Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राजमाता जिजाऊ भाषण मराठी २०२३ | rajmata jijau jayanti bhashan marathi pdf

 

राजमाता जिजाऊ भाषण मराठी २०२३ |Rajmata jijau speech in marathi pdf 2023


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधू आज 12 जानेवारी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमात जिजाऊ यांची जयंती . राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आपणासाठी काही मराठीमध्ये माहिती घेऊन आलो होतो त्याचा फायदा आपणास राजमाता जिजाऊ यांचे भाषण  मराठी मध्ये ( Rajmata jijau speech in marathi 2023 ) देण्यासाठी तसेच राजमाता जिजाऊ यांचे यांच्यावर मराठी निबंध लिहीण्यासाठी करू शकता तसेच राजमाता जिजाऊ यांच्या विषयी चारोळ्या शायरी सूत्रसंचालन व फलक लेखन घेऊन आलो आहोत याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल . चला तर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त माहिती व भाषण सूत्रसंचालन चारोळ्या बघूया. तुम्हा सर्वांना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.



राजमाता जिजाऊ जयंती भाषण(toc)


राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी | rajmata jijau jayanti bhashan marathi pdf


राजमाता जिजाऊ जयंती भाषण सूत्रसंचालन निबंध 2023


राजमाता जिजाऊ जयंती चारोळी शायरी


जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, 

शिवबांची माता, भाग्य कोणते अजून ! 

हिंदवी स्वराज्याची पताका, 

नभी अभिमानाने डोलते, 

ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, 

ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते !


तो फार धामधुमीचा काळ होता. महाराष्ट्र चहुबाजूने शत्रूने वेढला गेला होता. शत्रू गोरगरीब रयतेवर जुलूम करीत, अत्याचार करीत. अशा या काळात- पारतंत्र्यात यश, स्वाभिमान कीर्ती आणि मातृ- त्वाची देणं लाभलेल्या यदुवंशात लखुजीराव जाधवांच्या घरी म्हाळसाराणींच्या पोटी आमचा जन्म झाला. चार भावंडांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले, म्हणून हत्तीवरून साखर वाटली! केवढे ते कौतुक हो! आजच्या, माझ्या बहिणींनो, मातांनो... तुम्ही स्वतः किती जणी आपल्या मुलीच स्वागत खुल्या मनाने करता? हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो... पण, खुल्या मनाने मुलीचे स्वागत करणाऱ्या माताही खूप कमी, ही खंत आज मी व्यक्त करते. आमच्या मातोश्री म्हाळसा राणींनी आम्हाला सहा वर्षांचे ज्ञान दिले. रामायण-महाभारत सोबतच नामदेवांच्या गाथा हे आम्ही ऐकले, समजून घेतले होते. एकदा स्वराज्य साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सर- दाराच्या पन्नीला काही कर्मठ लोक सती जाण्यासाठी भाग पाडीत होते. त्यावेळी आम्ही विरोध केला. तर त्यांनी आम्हालाही 'धर्म विरोधक' या कठड्यात उभे केले. एरवी 'स्वराज्यसंकल्पक' म्हणून गौरविल्या जाणाऱ्या आम्ही थक्क झालो. शिवबांना धर्म शिकवताना 'समाजाचे कल्याण आधी' हेच आम्ही रुजवले.

आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवबांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व गुणांचे बाळकडू दिले आणि राजेंनी सुद्धा आमच्या संस्काराचे फलित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धन्यवाद ! 

जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा ! मानाचा मुजरा !!


धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र


अशा आहे की तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त " मी जिजाऊ बोलते " हे मराठी भाषाण नक्कीच आवडले असेल आवडल्या असल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा ! 


🏵️ राजमाता जिजाऊ भाषण दाखवा

➡️ https://youtu.be/obIM-mDG_c8



12 जानेवारी राजमाता जिजाऊ मराठी मध्ये भाषण | Jijau jayanti speech in marathi


स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हांस लाभलेयं ही आई जगदंबेची कृपा. 

होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ!

एक काळ असा होता मावळ्यांनो,  या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या अशा काळात आमचा जन्म झाला. आई म्हाळसाराणी व वडील लखुजी, राव जाधव माझ्या जन्मावेळी खूप खुश झाले. सर्वत्र आनंदाला उधाण आले. दारा-दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावली गेली. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव ठेवलं गेलं - जिजा. जिजा म्हणजेच जय आणि विजय.

आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युध्दाचे डावपेच, सल्ला मसलत, रयतेची गा-हाणी,न्यायनिवाडे तर नित्याचेच .. हे असं होत आमचं बालपण!

कला आम्ही युध्दकला शिकलो होतो. मुलींची एक फौजही आम्ही तयार केली होती , पहाटे आम्ही जेंव्हा घोड्यावरून रपेट मारायला  जायचो तेंव्हा गावकुसातल्या काही बायका नाक मुरडायच्या, तर काही म्हणायच्या - या पोरीचं कसं होणार ? पण आम्ही निश्चय केला होता,स्वतः सोबत इतरांचेही रक्षण करण्याचा! आम्ही मराठी, संस्कृत, पारसी, अरबी, उर्दू, कन्नड अशा भाषाही शिकलो होतो. रामायण- महाभारताबरोबरच आम्ही कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण, बायबल ही वाचले होते.

पुढे शहाजी राजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्यांची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अकुंर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते. आम्हांला हत्तीवर बसावे वाटत होते. धनुष्यबाण, भाला, तलवार घेऊन लढाया कराव्या वाटत होत्या.

आम्हाला एकूण ६ अपत्ये झाली. पहिले संभाजीराव, नंतर ४ झाली. व शेवटचे शिवाजीराजे ! आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. शिवबांवर आम्ही लहानपणापासून चांगले संस्कार केले. त्यांना युद्धकलेत पारंगत केले. सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले. माता-भगिनींचा आदर-सत्कार करायला शिकवले. माणसाला माणसासारखे वागवण्याची शिकवण दिली. स्वराज्यनिर्मितीच्या आमच्या संकल्पासाठी आम्ही शिवबाला पूर्ण तयार करीत होतो, घडवीत होती. स्वराज्य निर्मितीत आम्ही शिवरायांना मार्गदर्शन करीत होती. शिवाजी राजे जेंव्हा मोठमोठ्या मोहिमांवर जात, तेंव्हा आम्ही राज्यकारभारावर लक्ष ठेवत असू. राजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगात आम्ही त्याच्यांमाग खंबीरपणे उभे राहिली होती. आम्ही त्यांच्या मनात आत्मविश्वास, चातुर्य, संघटन, शौर्य, एकतेचे बीज पेरले होते.

रयतेचे राज्य, स्वराज्य निर्माण करण्यात शिवबा यशस्वी झाले होते. आमची स्वरा- ज्याची संकल्पना साकार झाली होती. आम्ही धन्य झाली होती. मला जन्मचि सार्थक झाल्याचे समाधान मिळाले होते.

आता आमचा कार्यकाळ संपत आला होता. शिवबाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून आम्ही समाधानाने अखेर डोळे मिटून घेतले.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र


अशा आहे की तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त " मी जिजाऊ बोलते " हे मराठी भाषाण नक्कीच आवडले असेल आवडल्या असल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा ! 


हे पण वाचा >

🆕 राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी

🆕 स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भाषण निबंध

🆕 राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण माहिती

🆕 राजमाता जिजाऊ जयंती फलक लेखन pdf


राजमाता जिजाऊ छोटे व सोप्पे 10 ओळींचे भाषण मराठी | jijau jayanti speech in marathi 10 line speech on Jijau 


राजमाता जिजाऊ जयंती कविता चारोळी


संस्कार तुझे थोर, 

घडविले शिवबाला, 

धन्य ते स्वराज्य 

धन्य जिजामाता !


जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प लढाऊ बाणा आणि अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यांच्यामुळेच शिवराय घडले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, जिजाऊंनी शिवबाला फक्त जन्म दिला नाही, तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू त्यांनी शिवबांना दिले. मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक 'स्वराज्य प्रेरिका' महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे.

खंबीर नेतृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या 'प्रेरक' ठरल्या. 

शेवटी मी एवढेच म्हणेन की 

त्रिवार असावा मानाचा मुजरा, 

त्या मातेला 

जिने घडविला, राजा रयतेचा !

रचली स्वराज्याची गाथा, 

दैवत असे ती राजमाता !! 


टीप- भाषणाची प्रॅक्टीस करण्यासाठी, पाठ करण्या- साठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा डोळे बंद करुन ऐका.

अशा आहे की तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषाण नक्कीच आवडले असेल आवडल्या असल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा ! 


राजमाता जिजाऊ भाषण pdf 

Download(download)



राजमाता जिजाऊ सूत्रसंचालन pdf 

Download(download)



राजमाता जिजाऊ फलक लेखन pdf 

Download(download)



राजमाता जिजाऊ प्रश्नमंजुषा FAQ

Q.राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू कधी झाला ?

Ans- राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू वयाच्या 76 व्या वर्षी 17 जून, 1674 ला झाला .

Q. राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे ?

Ans - रायगडाच्या पायथ्याशी असलेले पाचाड गाव आहे. तेथेच राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे.

Q. राजमाता जिजाऊ यांना किती भाऊ होते ?

Ans - राजमाता जिजाऊ यांना चार भाऊ होते.१) दत्ताजी, २)अचलोजी, ३) रघुजी आणि ४) महादुजी असे जिजाऊंच्या ४ भावांची नावे होती.

Q. जिजाऊ यांचा विवाह कितव्या वर्षी झाला?

Ans - राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे यांच्या सोबत वयाच्या सहाव्या वर्षी झाला

Q. सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव कधी व  का साजरा करण्यात येते?

Ans -  राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिनखेडराजा येथे झाला जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षी तेथे साजरा केला जातो



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !