Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राष्ट्रीय सुरक्षा दिवस मराठी भाषण निबंध कविता स्लोगन | rashtriya suraksha divas 2022

 राष्ट्रीय सुरक्षा दिवस मराठी भाषण निबंध कविता स्लोगन | rashtriya suraksha divas 2022

राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण


नमस्कार मित्रांनो मी आपल्याला 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवसा वर थोडक्यात भाषण कसे करावे निबंध कसा लिहावा त्या बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.चला तर सुरवात करूया...


कहीं कड़ाके की ठंड मे सरहद पर खड़ा वो जवान, 

कहीं अपनी नींद से समझौता कर दरवाजे पर खड़ा वो चोकीदार, 

कहीं पुलिस के रूप में देश के शत्रुओं को नियंत्रित करते वो हाथ, 

जिन्होंने देश की स्थिरता को बनाए रखने के लिए अपने जीवन का त्याग कर दिया, आज का दिन उनके लिए समर्पित।

 

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

आदरणीय व्यासपीठ , माझे गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या वर्गमित्रांनो...

राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो ? : 

दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस अशा बलिदान देणाऱ्यांना समर्पित आहे ज्यांनी आपले रक्त सांडून या देशाची रक्षा केली. त्यांच्या प्रेरणेला - धैर्याला  सलाम व नमन करण्याचा हा खरा दिवस आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा दिवस एक दिवसासाठी नसून संपूर्ण आठवडा म्हणजेच 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत साजरा केला जातो.

स्थापना : 5 मार्च 1966 

राष्ट्रीय सुरक्षा दिवस इतिहास :

  तुम्हांला माहीतच आहे दिवसेंदिवस औद्योगिकिकरण खूप वेगाने वाढत आहे परंतु कामगारांचे आरोग्य त्याची सुरक्षा ,पर्यावरण यासाठी 4 मार्च 1966 ला राष्ट्रीय सुरक्षा परिषद संस्थेची स्थापना केली तेव्हापासून 4 मार्च ते 11 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन व  सप्ताह म्हणून पाळला जातो..

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा उद्देश :

कारखान्यात काम करतांना आपल्या सुरक्षा साठी कोणकोणती साधने वापरावी,  घरातील वाररिंगची काळजी कशी घ्यावी, गाडी चालवायचे नियम कसे पाळावे ,  इमारतीच्या वाचमन ने घ्यायची काळजी जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही हाच मुख्य उद्देश आहे .

भविष्यातील सुरक्षेतेचे उद्दिष्टे :

स्त्री सुरक्षा -

घटना घडल्यानंतर न्याय देणे न्याय देणान्यांचे काम आहे. पण आपण सर्वांनी या घटनांना थांबवण्यासाठी काही गोष्टींचा विचार व कार्ये करणे गरजेचे आहे.

भेसळीपासून सुरक्षितता -

हल्ली अन्नपदार्थामध्ये भेसळीचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे रोगराई वाटत आहे. अशात नवीन पिठी कमजोर होत चालली आहे. यापासून सुद्धा देशाला सुरक्षित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे.

राष्ट्रीय स्वच्छता -

देशाला स्वच्छ ठेवणे, तसेच लोकांना आजारांपासून सुरक्षित ठेवणे हेही अंतर्गत सुरक्षतेचा भाग आहे. राष्ट्रीय स्वच्छता हाही राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा महत्वाचा उद्देश आहे.

गरीबांची सुरक्षितता -

देशामध्ये गरिबांची संख्या हि खूप असून ते असुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी विचार करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना चार पैसे मिळवण्यासाठी मार्ग निर्माण करण्याची गरज आहे.

असे अनेक मुद्दे आहेत जे देशाच्या सुरक्षेच्या अंतर्गत येतात. यावर उपाय करण्यासाठी देशामध्ये एकता असणे अत्यंत अनिवार्य आहे.

त्यासाठी एकत्र येऊया देशाला सुरक्षित करूया. 

आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाची सुरक्षा .

शेवटी एवढेच बोलेल ....

सुरक्षा कर्तव्य है हमारा

सुरक्षित हो हर कार्य हमारा |

सुरक्षा का धर्म निभाना

सुरक्षित रोज घर जाणा ||

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !