१२ वी निकाल जाहीर महाराष्ट्र बोर्ड २०२४ | maharesult.nic.in 2024 hsc result | 12th hsc result 2024 maharashtra board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2024 (SSC/HSC Result 2024) : बारावीचा निकाल उद्या 21 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
🔰 12 वी निकाल कधी लागणार? कसा चेक करावा? २०२४ | 12th hsc result 2024 maharashtra board
इयत्ता बारावीचा निकाल आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. बारावी नंतर पुढे काय? याचा निर्णय बारावीच्या निकालांवर अवलंबून असल्याने विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे
12 वी निकाल 2024 कुठे पाहता येणार निकाल| how to check 12th result 2024 maharashtra board
12th hsc Result website 2023
🔰 SMS द्वारे कसा पहाणार निकाल? How to check 12th HSC result 2024
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
12 वी निकाल ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा ( how to check 12th result 2023 maharashtra board)
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2024 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.
2) https://hsc.mahresults.org.in
4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.