Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

About us

मराठी भाषण डॉट कॉम विषयी : 

बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनही विकलं जात नाही, त्यामुळे भाषणावर प्रभुत्व असणाऱ्याला जगभरात मागणी असते

जवळ जवळ सर्व विद्यार्थी शिक्षक व वक्त्याच्या मनात एक भीती असते आणि ती म्हणजे भाषणाची सुरुवात कशी करावी? चांगली सुरुवात करण्यासाठी काय करू? सुरुवातीला काय बोलू ? कोणती गोष्ट सांगू? माझी ओळख करू कि चारोळी सांगू कि शेरोशायारी वापरू काही कळतच नाही. असे प्रश्न नेहमी सगळ्याना पडतो..

मी शाळेत असताना जेव्हा ३ रीला होतो , त्यावेळेस आयुष्यातील पाहिलं भाषण 26 जानेवारी ला केले होते . ते भाषण लिहिले तसे ते भाषण पाठ केले होते. माझ नाव घेण्याच्या अगोदर माझ्या अवस्थेचे वर्णन आता तुम्हाला सांगणे सुद्धा कठीण आहे. छातीत जोरजोरात हृदयाचे ठोके पडत होते. त्या ठोक्यांचा आवाज स्पष्टपणे कानाला एकू येत होता. मी सुन्न होतो. माझे नाव घेतल्यावर माझ्या पाठच्या मुलाने मला सांगितले अरे उठ. पहिल्यांदा माईकसमोर गेलो तर, सुरुवातच आठवेना आणि एका सरांचा आवाज आला,” भरत बोल!!!”.. तस मी ,”अध्यक्ष महोदय,.... “ आणि सगळ भाषण एका दमात संपवले. भाषणाची सुरुवात जर चांगली झाली तर भाषण चांगले होण्याची शक्यता आहे. म्हणून भाषणाची सुरुवात चांगली कराच. 

बोलण्याची कला म्हणजेच 'भाषणकला' ही अनेकांना बिलकुल अवगत नसते. मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची वेळ येते, तेव्हा तर परिस्थिती आणखीनच वाईट होते. माईकसमोर आल्यानंतर दरदरून घाम फुटतो, घशाला कोरड पडते, पोटात गोळा येतो आणि शब्दच बाहेर पडत नाहीत. या सगळ्यांवर मात करून एक चांगला वक्ता कसा बनायचं, लोकांना जिंकून प्रभावी भाषण कसे करायचे, त्यासाठी भाषणाची तयारी कशी करायची; त्याचप्रमाणे भाषण तयार कसे करावे, भाषणाची भीती मनातून काढून कशी टाकायची, भाषण करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, व्यासपीठावर येऊन न घाबरता आपले विचार प्रभावीपणे कसे मांडायचे, प्रभावी संभाषण कौशल्यातून यशाची शिखरे कशी गाठायची; या व अशा अनेक विषयांवर आज आम्हीं मराठी भाषण डॉट कॉम वेबसाईटवर द्वारे तुम्हांला भाषण कसे असावे , त्या साठी मार्गदर्शन पर पोस्ट या ब्लॉग वर देण्याचा प्रयत्न करीत आहोत , त्याचा नक्कीच तुम्हांला भाषण सूत्रसंचालन करते वेळेस उपयोग होईल !

माझ्या विषयी : 

Bharat watane


मी भरत वटाणे  शिक्षक असून ,माझे शिक्षण Msc Bed पर्यंत झाले . मी 2011 पासून ब्लॉगर आहे , माझी सूत्रसंचालन नावाची वेबसाईट सुद्धा आहेत त्यात सूत्रसंचालन भाषण  कसे करावे व आशिष देशपांडे सरांच्या सूत्रसंचालन च्या सर्व फाईल्स उपलब्ध आहेत, तसेच सर्व सण व जयंती भाषण च्या पोस्ट आहेत, तसेच  प्ले स्टोअर वर सूत्रसंचालन व भाषण , दीक्षा अँप आणि बरेच अँप प्रसिद्ध केले आहेत .

NameBharat Watane
Company NameNA
DesignationDirector
InstagramClick Hear
Emailclick here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.