Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी भाषण निबंध शायरी सूत्रसंचालन

28 फेब्रुवारी राष्ट्रीय  विज्ञान दिन मराठी भाषण निबंध शायरी सूत्रसंचालन


राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी भाषण

विज्ञानाने केली क्रांती,

विज्ञानाने केली प्रगती,

विज्ञानाने दिला एक नवा ध्यास,

विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास.

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष,आदरणीय व्यासपीठ,वंदनीय गुरुजनवर्ग आणि समाजविघातक अंधश्रद्धांना मूठमाती देत वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून २१व्या शतकात देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या बंधू आणि भगिणींनो...

भारत देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉ.चंद्रशेखर वेंकट रामन म्हणजेच डॉ सी व्ही रामन यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण साजरा करत असतो.

28 फेब्रुवारी हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला कारण की,डॉ. सी.व्ही.रामन यांनी 28 फेब्रुवारीला त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठविला होता. त्यांचा शोध म्हणजे रामन इफेक्ट यालाच 1930 या वर्षाचे नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला.

पण विज्ञान दिन आणि डॉ सी.व्ही.रामन यांची माहिती किती जणांना असेल हाही संशोधनाचाच विषय आहे.

डॉ.सी.व्ही.रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन. त्यांचा जन्म7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर तर आईचे नाव पार्वती होय.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚩 27 फेब्रुवारी "मराठी राजभाषा दिन" अप्रतिम भाषण मुलांची / विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी !


➡️ https://marathibhashan.blogspot.com/2021/02/blog-post.html?m=1        


विज्ञानाने तयार केलेल्या असंख्य गोष्टींशी माणूला घट्टपने जोडलेला आहे. पण विज्ञानाच्या जवळ जाण्यास माणूस धजत नाही.

आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.  समाजाला कीड लावणा-या,समाजविधातक असंख्य अंधश्रद्धांना माणूस केव्हा सोडणार? मंदिरांमध्ये,यात्रांना, चमत्कार पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनांनाही गर्दी केव्हा करणार?

२१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे आणि हे सिद्धही होत आहे.विज्ञानाने माणसाची प्रचंड प्रगती केली आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने आपले जीवन खूपच सूकर केले आहे.तसेच माणूस विज्ञानाचा गुलामही बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

----------------------------–-------------------

🌟 8 मार्च जागतिक महिला दिन मराठी अप्रतिम भाषण मुलांची / विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी !

 ➡️https://www.marathibhashan.com/2021/02/mahila-din-speech-in-marathi-language.html 

----------------------------–-------------------

अचानक लाईट गेली,अचानक गाडी बंद पडली, अचानक मोबाईल - बंद पडला तर माणूस बैचेन होतो,दुःखी होतो. म्हणून माणसाने विज्ञानाचा उपयोग नक्कीच करावा पण विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ नये.

माणसाने वैज्ञानिक दृष्टीकोन मनात रुजवून वागले पाहिजे तर आणि तरच विज्ञान दिन साजरा करण्याचा हेतू सफल होईल. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाचपेयी यानी विज्ञानाचे महत्व ओळखून घोषणा दिली... 

जय जवान जय किसान जय विज्ञान,

चला तर विज्ञानाला,वैज्ञानिकांना, वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करुया.

जाता जाता एवढेच म्हणेन..

भ्रांतियों से पर्दा उठाया ,

और सच्च्या ज्ञान दिया ।

हम घर बैठे दुनिया देख रहे,

ये सौभाग्य हमे विज्ञान ने दिया ।

धन्यवाद 

जय हिंद जय महाराष्ट्र

भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की शेअर करा 👇 मराठी भाषण वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे 

आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे असेल तर 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. छोट्या विद्यार्थ्यांसाठीथोडक्यात प्रेरणादायी भाषण.👍👌सुंदर विचार

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !