महाशिवरात्री 2022 पूजा विधी मुहूर्त व नियम मराठी माहिती | mahashivratri 2021 marathi mahiti
नमस्कार मित्रांनो आज आपण महाशिवरात्री 2021 मध्ये कधी आहे , पूजा कशी करावी व पूजे मध्ये काय करावे काय करू नये , कुमारिकेने हे व्रत करावे की नाही ,आपल्या अडचणी मध्ये व्रत कसे करावे याची माहिती बघणार आहोत.
🔳 महाशिवरात्री इतिहास 2022 ?
पृथ्वीतलावावरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकांचा एक दिवस. शिवशंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या याच विश्रांती घेण्याच्या काळाला "महाशिवरात्री" असे म्हंटले जाते.
🔳 महाशिवरात्री कधी आहे?
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीलाच आहे, या दिवशी स्त्रीया उपवासाचे व्रत करतात तसेच भगवान शिवाची प्रार्थना आराधना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता करतात.
🔳 महाशिवरात्रीचा शुभमुहूर्त 2022? :
महाशिवरात्रीची 01 मार्च 2022 ला सकाळ पासून ते दुपारी 2 वाजून 39 मिनिटां पर्यंत आपण महाशिवरात्री पूजा करू शकतो !
या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली असता जीवनातील अडचणी, दुःख, पाप, आर्थिक समस्या दूर होते. असुरांनी ,देवतांनी, ऋषी-मुनींनी प्राचीन काळापासून महादेवाची तपश्चर्या करुन वरदान प्राप्त केले आहे.
🔳 महाशिवरात्री पूजेचे नियम 2022 ? :
महाशिवरात्रीच्या पूजेच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे, त्यापैकीच काही नियम असे आहेत…
1.महाशिवरात्रीला उशिरापर्यंत झोपू नये सकाळी लवकर उठावे, तसेच आंघोळ केल्याशिवाय काहीच खाऊ नये.
2.जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास धरला असेलतर लवकर उठून आंघोळ करून ,स्वच्छ कपडे घालून शिवशंकराची पूजा करावी.
4.तसेच शिवरात्रीच्या दिवशी डाळ भात गहू पासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर दूध, चहा, कॉफी फळे, यांचेच सेवन करावे.
4.महाशिवरात्री च्या दिवशी काळे कपडे घालू नये, पांढरे वस्त्र घालावेत.
5.तसेच शिवलिंगाला दुसऱ्यांनी अर्पण केलेला प्रसाद आपण खाऊ नये.
6.महाशिवरात्रीचला रात्री शंकराचे भजन करून आरती करावी. आणि उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच सोडावा.
7.शिवलिंगावर कधीही तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध अर्पण करू नये, नेहमी शिवलिंगावर थंड दूधच अर्पण करावे.
8.शिवलिंगाला कधीही कुंकवाचा टिळा लावू नये.
9. तुटलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये.
🔳 शिवरात्री पूजा करण्याची योग्य पद्धत? :
पहिल्यांदा शिवलिंगावर पंचामृत अर्पण करून नंतर दूध, दही, गंगाजल, केसर, मध व पाणी पासून तयार केलेले पंचामृत अर्पण करावे.आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्र पठण करावे. तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावे , बेलपत्राचे तोंड आपल्याकडे करून ये अर्पण करावे. शिवलिंगावर पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे इतर फुले शिवलिंगावर अर्पण करू नयेत.
महाशिवरात्रीला रात्रीला चार प्रहारी पूजा अर्चना करावी यालाच `यामपूजा’ असे म्हणतात. या यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे व बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडी वर वाहाव्यात तसेच धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहण्याची पध्दत आहे. 26 तांदळाच्या पिठाचे दिवे करून त्यांनी शिवलिंगाला ओवाळावे आणि पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच स्नान करून पुन्हा पूजा करून पारण्याला ब्राह्मणभोजन घालुन ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी
याचदिवसी शिव व पार्वतीचा विवाह झाला असल्या मुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे भोलेनाथाचे व्रत दीड दिवसाचे असते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची समाप्ती होतो. दुसऱ्या दिवशी स्त्रिया ब्राह्मनाला भोजन घालुन व्रताचा समारोप करत.
🔳 महाशिवरात्रीचे व्रत कोणी करावे व कोणी करू नये ?
महाशिवरात्रीचे हे व्रत कुमारिका पण करू शकतात. शिवशंकराचे हे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होऊन त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनासारखा वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे.
प्रश्न |
महाशिवरात्री माहिती 2021 |
---|---|
महाशिवरात्री कधी आहे? | 1 मार्च 2022 |
महाशिवरात्री शुभ मुहूर्त? | 1 मार्च दुपारी 2.13 मिनिटपर्यंत |
महाशिवरात्री व्रत कोणी करावी? | कुमारिका व स्त्रिया दोन्ही करू शकतात |
महाशिवरात्री पूजा नियम | काळे कपडे घालू नये |