Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पायाभूत चाचणी गुण चॅटबॉट वर कसे भरायचे २०२३ | payabhut chachani gun chatbot var kase bharayche 2023

पायाभूत चाचणी गुण चॅटबॉट वर कसे भरायचे २०२३ | payabhut chachani gun chatbot var kase bharayche 2023


नमस्कार मित्रांनो आपण पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेतली असून सदर चाचणी चे गुण आपल्याला ऑनलाईन भरायचे असून त्यासाठी विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे /भरायचे असून त्यासाठी चाटबॉट चा वापर करायचा आहे . आता  चाटबॉट  म्हणजे काय चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण कसे भरायचे ( payabhut chachani gun chatbot var kase bharayche ) यासठी आज दिनांक 14 सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे . त्यासंदर्भात संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे ते खाली सविस्तर वाचू शकता.

💥 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हापायाभूत चाचणीचे गुण चॅटबॉट वर कसे भरावेपायाभूत चाचणी गुण चॅटबॉट(toc)

पायाभूत चाचणी गुण चाटबॉटवर कसे भरायचे payabhut chachani gun chatbot var kase bharayche


राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.

💥 यु-ट्यूब लिंकविद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा वाटबाद पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे.

इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे... 

💥 यु-ट्यूब लिंक : https://www.youtube.com/watch?v=oC0gFdpOOV0

💥 यु-ट्यूब लिंक


💥 PAT चाटबॉट मार्गदर्शिका :  https://bit.ly/PATManual💥वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !