पायाभूत चाचणीचे मार्क स्विफ्ट चॅटबॉट ( Swift Chat ) अँप द्वारे कसे भरावे २०२३ | payabhut chachani gun Swift Chat app chatbot var kase bharayche 2023
नमस्कार मित्रांनो पायाभूत चाचणीचे मार्क आपल्याला १४ ते १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत Swift Chat या एप्लीकेशन द्वारे व आपला " PTA महाराष्ट्र" चॅटबॉट द्वारे ऑनलाईन भरायचे आहेत या लेखा मध्ये आपण पायाभूत चाचणीचे मार्क Swift Chat अँप मध्ये कसे भरायचे ते स्टेप बाय स्टेप आपण या बघणार आहोत .
असे भरा पायाभूत चाचणीचे मार्क स्विफ्ट चॅटबॉट ( Swift Chat ) अँप द्वारे कसे भरावे २०२३ | payabhut chachani gun Swift Chat app chatbot var kase bharayche 2023
🔰 मार्क भरण्यापूर्वी आपल्याला काही माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला पायाभूत चाचणीचे मार्क/ रिझल्ट आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इयत्ता निहाय व विषयनिहाय आपल्याला मार्क आवश्यक आहे पायाभूत चाचणी इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची झाली असून तीन विषयाकरता सदर चाचणी झाली होती प्रथम भाषा ,तृतीय भाषा आणि गणित अशा तीन भाषांसाठी ही चाचणी झाली होती या सर्व इयत्तांची विषयणी एक्सेल शीट तयार करून ठेवा जेणेकरून आपल्याला मार्क भरते वेळेस अडचण येणार नाही
💥पायाभूत चाचणीचे मार्क्स ॲप मध्ये स्टेप बाय स्टेप कशी भरावे सविस्तर माहिती
पायाभूत चाचणी गुण Swift Chat वर भरताना येणाऱ्या अडचणी, शंका व त्यांचे समाधान !
तुम्ही अजून पर्यंत आपल्या पायाभूत चाचणीचा रिझल्ट बनवला नसेल तर खालील एक्सेल शीट डाउनलोड करू शकता त्यामध्ये आपण मार्क भरून त्याची प्रिंट काढू शकता
पायाभूत चाचणीची रिझल्ट ची Excel sheet डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करा
🔰 पायाभूत चाचणीचे मार्क्स भरण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत ती म्हणजे स्विफ्ट चार्ट ॲप डाऊनलोड करणे आणि दुसरी म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पायाभूत चाचणीचे चॅटबॉट ( ChatBot ) क्यू आर कोड किंवा लिंक . पायाभूत चाचणीचे क्यूआर कोड आपल्याला खालील पीडीएफ मध्ये डाऊनलोड केल्यानंतर मिळणार आहे लक्षात घ्या आगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे व मग चॅटबॉट ची क्यू आर कोड किंवा लिंक स्कॅन करायची आहे तरच आपला " PTA महाराष्ट्र" चॅटबॉट ओपन होणार आहे
🔰 पायाभूत चाचणीचे मार्क्स स्टेप बाय स्टेप कसे भरायचे ते बघू
1) सर्वात अगोदर आपल्याला स्विफ्ट चॅट ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा आहे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे आपण इथून डाऊनलोड करू शकता
- Play Store App Link > https://play.google.com/store/search?q=convegenius&c=apps
- Website Link > web.convegenius.ai
- ChatBot Scan Link > http://bit.ly/PAT-MH
🔰 2) डाऊनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण ॲपचा https://play.google.com/store/search?q=convegenius&c=apps ही वापर करू शकतो किंवा वेबसाईटचाही वापर करू शकतो वेबसाईटसाठी आपल्याला web.convegenius.ai या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे किंवा ॲप मधून रजिस्ट्रेशन करण्यासाठी ॲप ओपन करायचे आहे
3) रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर पाहिजे , चालू मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे ,
4) ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुमचा देश ,तुमचं राज्य ,आणि तुमचं शहर निवडायचा आहे आणि Countinue बटन वर क्लिक करायचे आहे इथे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे इथे आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आहे .आता ॲप किवा लिंक वरून रजिस्ट्रेशन करत असाल तर लिंक तिथेच सोडून द्या .
5) त्यानंतर आपल्याला किंवा कोड स्कॅन करायचा आहे खालील chatbot क्यूआर कोड स्कॅन किंवा लिंक वर क्लिक करायचा आहे . ( खाली दिलेली लिंक आगोदरच Whatsapp वर सेव्ह करून ठेवा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर त्या चॅटबॉट च्या लिंक वर क्लिक करायचे आहे ) मित्रांनो तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खालील जी लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करायचे आहे
- " PTA महाराष्ट्र" चॅटबॉट लिंक > http://bit.ly/PAT-MH
6) वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक परत आपले ॲप मध्ये आपण लॉगिन होणार आहोत ( आता पायाभूत चाचणी ची गुण भरण्याची सुरवात झाली आहे )
7) लॉगिन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला लेट्स गोवर क्लिक करायचे आहे
8) लेट्स गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हाय असा मेसेज पाठवायचा आहे
9) मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला ॲप मध्ये अशाप्रकारे मेसेज दिसणार आहे इथे आपण भाषा निवडायचे आहे
10) भाषा निवडल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाकायचा आहे डायस नंबर नंबर टाकल्यानंतर आपल्याला तो बरोबर आहे का याची खात्री करायची आहे खात्री करायची आहे
11) त्या नंतर आपल्याला आपला शालार्थ आयडी आहे तो टाकायचा आहे . शालार्थ आयडी टाकल्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे
12) कन्फर्म केल्यानंतर आपल्याला रेकॉर्ड स्टुडन्ट परफॉर्मन्स या बटन वर क्लिक करायचं आहे
13) रेकॉर्ड बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या इयत्ता दिसणार आहेत
14) इयत्ता दिसल्यानंतर आपल्याला आपली सिलेक्ट रिस्पॉन्स या बटनवर क्लिक करायचा आहे
15) सिलेक्ट रिस्पॉन्स वर क्लिक केलं तर आपल्याला कुठल्या विषयाचे गुण भरायचे आहेत हे पण भरू शकता
🔰 16) आपल्याला तीनच विषयाचे मार्क भरायचे आहेत पहिला फर्स्ट लॅंग्वेज गणित आणि थर्ड लैंग्वेज बाकीचे मार्क भरू नका इथे काळजीपूर्वक सिलेक्ट करा नाहीतर आपण दुसऱ्याच माध्यमाच्या आणि दुसऱ्याच भाषेचे गुण इथे भरले जाईल
17) त्यानंतर आपल्याला स्टुडन्ट ची लिस्ट आपल्याला दिसणार आहे स्टुडन्ट ची लिस्ट दिसल्यानंतर स्टुडन्ट वर अशा प्रकारे कम्प्लीट पेंडिंग अशी माहिती दिसणार आहे तर
18) एका स्टूडेंट वर क्लिक करायचा आहे तो ऑप्शनला एका प्रेसेंट आहे यावर क्लिक केल्यानंतर त्याचे आपल्याला सिलेक्ट रिस्पॉन्स गुण भरायचे आहे प्रत्येक मार्क किती मार्काचे आहेत ते काळजीपूर्वक भरा यापैकीच आपल्याला झिरो ते सात पर्यंत आपल्याला त्याचे गुण भरायचे आहे. सर्व प्रश्नांचे गुण आपल्याला एक एक करत भरायचे आहेत
19) अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची व सर्व विषयांची माहिती भरायची आहे
20) माहिती भरल्यानंतर आपण view summary यावर क्लिक करून माहिती चेक करू शकता .
अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायचे आहे काही विद्यार्थ्यांची माहिती व काही विषयांची माहिती भरायची बाकी असेल तर दुसऱ्या दिवशी आपण ती भरू शकतो दुसऱ्या दिवशी आपण परत ॲप लॉगिन करून PAT महाराष्ट्र या वर क्लिक करून भरु शकतो परत लॉगिन करायचे आवश्यकता नाही.