Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

श्रावण सोमवार २०२३ मराठी माहिती शुभेच्छा शिवमूठ | Shravan somvar 2023 Marathi mahiti shubhechya

श्रावण सोमवार मराठी माहिती व्रत कथा  2023 निबंध | Shravan somvar month 2023 in Maharashtra in Marathi kalnirnay calendar 


श्रावण सोमवार मराठी माहिती (toc)


श्रावण सोमवार महत्त्व 2023


 चातुर्मासात भारतीय पंचांगात विशेषता महाराष्ट्र मध्ये एक महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे श्रावण सोमवार . श्रावण सोमवारचे वृत्त या महिन्यात स्त्रिया बरोबरच कुमारिका  सुद्धा हे वृत्त खूप श्रद्धेने करतात. असे म्हटले जाते की श्रावण सोमवारआतील पाचही सोमवार महादेव / शिवाची पूजा केल्यास इच्छुक फल प्राप्ती होते त्यामुळेच कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात अशी आख्यायिका आहे. तसे बघायला गेल्यास श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पाचवा महिना आहे मुळात हा सण पावसाळ्यात येत आल्यामुळे आजूबाजूचे वातावरण हिरवळ आणि प्रसन्न करणारे असते त्यामुळेच श्रावण महिना हा भगवान शिव यांना खूप प्रिय आहे या महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.


श्रावण सोमवारची कथा वृत्त 2023

देवी सतीने शंकर हाच प्रत्येक जन्मी पती म्हणून मिळावा असे प्रण केले होते , त्या अगोदर देवी सतीने तिचे पिताश्री दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता आणि पुढील जन्मी देवी ने पार्वती रुपात राणी मैना यांच्या घरात जन्म घेतला. पार्वतीने मागील जन्मी भगवान शिव हेच पती मिळावे म्हणून प्रण केला होता आणि त्यासाठी तिने या जन्मात सुद्धा भगवान शिव पती मिळावा म्हणून निरंकार राहून कठोर व्रत केले व भगवान शिव यांना प्रसन्न केले व त्यानंतर शिव प्रसन्न होऊन पार्वती बरोबर विवाह केला अशी आख्यायिका आहे म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी पूर्ण दिवसभर उपवास करावा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडावा असे केल्यास आपल्यास  सौभाग्य प्राप्त होते तसेच कुमारिकेंना इच्छुक पती मिळतो.

श्रावण सोमवार शिवामूठ 2023 ( आजची शिवामूठ 2023 )

श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून  सकाळची सर्व कामे आटपून भगवान शिवाचे नामस्मरण जप आणि उपवास केला जातो .या दिवशी महादेवाला दुधाचा दुग्धाभिषेक केला जातो ,त्याचे पूजन केले जाते व नंतर दर सोमवारी विशेष शिवमूठ वाहतात.

शिवामूठ मंत्र मराठी ( shivamuth mantra in marathi 2023 )

नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।

शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।

 

किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणावे.


आजची शिवामूठ कोणती आहे ? (Aajchi shivamuth in marathi )

श्रावण सोमवार श्रावण सोमवार तारीख शिवामूठ मराठी
पहिला श्रावण सोमवार  21 ऑगस्ट 2023 तांदूळ
दुसरा श्रावण सोमवार 28 ऑगस्ट 2023 तीळ
तिसरा श्रावण सोमवार 04 सप्टेंबर 2023 मूग
चौथा श्रावण सोमवार 11 सप्टेंबर 2023 जवस




श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 (Happy Shravan Maas )

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे।वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे |श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!!


श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश मराठी 2023 ( shravan somvar shubhechha in marathi )

शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे, श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!


First shravan somvar wishes in marathi ( happy shravan somvar)

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,ह्या  शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,हीच शंकराकडे प्रार्थना…श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!


shravan somvar sms whatsapp status

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार,त्यां ची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो…ओम नमः शिवाय ! हैप्पी श्रावण मास!


Q.श्रावण महिना कधी आहे मराठी 2023 ?

मराठी श्रावण सोमवार हा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत आहे व 11 सप्टेंबर 2023 रोजी संपणार आहे.

Q.या वर्षी 2023 किती श्रावण सोमवार आहेत ?

2023 वर्षात एकूण 4 श्रावण सोमवारी आहेत.

Q.या वर्षी 2023 किती श्रावण सोमवार शिवामूठ कोणत्या आहेत ?

या वर्षी 2023 पहिल्या श्रावण सोमवार ची ( २१ ऑगस्ट २०२३) शिवामूठ - तांदूळ आहे, दुसऱ्या श्रावण सोमवार ची (२८ ऑगस्ट २०२३) शिवामूठ - तीळ आहे,तिसऱ्या श्रावण सोमवार ची (०४ सप्टेंबर २०२३) शिवामूठ - मूग आहे,चौथ्या श्रावण सोमवार ची ( ११ सप्टेंबर २०२३) शिवामूठ - जवस आहे,


हे पण वाचा - 

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !