Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

खंडोबा तळी भरण्याची आरती गाणे | बोल सदानंदाचा येळकोट हर हर महादेव चिंतामण मोरया | khandobachi tali aarti in marathi lyrics pdf

खंडोबा तळी भरण्याची आरती गाणे मराठी | तळी भंडार | बोल सदानंदाचा येळकोट | खंडोबाची आरती | तळी भंडार |तळी उचलणे | Khandoba tali uchalne khandoba tali bharane marathi lyrics PDF Champs | bol sadanandacha yelkot lyrics


तळी कशी भरावी | तळीभरणे - तळी उचलणे विषयी माहिती मराठी


श्री खंडोबा षडरात्रोत्सव/श्री मार्तंडभैरव उत्सव सुरू आहे या वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी चंपाषष्ठी आहे . चंपाषष्ठी च्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते . बऱ्याच जणांना माहीत नाही की तळी कशी भरावी  तळी उचलणे किंवा तळी भंडार म्हणजे काय ? तसेच खंडोबाची आरती मराठी मध्ये कोणती आहे व तळी उचलतानाचे गाणे हर हर महादेव चिंतामण मोरया मराठीत काय आहे याची संपूर्ण माहिती या लेखात मिळणार आहे.

       सध्या खंडोबा षडरात्रोत्सव सुरू आहे. चंपाषष्ठी ला घरोघरी तळी भरतात. तळीभरणे हा एक कुळाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते तद्नंतर पान ठेवून (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्या नंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.
        तीन वेळा ताम्हण उचलून वरखाली करताना "सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" असा जयजयकार करतात.
        मराठी मध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार 'तळी उचलणे' हा या आचारा वरूनच आला असावा.

🎯 खंडोबा चंपाषष्ठी च्या शुभेच्छा संदेश मराठी
🎯 खंडोबा तळी भरणा आरती गाणे pdf


         मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांना मार्तंडदेवाने युध्दात हरवले  त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी (मल्हारी) म्हणतात. 
        या देवाने त्यांचा संहार केल्या नंतर ऋषीमुनींना आणि  सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच हे प्रतिक म्हणजे तळी भरणे आहे. त्याचा उदो उदो हा हेतु आहे.

खंडोबा तळी भरण्याची आरती गाणे मराठी PDF lyrics | खंडोबा महाराज तळी आरती | हर हर महादेव चिंतामण मोरया |तळी भरणे आरती |




बोल सदानंदाचा येळकोट हर हर महादेव चिंतामण मोरया | bol sadanandacha yelkot lyrics marathi | khandobachi tali aarti in marathi lyrics pdf


बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
अंगावर शाल॥ सदा हिलाल॥
जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥
म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥
देवा ओवाळी ॥ नाना परी॥
देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥
खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥
बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !