दुर्गा देवीची आरती मराठी lyrics PDF Download दुर्गे दुर्घट भारी आरती pdf lyrics मराठी 2021Durge durgat bhari tujvin sansari lyrics in marathi pdf download
नवरात्री महोत्सव 2021 दिनांक 07 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होत असून या वर्षी तो दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालणार असून , नवरात्र म्हंटले की देवींची आरती , गरबा व नवरात्रीचे नऊ रंग कलर 2021 ची विचारणा नेहमीच होत असते !
या वर्षी सुद्धा नवरात्री वर कोरोना चे संकट आहे त्या मुळे पण गरबा ,आणि गर्दी टाळण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली नाही पण आपली श्रद्धा असेल तर आपणावर देवी दुर्गा मातेचे नेहमीच कृपा राहणार आहे .
आज आपण नवरात्री मध्ये आपल्याला दुर्गा मातेची आरती पाठ नसते त्या साठी दुर्गा मातेची मराठी आरती Lyrics मराठी मध्ये घेऊन आलो आहोत , दुर्गा मातेची आरती ( दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी आरती मराठी pdf 2021 ) आपण PDF मध्ये सुध्दा डाउनलोड करू शकता !
दुर्गा देवीची आरती मराठी lyrics PDF Download
दुर्गे दुर्घट भारी आरती pdf lyrics मराठी 2021
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥