Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2023 |Annabhau sathe quotes in marathi | अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी |Annabhau sathe quotes in marathi | अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 2023


आज 1 ऑगस्ट 2023 महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती, तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ते एक ख्यातनाम मराठी साहित्यिक होते.

अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले, कथा, कादंब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाटये, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले, शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.अश्या महान साहित्यिक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ( Annabhau sathe quotes in marathi) घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण व्हाट्सअप्प स्टेट्स म्हणून ठेऊ शकता.


Annabhau sathe quotes in marathi


🎯 annabhau sathe jayanti shubhechha 2023 |Annabhau sathe quotes in marathi

समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण ...लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती दिनी || विनम्र अभिवादन ॥

annabhau sathe jayanti status marathi

शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडनारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 2023

त्या गडद अंधाराचा शेवट दिसत होता.. समतेचा तो दिवा लख्ख चमकत होता...... समाजाचे सर्व कोपरे प्रकाशाने उजळीत विचारांची मशाल पेटविणारा शाहीर,,.... आज वाघापरी लढतांना दिसत होता........



🎯 अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार 2023

"मी एकटा नाही, युगायुगाची साथ आहे, अरे सावध व्हा प्रस्थापितांनो ही तर तुफानाची सुरुवात आहे..!" - सत्यशोधक अण्णाभाऊ साठे

annabhau sathe jayanti shubhechha

लोकांना मान्य नव्हते ते 'लोकमान्य" झाले.लाखो लोकांचे मन दुखवणारे "महात्मा" झाले ज्यांच्या हातात तलवार आली ते "छत्रपती" झाले -१८ तास वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करुन ते "विश्वरत्न" झाले पण फक्त या जगात दिड दिवस शाळेत जाऊन आमचे अण्णाभाऊ साठे "साहित्यरत्न" व "लोकशाहीर" झाले.

annabhau sathe jayanti shubhechha marathi

अण्णाभाऊ साठे - साहित्याच्या समिक्षेने नको त्याचा बाऊ केला. होईल तेवढा खुजा माझा अण्णाभाऊ केला. साऱ्या जगाला कळला, पण त्यांना कळला नाही. कोंबडे गप्पगार बसले, पण सूर्योदय टळला नाही. सारे षडयंत्र उमगले कशाला आणू बोलूनि आव ! लोकशाहीरच गाऊन गेलाय जग बदल घालूनि घाव !!



🎯 annabhau sathe jayanti sms shayari

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Annabhau sathe quotes wishes in marathi

जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे - अण्णाभाऊ साठे

माझी मैना गावावर राहिली पोवाडा lyrics

माझी मैना गावावर राहिली । माझ्या जिवाची होतीया काहिली ॥ ओतीव बांधा, रंग गव्हाळा, कोर चंद्राची उदात गुणांची, मोठया मनाची ,सीता ती माझी रामाची हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी सतेज कांती, घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची, काडी दवण्याची रेखीय भुवया, कमान जणू इंद्रधनुची ,हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण तिच्या गुणांची छवकड भी नसे सुखाला वाण गायली माझ्या जिवाची होतिया काहिली |

 

🎯 अण्णाभाऊ साठे जयंती भाषण सूत्रसंचालन


साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी विनम्र अभिवादन

कलियुगी माजले पाप, भांडवलदारी साप बेलगामास लागली धाप मारली डफावर थाप अण्णा भाऊंची लेखणी, दशकोटीत देखणी जनता केली स्वाभिमानी, साहित्याचा शिरोमणी / गरिबांच्या चितरकथा, घुसमटलेल्या व्यथा वाचून भडकला माथा, उरी सुलगला भाता साहित्यरत्नाचा विचार होऊ नका लाचार रोखण्या अत्याचार, अन्यायाचा घे समाचार

annabhau sathe jayanti banner

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।। नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव || साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी विनम्र अभिवादन

annabhau sathe jayanti photo hd

महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत मंहताची, ज्ञानवंताना जन्म देणार नररत्नांचे दिव्य भांडार, समरधिर घेत जिथे अवतार || जी |लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन


वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...यांना जयंतीनिमित्त... विनम्र अभिवादन !



🎯 annabhau sathe sahitya

१३ लोकनाट्य ,३ नाटके ,१३ कथा संग्रह ,३५ कादंबऱ्या ,१ शाहीरी पुस्तक, १५ पोवाडे ,१ प्रवास वर्णन ७ चित्रपट कथा , असे महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...यांना जयंतीनिमित्त... विनम्र अभिवादन !


annabhau sathe kavita charolya kavita

॥ मांग ॥ बरंच काही सोसलंय भाऊ, दलित म्हणुन शिकताना, अन् बरंच काही भोगलंय भाऊ, मांग म्हणुन जगताना. ॥ अन्यायाची चीड नाही लाचार होऊन राहीला, शेळी झालेला वाघ मांगांच्या रुपात पाहीला. कित्येक मांग पाहीलेत इथं, मांगांचाच विरोध करताना ..॥ कित्येक झाले मुस्लीम कित्येक ख्रिस्त झाले, मांगाची जात सोडुन परक्यांचे भक्त झाले. कित्येकांना पाहीलंय मी, बाप आपला बदलताना..॥ पण आता रान पेटलंय बंड करुन उठलंय, जाग्रतीचं वादळ आता गावोगावी सुटलंय. पाहिलाय तोच फकीरा मी, पुन्हा जिवंत होताना.. ॥ अन् बरंच काही भोगलंय भाऊ, मांग म्हणुन जगताना ..॥



भारताचे पहले लेखक ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे.


गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का एैरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिन्नीवर धाव, जग बदल घालूनी घाव, सांगुन गेले मला भिमराव लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्यरत्न विनम्र अभिवादन



🎯 अण्णाभाऊ साठे कविता मराठी

साठेंचे अन्नाभाउ आज अमुचेच प्रेरणा झाले जिवनाच्या साहित्याचे तुम्हीचं महासम्राट झाले. दैव वादातुन काढतांना कर्मवादी तुम्ही झाले सौंदर्य शास्त्राला मात देवुनी मानवी मन दिले तुझया फकिरा वारणेचा वाघाने बदल ते केले इतिहास हा जगाला कायम याद करून गेले ,अमुच्या सेवे राब राब राबून भुखे तुम्ही झाले तिकडे तुमचा सिनेमा आणि घरी उदास आले पोटात नाही कण आणि डोळयात लई पाणी आले पोट भरण्यासाठी अंतः तुम्ही माती खावून गेले , तुमच्या महा वेदना कधी कळल्या नाही जगाले संस्कृतीने तुम्हा जे छळले कळले नाही मनाले भीम बाबाच्या वाणीने तुम्हा उर्जा देत चेतविले शेवटी बाबांना शरण जात आम्हा हे घडविले


📮 लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश !

📌 लोकमान्य टिळक भाषण मराठी मध्ये

Download Pdf

📌 लोकमान्य टिळक भाषण मराठी मध्ये

Download Pdf

📌 लोकमान्य टिळक भाषण मराठी सूत्रसंचालन 

Download Pdf


हे पण वाचा - 


🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष 


FAQ - 
Q.अण्णाभाऊ साठे पूर्ण नाव काय आहे ?
Ans - तुकाराम भाऊराव साठे
Q.अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण ?
Ans - अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वटेगाव नावाच्या छोट्या गावात झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !