Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा ? How to check RTE lottery result 2024 selection list

RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा ? How to check RTE lottery result 2024 selection list


नमस्कार पालकांनो सात जून 2024 रोजी आरटी अंतर्गत दुर्बल व आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते बऱ्याच पालकांना लॉटरी लागल्यानंतर आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही हे कसे चेक करावे हे माहित नाही आज आपण या लेखांमध्ये याची सविस्तर माहिती बघणार आहोत .

💥 महत्वाचे :-
 13 तारखेला लॉटरी ची लिस्ट declared होणार आहे. काल फक्त लॉटरी सोडत झाली. शाळांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी 12 ला होणार आहे त्यामुळे 13 ला सर्वाना मेसेज येणार आहेत!

आपल्या पाल्याचा लॉटरीमध्ये नंबर लागला किंवा नाही लागला हे चेक करण्याच्या तीन पद्धती आज मी तुम्हाला सांगणार आहे ! 



💥 1) पद्धत  1 ली - RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा


ज्या पाल्याचा नंबर लागला असेल त्या पालकाच्या  रजिस्टर मोबाईल नंबर वर आपल्या पाल्याचा नंबर लागला आहे असा मेसेज आलेला असेल अशा प्रकारे आपण चेक करू शकता की आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही


वरील प्रकारे मेसेज आला असेल तर समजावे आपला नंबर लागला आहे जर एसएमएस आला नसेल तर आपला नंबर लागला किंवा नाही हे आपण दुसऱ्या प्रकारे चेक करू शकता



💥 2) पद्धत  2 री - RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा


स्टेप १ - सर्वात आगोदर RTE 25 % च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


स्टेप २ - आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे 



स्टेप ३- Admit card 2024 वर क्लिक करावे 





स्टेप ४ - आपल्या लागलेल्या शाळेचा ऍडमिट कार्ड  प्रिंट काढून जतन करावा





💥 3) पद्धत  3 री - RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा

तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर सर्वप्रथम जायचे असून त्यानंतर एप्लीकेशन वाईज अर्जाची स्थिती या टॅब वर क्लिक करा !

त्यानंतर आपला अर्ज क्रमांक नमूद करावा अर्ज क्रमांक नमूद केल्यानंतर आपल्याला आपला नंबर लागला असेल तर Regular Selection किंवा waiting typeया पैकी एक येणार जर Regular Selection असे दिसले तर आपला नंबर लागला आहे व waiting दिसले तर समजा आपला नंबर वेटिंग वर आहे .



अशाप्रकारे आपला नंबर लागला आहे किंवा नाही चेक करू शकता.



💥 आरटीई २५% निकाल लागल्या नंतर काय ?


RTE 25% लॉटरी महाराष्ट्र कार्यक्रम आज 07 जून 2024 रोजी SCERT कॉन्फरन्स हॉल पुणे येथे अधिकारी, पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.

  •  आज मॅन्युअल ड्रॉ काढण्यात आला आणि ड्रॉमध्ये निवडलेले अंक सिस्टममध्ये भरले जातील आणि आज निवडलेल्या अंकांच्या आधारे ऑनलाइन लॉटरी होईल.
  •  NIC द्वारे ऑनलाइन लॉटरी चालवण्यास वेळ लागेल.
  •  7 जून 2024 रोजी दुपारी 3 नंतर पालकांना लॉटरीबाबत एसएमएस प्राप्त होतील(अंदाजित).
  •  लॉटरीत निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी देखील जारी केली जाईल.
  •  पहिल्या फेरीचे प्रवेश 8 जून  ते 15 एप्रिल 2024 पर्यंत असतील.(अंदाजित)
  •  लॉटरीमध्ये निवडलेल्यांनी RTE वेबसाइटवरून प्रवेशपत्राची प्रिंट आउट त्यांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध होणार आहे
  • प्रवेशाची प्रिंट आऊट व  संबंधित कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्सच्या प्रती घेऊन प्रवेशपत्रावर दिलेल्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करून घ्यायची आहे
  •  कागदपत्रांच्या पडताळणीनंतर समिती मुलाला प्रणालीमध्ये प्रवेश देईल आणि प्रवेश पत्र देईल त्यानंतर मुलाच्या शारीरिक प्रवेशासाठी निवडलेल्या शाळेत पाठवले जाईल.
  •  शाळा पालकांकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाहीत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !