Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी मुदतवाढ 2023 | varishtha and nivad shreni prasikshan nondani registration 2023 24

 वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३ -२४ साठी नावनोंदणी सुरु | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration 2023 -24 | https://training.scertmaha.ac.in/


नमस्कार शिक्षक बंधुनो सन २०२१ - २२  मध्ये ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण राबवण्यात आले होते त्यात प्रशिक्षणामध्ये एकूण ९४५४२ प्रशिक्षणार्थी त्यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले होते . याही वर्षी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023 ( varishtha and nivad shreni prasikshan nondani registration 2023 24) चा दुसरा टप्पा करण्याचे आयोजन केले असून,  सदर वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आपल्याला दिनांक 12 जून पर्यंत रजिस्ट्रेशन ची तारीख दिली होती आता सदर तारीख ही वाढवुन 13 जून 2023 ते 20 जून 2023 पर्यंत आपली नोंदणी करायची आहे नोंदणीसाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपली सर्व माहिती भरायची आहे. 20 जून नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही त्यामुळे आपले प्रशिक्षणाची नवनवीन विहित वेळेत करावी.


💥 वरिष्ठ वेतन श्रेणी चे रजिस्ट्रेशन चुकले असेल, ईमेल प्राप्त झाला नसेल तर काय करावे ?


scert online training for teachers website

  1. http://training.scertmaha.ac.in/index.aspx
  2. https://www.maa.ac.in/


💥 अधिक माहितीसाठी आमच्या whatasapp Group मध्ये जॉईन व्हा !

Click Here To Join


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2023



💥 वरिष्ठ वेतनश्रेणी व व निवड श्रेणी साठी पात्रता 2023 varishtha and nivad shreni prasikshan nondani registration 2023 24


१.दिनांक 31 मार्च 2024 रोजी आपल्याला सेवेचे बारा वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे तरच आपण वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकता .

२.तसेच 31 मार्च 2024 रोजी सेवेचे 24 वर्ष सेवा पूर्ण होणारे प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र होतील.

३.सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन असून प्रशिक्षणार्थानी सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन 12 जून 2023 पूर्वी ऑनलाईन करायचे आहे.

४.प्रशिक्षण रजिस्ट्रेश करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या 

http://training.scertmaha.ac.in/index.aspx किंवा https://www.maa.ac.in/

५.सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.


💥 अधिक माहितीसाठी आमच्या whatasapp Group मध्ये जॉईन व्हा !



वरिष्ठ व निवडश्रेणी चा अधिकृत GR डाऊनलोड करा 
Download(Download)


६.प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

  • गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे
  • गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे
  • गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. १५ वी ते १२ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे) 
  • गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)

७.प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वताचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक,अचूक ई-मेल आय डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी, 

८. ज्या शिक्षकांना स्वताचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकासाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.

९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा. 



💥 १०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वताचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय. डी. वर पाठविण्यात येतील.

११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल,

१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल...

१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल. १४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaba.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील



💥 १६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बैंक खात्यावरून भरणार आहे. त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१७.सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. 

१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ईमेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.


अधिक माहितीसाठी आमच्या whatasapp Group मध्ये जॉईन व्हा !




💥 १९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल. २३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी. 

२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.



💥 अधिक माहितीसाठी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी व्हिडीओ बघा !


वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी व्हिडीओ बघा !


उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४ 

२. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९५


अधिक माहितीसाठी आमच्या whatasapp Group मध्ये जॉईन व्हा !



💥 FAQ 

Q. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023 मध्ये कधीपासून सुरु होणार आहे ?

Ans - वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023 मध्ये  29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत रजिस्ट्रेशन रेकारायचे आहे 

Q.वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३ नोंदणी कशी करावी ?

Ans -वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३ नोंदणी साठी https://training.scertmaba.ac.in या वेबसाईटला भेट द्या 

Q.वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन वेबसाईट कोणती आहे ?
Ans - https://training.scertmaba.ac.in हि वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन वेबसाईट कोणती आहे



\

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !