शिवस्वराज्य दिन 2021 कसा साजरा करायचा आहे? शिवराज्याभिषेक सोहळा 2021 रायगड shiv swarajya din in 2021 marathi mahiti | shiv swarajya din sohala in marathi
दर वर्षी 6 जून हा महाराष्ट्रात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो परंतु या वर्षी 6 जून 2021 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करायचा आहे.
शिवस्वराज्य दिन कधी साजरा करायचा ?
६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयात तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करायचा आहे.
६ जून रोजी शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा ?
१) भगवा स्वराज्यध्वज संहिता स्वराज्यध्वज कसा असावा ? -
ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी तसेच ध्वज हा ३ फुट रुंद व ६ फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलकृत असावा.
२) शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता -
शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणुन कमीतकमी १५ फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा.
३) शिवशक राजदंड स्वराज्यगुढी साठी आवश्यक साहित्य -
सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद कुंकु. ध्वनीक्षेपक
💗 राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा संदेश
४) शिवशक राजदंड स्वराज्यगुढी कशी उभारावी -
६ जून सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमधे रिता करुन स्वतंची झोळी सुख, समृध्दी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणुन शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा "सुवर्ण कलश" बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करावी.
५) सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करून ठेवून द्यावा.
मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती !🙏