Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ वेळापत्रक pdf | Bridge Course 2023-24 pdf All class Timetable

सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ वेळापत्रक pdf | Bridge Course 2023-24 pdf All class Timetable



नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुनो मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्याला सेतू अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे, सेतू अभ्यासक्रमाचे वेळापत्रक व इतर माहिती या लेखांमध्ये आज आपण बघणार आहोत. 
यावर्षी आपल्याला सेतू अभ्यासक्रमाची पूर्व चाचणी 30 जून ते 3 जुलै 2023 पर्यंत घ्यायची असून सदर पूर्व चाचणीचच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत तसेच सेतू अभ्यासक्रम हा 04 जुलै ते 26 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करायचा आहे व 27 जुलै ते 31 जुलै 2023 पर्यंत उत्तर चाचणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सेतू अभ्यासक्रम 26 जुलै पर्यंत पूर्ण करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण वाचूया


सेतू पक्ष2023 24 पत्रिका pdf



💥  Click Here to download Timetable



💥 सेतू अभ्यासक्रम स्वरूप 2023 - 24


१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. 

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. 

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत,

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. 



🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !


💥सेतू अभ्यास २०२३-२४ वेळापत्रक | Bridge Course 2023-24 Timetable pdf


१.पूर्व चाचणी - दि. ३० जून ते ३ जुलै २०२३

२. २० दिवसांचा सेतू अभ्यास - दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३.

३. उत्तर चाचणी - दि. २७ ते ३१ जुलै २०२३.



💥 सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-

१. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी. 

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.

४. सदर कृतिपत्रिका (Worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात. 

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी.उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात, पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.



🎯 हे पण वाचा ⤵️

🆕    सेतू अभ्यास पूर्व चाचणी २०२३ pdf डाउनलोड

🆕  सेतू चाचणी क्रमांक 3 pdf डाउनलोड करा

🆕   सेतू अभ्यास क्रमांक 2 pdf डाउनलोड करा

🆕   सेतू चाचणी  क्रमांक 1  pdf डाउनलोड करा

🆕   सेतू चाचणी क्रमांक - 2 सर्व इयत्ता व विषय एकाच pdf मध्ये डाऊनलो करा

🆕  सेतू चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕  सेतू सदस्य pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕  वार्षिक 2023 मराठी सर्व इयत्तेचे pdf


वारंवार विचारले जाणारे प्रश्न -

प्र. सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी कधी घ्यायची 2023 ?
उत्तर -सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी 30 जून ते 03 जून 2023 दरम्यान घ्यायची आहे  
प्र. सेतू अभ्यासक्रम कधीपासून शिकलेली आहे 2023 ?
उत्तर - सेतू अभ्यासक्रम  04 ते 26 जुलै अश्या 20 दिवसात पूर्ण करायचा आहे .
प्र. सेतू अभ्यास उत्तर चाचणी कधी घ्यायची ?

उत्तर- सेतू। अभ्यासक्रम उत्तर चाचणी 27 जुलै ते 31 जुलै 2023 रोजी पर्यंत घ्यावी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !