Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पायाभूत चाचणी गुण Swift Chat वर भरताना येणाऱ्या अडचणी, शंका व त्यांचे समाधान | payabhut chachani mark kaise bhare

पायाभूत चाचणी गुण Swift Chat वर भरताना येणाऱ्या अडचणी, शंका व त्यांचे समाधान ! | payabhut chachani mark kaise bhare |pat maharashtra chat bot Swift chat app 2023


नमस्कार मित्रांनो पायाभूत चाचणी चे गुण  स्विफ्ट चॅट Swift Chat ॲप मध्ये 18 सप्टेंबर 2023 पर्यंत भरायचे आहेत भरण्यासाठी प्रशिक्षण झाले होते बरेच जणांनी प्रशिक्षण न बघितल्यामुळे आणि सदर प्रशिक्षणाचा व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे सदर प्रशिक्षण कसे पूर्ण करावे व पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही हालेख तयार केला असून या लेखामध्ये पायाभूत चाचणीची सविस्तर माहित गुण भरण्यापासून ते माहिती अपडेट करणे सर्व येणाऱ्या अडचणी व त्यांचे समाधान याची सर्व माहिती या लेखामध्ये मिळणार आहे त्यामुळे हा लेख सविस्तर वाचा व आवडल्यास लाईक करा शेअर करा .


⇛ पायाभूत चाचणीचे मार्क स्विफ्ट चॅटबॉट  ( Swift Chat ) अँप द्वारे कसे भरावे स्टेप by स्टेप माहिती  💥

Swift chat app var payabhut che gun kase bharaveSwift Chat शंका समाधान (toc)

📌 पायाभूत चाचणी गुण Swift Chat वर भरताना येणाऱ्या अडचणी, शंका व त्यांचे समाधान ! 2023


🔖प्रश्न : Swif Chat अँप काय आहे ?

➡️ उत्तर : स्विफ्ट चॅट ॲप पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी तयार करण्यात आलेले असून यामध्ये सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यासाठी सोपे जाण्यासाठी सदर app ची निर्मिती केली आहे

💥  पायाभूत चाचणी गुण ChatBot वर कसे भरावे ?


🔖 प्रश्न : Swif Chat अँप डाउनलोड कसे करावे ? 

➡️ उत्तर : : play store वरून swift app डाउनलोड करू शकता. Link https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app&pcampaignid=web_share  किंवा https://web.convegenius.ai/ या वेबसाईट वरून पण रजिस्ट्रेशन व गुण भरू शकता .

🔖 प्रश्न : PAT महाराष्ट्र चॅटबॉट ओपन होत नाहीये काय करावे ?

➡️ उत्तर : स्विफ्टचॅट मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला https://bit.ly/PAT-MH या लिंक वरती क्लिक करायचे आहे PAT महाराष्ट्र चॅटबोट आपोआप ओपन होईल व पुढील माहिती आपण भरायची आहे 
🔖प्रश्न : शालार्थ आयडी नाही त्यांनी काय करावे ?

➡️ उत्तर : ज्या शिक्षकाकडे शालार्थ आयडी नाही जे शिक्षक कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा सर्व शिक्षकांसाठी लवकरच अपडेशन होणार आहे त्यामुळे थोडा धीर धरावा लवकरच त्याबद्दल अपडेट दिले जाणार आहे

🔖प्रश्न : शालार्थ आयडी आहे पण Invalid दाखवत आहे त्यांनी काय करावे ?

➡️ उत्तर : ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे परंतु शालार्थ पोर्टल मधून त्यांची शाळा अपडेट केली नसल्यामुळे असा मेसेज येत आहे लवकरच आपल्या शाळेचे अपडेशन केले जाईल व आपल्या शालार्थ आयडी कार्यरत होईल

🔖 प्रश्न : गुण चुकीचे भरले तर काय करावे ?

➡️ उत्तर : जर आपण चुकीचे गुण एखाद्या विद्यार्थ्याचे भरले असाल तर आपण परत होम मेनी मधून होम मेनू मध्ये जाऊन ते परत भरू शकता किंवा अपडेट करू शकता.
🔖 प्रश्न : होम मेनू वर गेल्यानंतर डेटा डिलीट होतो का ?

➡️ उत्तर : होम मेनू वर गेल्यानंतर तुमचा डेटा सेव होणार नाही तो डिलीट होईल असा मेसेज येत आहे तर तो जर तुम्ही एखादा विद्यार्थ्याचे मधेच गुण सोडून दुसऱ्या टॅब मध्ये जात असाल तर तो डेटा सेव्ह होत नाही परंतु जर तुम्ही एका विद्यार्थ्याचे सर्व प्रश्नांची गुण भरले असाल आणि नंतर Home menu वर जात असाल तर तो डेटा ऑटोमॅटिक सेव होणार आहे डिलीट होणार नाही लक्षात घ्या

🔖 प्रश्न : एका विषयाचे किंवा इयतेचे गुण भरल्यानंतर दुसऱ्या इयत्ता व विषय चे गुण कसे भरावे ?

➡️ उत्तर : एका विषयाचे गुण भरल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे एका विषयाचे गुण भरल्यानंतर परत होम मेनू Home menu वर जाऊन परत माहिती भरून दुसऱ्या विषयाचे गुण भरायचे आहेत. 

🔖 प्रश्न : काही विषयाचे गुण व अँप मध्ये गुण जुळत नाहीत ?

➡️ उत्तर : इयत्ता पाचवी व आठवी इंग्रजी विषयाचे व काही तोंडी परीक्षेचे गुण जुळत नाहीत सिस्टीम मध्ये ते लवकरच अपडेट केले जाणार आहे दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला चुकलेल्या विषयाची माहिती परत भरायची आहे
🔖 प्रश्न : इयत्ता आठवी तोंडी गुण भरता येत नाही ?

➡️ उत्तर : लवकरच इयत्ता आठवीचे तोंडी गुणाचे मार्क भरण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे तोपर्यंत कोणीही मार्क्स करू नये

🔖 प्रश्न : इयत्ता पाचवी व आठवी इंग्रजी विषयाचे मार्क्स परत भरायचे आहे का ?

➡️ उत्तर : सिस्टीम मध्ये अपडेट केल्यानंतर आपल्याला इयत्ता पाचवी व आठवीचे गुण ज्या इत्याचे गुण जुळत नव्हते त्या चे मार्क्स परत आपल्याला भरायचे आहेत

🔖 प्रश्न : वर्गातील काही विद्यार्थी दिसतायत तर काही विद्यार्थी दिसत नाहीत काय करावे ?

➡️ उत्तर : एखादा विद्यार्थी सरल मध्ये जर अपडेट केला नसेल तर तो सिस्टीम मध्ये चॅटबॉटमध्येही दिसणार नाही जर एखादा विद्यार्थी नवीन शाळेत आला आहे परंतु सरलमध्ये त्याची एंट्री नसेल तर तोही विद्यार्थी चॅटबोटमध्ये दिसणार नाही त्यासाठी आपल्याला आपली सरल पोर्टल अपडेट करायचे आहे सरल पोर्टल अपडेट केल्यानंतर एका आठवड्यानंतर तो विद्यार्थी चॅटबोटमध्ये अपडेट होईल
🔖 प्रश्न : शाळा सोडून गेलेले विद्यार्थी किंवा नवीन आलेले विद्यार्थीचे गुण कसे भरावे ?

➡️ उत्तर : सरल पोर्टल मध्ये अपडेट केल्यानंतर एका आठवड्यानंतर तो चॅट बॉट मध्ये दिसणार आह अशा विद्यार्थ्या ंचे गुण भरू नये ते पेंडिंग ठेवावेत 

🔖 प्रश्न : काही शिक्षकांची बदली झाली आहे त्यांनी काय करावे ?

➡️ उत्तर : ज्या शिक्षकांची बदली झाली आहे त्यांना शालार्थ आयडी इनकरेक्ट असे दाखवत आहे त्यांचे अपडेशन चालू आहे दोन दिवसांमध्ये त्यांच्या आयडी पुढे त्यांची शाळा दिसणार आहे

🔖 प्रश्न : दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुण कसे भरावे ?

➡️ उत्तर : दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या गुण शाळा स्तरावर द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते मार्क्स सिस्टीम मध्ये भरायचे आहेत
🔖 प्रश्न : चुकीचा माध्यम किंवा विषय निवडून गुण भरल्या गेले काय करावे ?

➡️ उत्तर : आपण जर मराठी विषय निवडण्याऐवजी म्हणजे  प्रथम भाषा मराठी ऐवजी द्वितीय किंवा तृतीय भाषा मराठी निवडली आणि त्या विद्यार्थ्यांची मार्क्स भरले असेल तर आपल्याला परत होम मेनू मध्ये जाऊन योग्य तो विषय माध्यम निवडून परत त्या विद्यार्थ्यांचे मार्क भरायचे आहेत

🔖 प्रश्न : आपण भरलेली माहिती संपूर्ण कुठे व कशी चेक करावी  ?

➡️ उत्तर : आपण आपल्या शाळेचे सर्व विषय व सर्व इयत्तेचे गुण भरले असाल तर व्ह्यू समरी या टॅब view summary वर क्लिक करून आपण आपल्या सर्व शाळेची माहिती चेक करू शकता

🔖 प्रश्न : गुण भरण्याची तारीख वाढणार आहे का ?

➡️ उत्तर : गुण भरण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहे व मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे व योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे लवकरच गुण भरण्यासाठी एका आठवड्याचा अजून कालावधी दिला जाणार आहे
🔖प्रश्न : एकाच आयडीवरून सर्व शाळांची माहिती भरता येईल ?

➡️ उत्तर : जर आपली शाळा छोटी असेल तर एकाच शालार्थ आयडी वरून आपण सर्व शाळांची माहिती भरू शकता त्यात काहीही अडचणी नाही


आशा आहे की तुम्हाला पायाभूत चाचणीचे खून स्विफ्ट चार्ट मध्ये भरताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल असतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि लेख आवडल्यास मित्रांना शेअर करा धन्यवाद


💥 पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट २०२३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !