात शेतात काम करण्यास तो सज्ज होतो 


Note: सर्व माहिती DMCA Protected आहे , कॉपीपेस्ट केल्यास कॉपीराईट दिले जाईल !


🏵️ भोगीची संपूर्ण माहिती बघा व्हिडिओ

https://youtu.be/LRV52VxTaXw



भोगीची भाजी रेसिपी मराठी | bhogichi bhaji recipe in marathi

भोगीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे भोगीची भाजी विशेषतःमहाराष्ट्रात बनवली जाते 


💥 भोगीच्या भाजी साठी लागणारे साहित्य | bhogi recipe ingredients marathi

  • बोर 
  • पेरू 
  • ऊस
  • शेंगदाणे 
  • हरभरे 
  • पावटा
  • गाजर 
  • कांद्याची पाथ 
  • वांगे 
  • घेवडा 
  • वाटाणा 
  • फ्लावर 
  • तीळ 
  • खोबरे 
  • जिरे 
  • मोहरी 
  • लसूण 
  • कढीपत्ता 
  • कोथिंबीर 
  • लाल मिरची पावडर 
  • गरम मसाला 
  • गोडा मसाला
  • चवीनुसार मीठ.


भोगीची भाजी बनवण्याची पद्धत | bhogichi bhaji recipe step by step procedure 

सर्वप्रथम कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याची फोडणी द्यावी लालसर होईपर्यंत त्याला भाजावे नंतर तीळ शेंगदाणे व खोबरे याची पेस्ट बनवून लालसर होईपर्यंत परतावे, पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकावे एक चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर गोडा मसाला टाकावे आणि नंतर आपण आणलेल्या सर्व भाज्या (हरभरा, पावटा, गाजर, वाटाणा, ऊस, पेरू ,बोर इ) एकत्रित करून त्या फोडणीमध्ये टाकाव्या सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व मीठ कोथंबीर टाकून उकळा येईपर्यंत शिजवावे आपल्या भोगीची भाजीची रेसिपी तयार .

न खाई भोगी तो सदारोपी अशी म्हण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या म्हणीचा अर्थ असा आहे की भोगीची भाजी जर आपण खाली नाही तर आपण वर्षभरात नेहमी आजारी पडत राहू त्यामुळे भोगीच्या भाजीला विशेष असे महत्त्व आहे

आशा आहे की वरील महियी मध्ये आपल्याला भोगी म्हणजे काय? भोगी हा सण का साजरा केला जातो ? तसेच भोगीची भाजी रेसिपी मराठी साहित्य व भोगी हा सण कसा साजरा केला जातो याबद्दल थोडक्यात मराठी मध्ये माहिती मिळाली असेल व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.


 ✡️ हे पण वाचा > 

🆕 मकर संक्रात उखाणे मराठी (नवीन)

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !