या तारखेपासून सुरू होणार आरटीई 25% ऍडमिशन सुरू | rte admission start date 2024
💥 आरटीई 25% टक्के प्रवेश 2024 शाळांनी नोंदणी न केल्यास होणार सांचंमान्यता रद्द
प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन 2024 25 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई पंचवीस टक्के प्रवेश शाळा नोंदणी बाबत पुढील प्रमाणे नवीन निर्देश दिले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९, सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवणार नाही तसेच आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळा नोदंणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
तथापि, ज्या शाळा अदयापपर्यत आरटीई पोर्टलवर २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी केलेली नाही अशा शाळांना आपल्या स्तरावरुन सक्त ताकीद देण्यात यावी. आरटीई २५ टक्के पोर्टलवर आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र असणाऱ्या शाळा नोंदणी केलेली नसल्यास त्यास वैयक्तीक आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक १६.०१.२०१८ मधील तरतूदीनुसार शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
💥 5 एप्रिल पासून सुरू होणार आरटीई 25% पोर्टल प्रवेश 2024
शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेशांतर्गत (RTE) मोफत प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत. (Maharashtra) या बदलांमुळे आरटीईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत. आता या प्रवेशासाठी अंदाजे ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे.
(Education Department) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे (School) प्रमाण अधिक असते. हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जात असतो. २०२४- २५ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरवात होणार आहे.
💥 RTE प्रवेश 2024 25 आवश्यक कागदपत्रे pdf
💥 आरटीई 25% प्रवेश 2024-25 वयोमर्यादा
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले असून राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्यात म्हणजे ५ एप्रिलनंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ५७० पैकी २ हजार ८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ इतकी आहे
💥 RTE प्रवेश 2024 25 आवश्यक कागदपत्रे pdf
💥 आरटीई 25% प्रवेश 2024-25 वयोमर्यादा