मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र शायरी मराठी
Maitri Shayari Marathi 2021 happy best friend day wishes Friendship Quotes in Marathi | मैञी शायरी मराठी
आज राष्ट्रीय मित्र दिवस , आपल्या आवडत्या मित्राला शुभेच्छा देण्याचा हा दिवस , आपला मित्र आपल्या जीवनात आई वडील भाऊ बहीण तसेच इतर रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा नातं हे आपला मित्र आपल्या सोबत तयार करत असतो , प्रत्येक सुख दुःखात आनंदात अडचणीमध्ये आपल्या पाठीशी उभा असणारा आपला मित्र असतो.
आपली एखादी चांगली गोष्ट आपली एखादी वाईट गोष्ट किंवा आपले काही गुपित जे आपल्या घरच्यांनाही माहित नसते ते आपल्या एका चांगल्या मित्राला नक्कीच माहीत असते .आपला मित्र आपल्यावर निस्वार्थपणे नेहमी प्रेम करत असतो म्हणूनच आपण त्याच्याजवळ आपल्या मनातल्या सर्व दुःख सांगत असतो आणि त्याला ती नकळत माहित सुद्धा असते
आज आठ जून मैत्री दिवस याच मित्राला शुभेच्छा देण्याचा हा दिवस असला तर आज आपण मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊयात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2021
happy best friend day wishes
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी ,पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी, त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी , कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी,आणि वनवासातही सोबत करणाऱ्या सीतेसारखी. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
मित्र दिवस शायरी 2021 happy best friend day quotes in marathi
तुझी माझी जोडी जशी, मुंबई-पुणे-मुंबई , तुझी माझी मैत्री जशी, सूर्याची कोवळी किरणं समुद्रकाठावर खेळणारी , तुझी माझी मैत्री जशी, गवतावरचं पहाटेचं दवबिंदू , तुझी माझी मैत्री जशी, हात-हातात नसला तरी मनानं सतत सोबत चालणारी ,ही मैत्री अशीच राहावी... मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
मैत्री वर शायरी मराठी
रोजच आठवण यावी, असे काही नाही , रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..। मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात.. आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥ मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैञी शायरी मराठी sms 2021
मैत्री म्हणजे मायेची साठवण,मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण! हा धागा नीट नपायचा असतो, तो कधीच विसरायचा नसतो! कारण ही नाती तुटत नाहीत ती आपोआप मिटून जातात , जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरं हातून सुटून जातात! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Dosti Shayari Marathi, Maitri Shayari Marathi 2021
ह्या छोट्याशा जगात आपली ओळख ठेवा, त्यासाठी आपल्या छोट्याश्या हृदयात एक छोटसं स्वप्न ठेवा, जगण्यासाठी हजार नाती गरजेची नसली तरी, एक मैत्रीचं नात आयुष्यात जरूर ठेवा. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!